News

वीरशैव लिंगायत हिंदूच ! भाग ७

वीरशैव लिंगायत हिंदूच ! हे निदर्शित करणारे मुद्दे पुढीलप्रमाणे :-

29. चन्नबसवण्णा, घट्टिवाळय्या, मरिमिंडदेवय्या, बालबोम्मण्णा, अक्कनागम्मा, हाविनहाळ कल्लय्या, अक्कमहादेवी, शिवयोगी सिद्धाराम, तोंटद श्री आणि बसवण्णांचे समकालीन ज्येष्ठ आदय्या, सकलेश मादय्या आदी शरणांनी आपल्या अनेक वचनांत भक्तिभावपूर्वक पंचाचार्यांचे स्मरण केले आहे.

30. शिवशरणांच्या वचनांमध्ये आणि त्यापूर्वीच्या वेदागमात वीरशैव शब्दाचा पुष्कळ वेळा वापर झाला आहे. त्यातही महात्मा बसवण्णांपासून हेमगल्ल हंप यांच्यापर्यंत 29 शिवशरणांनी एकूण 161 वचनांमध्ये 170 वेळा वीरशैव( veershaiv lingayat samaj) शब्द धर्मवाचक म्हणून वापरला आहे. यावरून स्पष्ट होते की, वीरशैव आणि लिंगायत हे भिन्न नसून एकच आहेत आणि महात्मा बसवेश्‍वरांच्या आधीपासून वीरशैव लिंगायत समाज अस्तित्वात आहे.

31. रेणुकाचार्यांनी मांडलेल्या वीरशैव तत्त्वज्ञानाला बसवेश्‍वरांनी उपनिषदातील मूल्यांची जोड दिली.

बसवण्णा म्हणतात,

तंदे निनु तायी निनु ।

बंधू निनु, बळग निनु ।

निनिल्लदे मत्तारो इल्लय्या ।

कुडल संगमदेवा हाललद्दु निरलद्दु ॥

हे वचन म्हणजे संस्कृतमधील पुढील श्‍लोकाचे कन्नड रूपच आहे.

त्वमेव माताच पिता त्वमेव ।

त्वमेव बंधुश्‍च सखा त्वमेव ।

त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।

त्वमेव सर्वं मम देव देव ॥

32. महात्मा बसवेश्‍वरांना ‘अनुभव मंटपा’ची संकल्पना श्रीशैल अनुभाव केंद्र, पुट्टलकेरे अनुभाव गोष्टी व चेंगणेगिल मंटप या तीन अध्ययन केंद्रावरून आली असावी, असे वचनपितामह श्री. फ. गु. हळकट्टी यांचे मत आहे. यावरून त्या काळातही भारतात अध्ययन केंद्रे होती, हे स्पष्ट होते. तसेच कुडलसंगम येथे जन्मलेल्या ‘इष्टलिंगा’ची त्यांची परिकल्पना कल्याणमध्ये परिपक्व झाली. इष्टलिंगाचा आधारही शिवभक्ती हाच आहे, हे महत्त्वाचे आहे.

33. देव एकच आहे. त्याला दिलेली ब्रह्मा, विष्णू, महेश ही अनेक नावे आहेत. तो निर्गुण, निराकार, साकारही असल्याचे त्यांचे एकदेवोपासनेमागचे म्हणजे इष्टलिंग परिकल्पनेच्या मागची भूमिका होती. यासंदर्भात बसवेश्‍वर म्हणतात,

देव असे एकची एक, तया नावे जरी अनेक,

परम पतिव्रतेचे चित्त, केवळ पतिठायी असे रत.

ईश्‍वर हा एक असून तो विविध रूपातून व्यक्त होतो, हा हिंदू धर्माचा एक प्रमुख सिद्धांत आहे.

34. महात्मा बसवण्णा (mahatma basweshwar) असो, की त्यांचे समकालीन अन्य शिवशरण असोत, त्यांनी आपल्या कोणत्याही वचनांत लिंगायत हा शब्द वापरलेला नाही. आपण नवीन धर्म स्थापन करत आहोत, हे बसवण्णांनी सांगितलेले नाही अथवा त्यांच्या कोणत्याही समकालीन शरणांनी आपण बसवण्णांनी स्थापन केलेल्या नव्या धर्माचे अनुयायी आहोत, असे लिहिले नाही. त्यामुळे अस्तित्वात नसलेली बाब ऐतिहासिक म्हणून बिंबवण्याचा आताच्या राजकारण्यांचा खटाटोप हा केवळ स्वार्थासाठी चालला आहे.

35. वीरशैव लिंगायतांच्या अष्टावरणात लिंग, मंत्र (ओम प्रणवमंत्र), विभुती, रुद्राक्ष या बाह्य आवरणांना विशेष महत्त्व आहे. ही प्रतिके आणि संकेत यातून वीरशैव लिंगायत संप्रदाय हिंदू धर्माचा अविभाज्य भाग असल्याचेच सिद्ध होते. वीरशैव लिंगायतांचे अष्टावरण, पंचाचार यांना सनातन हिंदू धर्मापासून वेगळे करणे शक्य नाही.

36. हिंदू हे भारतीय इतिहासातील सनातन धर्म, आणि भारतात उगम पावलेल्या पंथांना दिलेले सर्वसमावेशक नाव आहे.

37. भारतवर्षामध्ये धर्म ही संकल्पना रिलीजन अथवा मजहबपेक्षा भिन्न आहे. माझ्या रिलीजनचे नाही. त्यांना बाटवून, मतांतर करून आपल्या कळपात ओढा, ही तर्‍हा भारताबाहेर उगम पावलेल्या पंथांची आहे. भारतात पंथ, संप्रदाय अनेक होते. त्यात सातत्याने भर पडत होती आणि आहे. ‘मानव धर्मक्के जयवागली’ अर्थात मानव धर्माचा विजय असो – ही उद्घोषणा वीरशैव लिंगायतांमध्ये प्रसिद्ध आहे. हा सर्वसमावेशक विचारच हिंदू धर्माचा आत्मा आहे. भारताबाहेरून आलेल्या एकांतिक पंथांपासून प्रेरित होऊन हिंदू धर्माची लचके तोडण्यासाठी आणि वीरशैव लिंगायत समाजात फूट पाडण्यासाठी लिंगायतांना स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता द्या, अशी आत्मघातकी मागणी काही जण करत आहेत. या मागणीला संकुचित हितसंबंध व राजकारण याशिवाय इतर काहीही आधार नाही.

Back to top button