OpinionSeva

सेवागाथा – पाणी आले, जीवन लाभले.., डोंगरीपाडा (महाराष्ट्र)

डोंगरीपाड्यात आज सात दशकांची प्रतीक्षा संपली. गावातील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. घरोघरी पाण्याची सोय उपलब्ध करून देणाऱ्या सौरपंपाला न्याहाळताना 73 वर्षांच्या शांताबाई खंजोडे यांच्या अश्रूंची वाट मोकळी झाली होती. त्यांचे अश्रू थांबत नव्हते. मुंबईपासून 80 किमी अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील या गावातील लोक 72 वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची वाट पाहत होते. गरोदर महिला असो किंवा अल्पवयीन मुले असोत, डोंगरीपाड्यातील खडडयेयुक्त रस्त्यांवरून दीड किलोमीटर विहिरीतून पाणी आणण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. त्यात, पावसात तर येथील येण्या- जाण्याचा मार्ग बंद व्हायचा. पाणी नाही, वीज नाही, सरकारी शाळा नाही, 33 कुटुंबांच्या वस्तीत फक्त 7 शेतकरी शेतात नांगरणी करू शकत होते.

आज कोणाचा विश्वास बसणार नाही की, या गावात एस्ट्रोटर्फसाठी क्रीडांगण आहे, महिलांना शिलाईकाम शिकवण्यासाठी शिलाई प्रशिक्षण केंद्र आहे, लहान मुलांसाठी माधव बाल संस्कार केंद्र आहे. येथे संगणक देखील शिकवले जाते. अभ्यासासाठी एक लहान ग्रंथालय देखील आहे. आणि हो, सर्वात महत्वाचे म्हणजे पाणी. प्रत्येक आठ घरांच्या मध्यभागी एक टेपलेट आहे. एवढेच नाही तर आता घरोघरी वीज आहे. हे सर्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मरणार्थ भाईंदरमधील बहुआयामी प्रकल्प केशव सृष्टी चालवत असलेल्या ग्रामविकास योजनेच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे.

डोंगरीपाडाच्या विकास प्रवासाचे शिल्पकार असलेले मुंबई महानगराचे माजी कार्यवाह विमल केडिया जी म्हणतात की, या विकास प्रवासात ग्रामस्थांची पदोपदी साथ मिळाली. पाण्याच्या टाकीपासून घरोघरी पाईप लाईन पोहोचविण्यापासून समाज मंदिराच्या निर्माणात ग्रामस्थांनी रात्रंदिवस श्रमदान करून काम पूर्ण केले. एवढेच नाही, तर विकासाने गावात जसा प्रवेश केला, ग्रामस्थांचे सहकार्य अधिकाधिक वाढू लागले. एक समिती स्थापन करून प्रत्येकाने या कामांसाठी ठराविक रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला. दीड किलोमीटर खोल बांधलेल्या विहिरीतून पाण्याच्या टाकीपर्यंत पाईप आणणे व ते घरोघरी नेऊन सौर पॅनेल बसविण्याचे काम पुण्यातील एका खाजगी कंपनीने केले. या प्रमुख खर्चानंतर गावातील लोकांनी केशव सृष्टीकडून काहीही घेण्यास नकार दिला. नदी पासून शेतापर्यंत सिंचनाकरिता पाणी आणण्याचा व पुढील सर्व देखभालीचा खर्च गावकऱ्यांनी स्वतः उचलण्याचा निर्णय घेतला. निसर्गाने डोंगरीपाडाला नेत्रसुखद असे सौंदर्य दिले आहे. पण मुबलक पाऊस पडूनही पालघर जिल्ह्यातील या गावातील लोक थेंब -थेंब पाण्याच्या थेंबासाठी तडफडत होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न महिन्याला जेमतेम 2 हजार रुपये होते. केवळ नाईलाज म्हणून गावातील पुरुषांना सांसणे या शेजारील गावात इतरांच्या शेतात मजूर म्हणून राबावे लागत. अगदी लहान मुलांनाही शिक्षणासाठी 9 किमी दूर असलेल्या वाडा येथील प्राथमिक शाळेत शिकण्यासाठी जावे लागत. शाळेतून परतल्यावर गावात शिकणे किंवा शिकवण्यासाठी कुठलीही सुविधा नव्हती. पण आज विकासाचा प्रवाह डोंगरीपाड्यात वाहू लागला आहे. गावाच्या मध्यभागी असलेल्या सामुदायिक भवन , ज्याला समाज मंदिर असे नाव देण्यात आले आहे तेथे महिलांना 8 शिलाई मशीनवर शिवणकामाचे प्रशिक्षण दिले जाते. भारतीय स्टेट बँकेच्या सहकार्याने लाभलेले दोन संगणक विद्यार्थ्यांना सध्या प्रारंभिक संगणक कोर्स करण्यास मदत करत आहेत.

डोंगरीपाडासह 10 गावांच्या विकासाच्या काळजीत असलेल्या केशव सृष्टीमधील ग्रामविकासाचे विस्तारक सचिन जी म्हणतात की हे समाज मंदिर गावकऱ्यांसाठी प्रार्थनास्थळासारखे आहे. गणेशोत्सवापासून लग्नापर्यंत हे अंगण सर्वांना मोफत उपलब्ध आहे. दर आठवड्याला येथे होणाऱ्या सत्संगात हळूहळू संपूर्ण गाव व्यसनमुक्त होत आहे. नियमितपणे ताडी पिणाऱ्या वारली जमातीच्या कुटुंबीयांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आता ते त्यांच्या शेतात तांदूळ आणि भाज्या पिकवून वर्षाला एक ते दीड लाख रुपये कमवत आहेत. गावाच्या मध्यभागी उंचीवर बांधलेल्या टाकीमुळे वर्षभर पाण्याची समस्या उद्भवत नाही.

वर्षभरापूर्वीची एक घटना हा बदल समजून घेण्यासाठी पुरेशी आहे. प्रख्यात लेखक रतन शारदा जी जेव्हा डोंगरीपाड्याच्या विकास प्रवासासंबंधी शब्द देण्यासाठी तेथे पोहोचले, तेव्हा त्यांच्या पत्नी श्यामाजींनी उत्सुकतेने स्त्रियांना विचारले – तुम्हाला पुढे काय हवे आहे? यावर ग्रामस्थांनी जे उत्तर दिले, यातच या कथेचे सार दडले आहे. त्या वनवासींनी सांगितले की आम्हाला हवे ते सर्व मिळाले आहे, आता पुढचा मार्ग आम्ही स्वतः निश्चित करू.

Back to top button