News

“अरमानने मला मारले”

दर्शन सोळंकी (Darshan Solanki )मृत्यू प्रकरणात अरमान इकबाल खत्री ला मुंबई पोलिसांनी अटक केल्याने या प्रकरणी हेतुपूर्वक दिशाभूल करणाऱ्या कम्युनिस्ट व फुटीरतावादी संघटना व नेते तोंडावर आपटले आहे व सध्या त्यांच्या गोटात शांतता पसरली आहे. 

 IIT मुंबईत शिक्षण घेणारा हुशार असा दलित विद्यार्थी १९ वर्षीय दर्शन सोलंकी या बी टेक च्या प्रथम वर्षाला असणार्या युवकाने  फेब्रुवारी महिन्यात आत्महत्या करण्याची दुर्दैवी घटना घडली होती. या प्रकरणात राज्य सरकारने SIT नियुक्त केलेली आहे, पोलीस तपासात वसतिगृहातील दर्शन सोळंकी च्या खोलीत दर्शन ने स्वहस्ताक्षरात लिहलेली सूसाईड नोट पोलिसांना सापडली, त्या नोट मध्ये अरमान इकबाल खत्री चा उल्लेख आहे.  “Arman has killed me.” (अरमानने मला मारले) असे दर्शन ने लिहले होते. पोलीस तपासात असेही समोर आले की, अरमान व दर्शन चा वाद झाला होता, दर्शन ने अरमान संदर्भात धार्मिक टिपण्णी केली होती व अरमान इक्बाल खत्री या विद्यार्थ्याने दर्शन ला चाकू चा दाख दाखवत खुनाची धमकी दिली होती. हा नेमका वाद काय होता याचा सखोल तपास व्हायला पाहिजे व पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. या प्रकरणात ही नवीन माहिती समोर आल्याने या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे.

दर्शन च्या आत्महत्ये नंतर IIT मुंबई मधील “आंबेडकर फुले पेरियार स्टडी सर्कल (APPSC)” तसेच SFI अशा कम्युनिस्ट संघटनानी घटनेच्या पहिल्या दिवसापासून आरोप व प्रचार केला की, ही आत्महत्या नसून ‘संस्थात्मक खून’ आहे व ‘जातीय भेदभावामुळे’ ही घटना घडली आहे. या विषयी या संघटनांनी अनेक विद्यापीठांच्या मध्ये आंदोलने सुद्धा केले. या संघटनांनी आयोजित केलेल्या आय आय टी मुंबई मध्ये झालेल्या सभेत एक युवकाने त्याच्या भाषणात अतिशय द्वेष पूर्ण, तेढ निर्माण करणारे  पुढील प्रमाणे विधान केले होते.. “.. जबतक आप घर जाकर जय सियाराम बोलेंगे आपकी मानसिकता मे पूरी तरह से ब्राह्मण बँधा है, आप उसके चंगुल मे बँधे रहेंगे। आपको मानना पडेगा कि जब तक आप जय श्रीराम बोलेंगे, आपको जय क्षत्रिय जय ब्राह्मण जय वैश्य बोलना पड़ेगा और थू शुद्र में कहना पड़ेगा, दलितवर्ग को नीचा दिखाना पड़ेगा ।”  या विधानाच्या विरोधात आय आय टी मधील एक संशोधक विद्यार्थ्याने पवई पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केलेली आहे.

Darshan Solanki had told his family about being harassed by students on campus over his caste, but not about Armaan, his father said

एखाद्या दुर्दैवी घटनेचा कोणताही तपास न करता पहिल्या दिवसापासून त्याला जातीय रंग देणे किती योग्य आहे. दर्शन सोलंकी सोबत आत्महत्या करण्यापर्यंत जातीय भेदभाव झाला असेल तर त्याने आय आय टी प्रसासानाकडे त्या संदर्भात तक्रार का नाही केली? किंवा आय आय टी मध्ये कार्यान्वित असलेल्या अनुसूचित जाती, जमाती सेल (SC,ST) कडे तक्रार का नाही केली. किंवा कोणत्याही विद्यार्थी संघटनांकडे सुद्धा तक्रार केली नाही. हे साधे प्रश्न या संघटनांना का पडले नसेल? माजी राज्यसभा खासदार व स्वतः ला विचारवंत म्हणवून घेणारे भालचंद्र मुणगेकर यांनी या प्रकरणी वृत्तपत्रात लेख लिहला, पत्रकार परिषद घेतली व काही मागण्या केल्या होत्या. मुनगेकारांना या घटनेविषयी खोटी माहिती कोणी पुरवली ? की त्यांनीच काही हेतूने तथ्यहीन विधाने केली ?  याचा जाब समाजाने विचारायला हवा. या प्रकरणात ज्या फुटीरतावादी संघटनांनी खोटी माहिती पसरवून समाजात जातीय तेढ व अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याची सुद्धा चौकशी पोलिसांनी करायाला हवी.  कोणतेही पुरावे हाती नसताना स्वतःचा अजेंडा रेटण्याचा यांचा प्रयत्न होता. या फुटीर लोकांनी दर्शन च्या कुटुंबियांची सुद्धा दिशाभूल केली. तथ्य बाहेर आल्यानंतर मात्र हे लोक गप्प आहेत.

एका विशिष्ट चष्म्यातून घटांनाच्या कडे पाहणे व घटनांना जातीय रंग देणे यात कम्युनिस्ट संघटना आघाडीवर राहिलेल्या आहेत. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्याचा जीव जातो ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. किती कष्ट करून हा मुलगा IIT पर्यंत आला असेल, त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची खरी कारणे शोधण्याची थोडी सुद्धा तसदी हे लोक का घेत नाहीत?

घटनेच्या पहिल्या दिवशीच हेतुपूर्वक आरोप कोणत्या तथ्यांच्या आधारे करतात ? किमान  तपास होण्यापर्यंत सुद्धा संयम हे लोक बाळगू शकत नाही का ?

आय आय टी मुंबई ने या प्रकरणात अंतर्गत सत्यशोधन समिती नियुक्त केली होती. या समितीने ७९ व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या व अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालामध्ये त्यांनी काही निष्कर्ष मांडले. त्यात प्रामुख्याने त्यांनी म्हटले कि, जातीय भेदभाव झाल्याचे कोणतेही तथ्य आढळले नाही. तसेच दर्शन ची शैक्षणिक प्रगती खालावली होती आणि त्यामुळे त्याने आत्महत्या केली असण्याची शक्यता आहे.  परंतू या समितीला सुसाईड नोट सापडली नव्हती. पोलिसांच्या विशेष तपास पथकाला तपासात दर्शन च्या खोली मध्ये सुसाईड नोट सापडल्यामुळे या प्रकरणातील चित्र स्पष्ट झाले. आणि त्यामुळेआय आयआयटी मुंबई  ची सत्यशोधन समिती तथ्यापर्यंत पोहचू शकली नाही आणि त्याचा आहवाल अर्धवट झाला असे म्हणता येईल. या सर्व प्रकरणात उच्च शिक्षण संस्थांमध्ये जातीय भेदभाव कसा चालतो, या संस्थांमध्ये ग्रामीण भागातून व वंचित घटकांमधून आलेल्या विद्यार्थ्यांना पुरेशा सोयी सुविधा कशा दिल्या जात नाहीत.

Indian Institute of Technology-Bombay student Darshan Solanki.

विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ रहावे यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जाव्यात. रॅगिंग विरोधात यंत्रणा हवी. अशा विषयांची चर्चा झाली. आय आय टी मुंबई मध्ये अनुसूचित जाती जमाती सेल संस्थेने निर्माण केलेला आहे व त्याद्वारे विद्यार्थ्यांसाठी बरेच काम चालते असे समजले. तरीही सिस्टीम मध्ये दोष नक्की आहेत त्यावर बोललंच पाहिजे, दोष दूर करण्यासाठी पर्याय सुचवला पाहिजे, समस्येवर काम केले पाहिजे. पण फुटिरतावाद्यांना फक्त आरोप करणे व सिस्टीम कशी दलित विरोधी आहे हे सिद्ध करण्याची घाई असते. रोहित वेमुला घटना सुद्धा यांनी अशीच मोठी करून वैचारिक अजेंडा राबवला. आता दर्शन सोळंकी की घटनेमध्ये सुद्धा त्यांचा असाच प्रयत्न होता पण योग्य पोलीस तपासामुळे या कम्युनिस्ट, विद्रोही, फुटिरतावादी संघटना उघड्या पडल्या आहेत.

आपला भाऊ दर्शन सोळंकी ला न्याय मिळालाच पाहिजे. उच्च शिक्षण संस्थांमध्ये अनेक कारणांनी विद्यार्थी आत्महत्या करतात. या सर्व कारणांचा शोध घेवून या संस्थांच्या मध्ये  कोणत्याही कारणांनी अशा दुर्दैवी घटना घडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे. 

लेखक – सागर शिंदे.

विवेक विचार मंच, महाराष्ट्र या संघटनेचे राज्य संयोजक.

निवास – छत्रपती संभाजीनगर

संपर्क – 8055906039

E -mail – srshinde1@gmail.com

Back to top button