IslamOpinion

एफसीआरएचा भंग केल्याप्रकरणी अजमल यांची दुसरी संस्थाही वादात, कट्टरपंथी दहशतवादी संघटनांकडून घेतला पैसा

ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे(एआययुडीएफ) प्रमुख मौलाना बद्रुद्दिन अजमल यांनी ‘अजमल फाऊंडेशन या आपल्या शैक्षणिक संस्थेसाठी एफसीआरएचा भंग करून कोट्यवधी रुपयांची देणगी गोळा केली असल्याचे काही दिवसांपूर्वी उघड झाले. बांगलादेशी मुसलमानांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एयुआयडीएफ पक्षाच्या या प्रमुखांनी ‘मर्कझुल मारिफ’ या आपल्या स्वयंसेवी संस्थेसाठी ५४ कोटी रुपयांच्या देणग्या गोळा केल्या आहेत. विशेष म्हणजे या देणग्यादेखील पाच कट्टरपंथी मुस्लिम दहशतवादी संघटनांकडून ही देणगी घेतली आहे. लीगल राईट्स ऑब्झर्व्हेटरीने या संबंधी गृहमंत्रालयाकडे तक्रार दाखल केली आहे.

‘मर्कझुल मारीफ’ हा अजमल फाऊंडेशनचा सीएसआर विभाग असून कट्टरपंथी दहशतवादी संघटनांकडून या स्वयंसेवी संस्थेने परदेशी देणगी प्रतिबंधक कायद्याचा भंग करून ५४.६६ कोटी रुपयांच्या देणग्या उकळल्या आहेत.  मर्कझुलच्या देणगीदारांमध्ये  मुस्लिम ब्रदरहुडशी संबंधित, कुवेतच्या सोशल रिफॉर्म सोसायटी या संघटनेचाही समावेश आहे. या सर्व भारतविरोधी, हिंदूविरोधी विखारी संस्था-संघटना आहेत.

देणगीदार संस्था अशा आहेत

१. जामियातूल उलमा – दक्षिण आफ्रिकेतील या संस्थेचे सचिव मौलाना युसुफ पटेल यांनी कलम ३७० रद्द करणे, नागरिकत्व सुधारणा कायदा अस्तित्वात आणणे याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, विद्यमान गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्यावर सडकून टीका केली होती. त्याचप्रमाणे सीएएबाबतच्या निर्णयानंतर आसाममध्ये जाळपोळ करण्यास अजमल यांच्या स्वयंसेवी संस्थेला पैसा पुरवला होता.

२ सोशल रिफॉर्म सोसायटी – कुवेतमधील ही संस्था  कुवेती ब्रदरहूडची शाखा असून अनेक कडव्या कट्टरपंथियांशी या संस्थेचा संबंध आहे. यात ९/११चे सूत्रधार, युएसने षडयंत्रकर्ता म्हणून घोषित केलेले खालिद शेख महम्मद आणि तारिक अल-सुवेदान यांचाही या कट्टरपंथियांत समावेश आहे.

३ इस्लामिक डेव्हलपमेंट फंड – या संस्थेचा फंड थेट पॅलेस्टिनी मुजाहिदीनकडे जात असून पॅलेस्टाईनमधील उठावासाठी पुरवला जातो. प्रिन्स नायफचा फंड जेरूसलेममधील उठावासाठी आणि अल-अकसा फंडगोला पुरविण्यात येतो.

४ मुस्लीम एड, युके ही संस्था बांगलादेशातील जमात ए इस्लामीशी जोडलेली आहे. या संघटनेचा म्होरक्या चौधरी मोईमुद्दिन हा जमात ए इस्लामीच्या मारेकऱ्यांच्या चमूत होता. १९७१च्या बांगलादेश स्वातंक्ष्य संग्रामात १८ जणांना त्याने मारले होते. मुस्लीम एडचे विद्यमान संचालकांत ब्रिटनमधील संघर्षाचा संयोजक मनझर अहसान याचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे इस्लामिक फाऊंडेशन या जमातच्या युकेतील थिंक टँकचाही सदस्य आहे.

५ उम्मा वेलफेअर ट्रस्ट या संस्थेचा युरोपातील पैशांची अफरातफर आणि दहशतवादाला पैसा पुरवणे यात संबंध आढळून आला आहे. अल अरबिया या वृत्तपत्राने म्हटले आहे की उम्मा वेलफेअर ट्रस्ट, युकेचा उल्लेख अमेरिकेने दहशतवादी संघटना असा केला आहे.

६ मब्रातुल फला अलखारिया चॅरिटेबल, कुवेत – या संस्थेसंबंधी काही विशेष तपशील मिळाले नसले तरी संबंधित संस्थेने इंटलिजन्स एजन्सीच्या माध्यमातून आसाममध्ये पैसा पुरवला आहे असे समजते.

 एफसीआरएचा भंग करून दहशतवादी संघटनांकडून पैसा घेतल्याबद्दल बद्रुद्दिन अजमल हे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मुंबईत अधिकृत निवास असणाऱ्या बद्रुद्दिन अजमल यांनी आसाममध्ये कार्यरत एयुआयडीएफया पक्षाच्या माध्यमातून देशहिताच्या कलम ३७० व सीएए संबंधी निर्णयांना विरोध केला असून त्यासाठी जाळपोळी, हिंसात्मक कारवायाही केल्या आहेत. अजमल यांच्या संस्थांच्या विरोधात एलआरओने केलेल्या तक्रारीनंतर या कृत्यांसाठी मिळणाऱ्या पैशांचे स्रोत उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एलआरओने या फाऊंडेशनविरोधात लवकरात लवकर कारवाई करण्याची आणि कठोर निर्णय घेण्याची सरकारला विनंती केली आहे.

Back to top button