National Security

अमेरिकेतून विकले जाणार ‘तेजस’चे जेट ट्रेनर

नवी दिल्ली, दि. १० डिसेंबर –  जगभरात संरक्षण सामग्रीचा पुरवठा करणाऱ्या अमेरिकेतून एचएएल तेजस या भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानाच्या जेट ट्रेनरची विक्री केली जाणार आहे. अमेरिकेच्या नौसेनेला अंडर ग्रज्युएट ट्रेनिंग सिस्टमची आवश्यकता होती. त्यासाठी भारताने आपले लढाऊ विमान देण्याची तयारी दर्शवली आहे. अमेरिकेच्या विनंतीवरून भारताने यास मान्यता दिली आहे. एचएएलने भारतीय नौसेनेच्या आयएनएस विक्रमादित्य या लढाऊ जहाजावर तेजसचे यशस्वी प्रक्षेपण केले होते.

इकोनोमिक टाईम्सच्या वृत्तानुसार अमेरिका मे २०२०पासून अंडरग्रज्युएट जेट ट्रेनिंग सिस्टमच्या शोधात होती. भारताने लाईट कोम्बेट एअरक्राफ्टच्या फाईटर ट्रेनच्या प्रस्ताव अमेरिकेसमोर ठेवला. त्यावर अमरिकेने विनंती करून अनेक गोष्टींची माहिती घेतली. या विनंतीस प्रतिक्रिया देताना भारताने एक विस्तृत अहवाल पाठवला ज्यात विमानातील सर्व सुविधांची माहिती देण्यात आली होती. या विमाने उडविण्याचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने यात आवश्यक ते बदल करण्यात येतील असे एचएएलचे संचालक माधवन यांनी सांगितले.

**

Back to top button