CultureHinduism

आंबेडकर महासभेकडून राम मंदिरासाठी चांदीची वीट समर्पित

अयोध्या, दि. १७ फेब्रुवारी : अयोध्येतील राम मंदिर निधी समर्पण अभियानास सर्व स्तरांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे.  या अभियानाअंतर्गत आंबेडकर महासभा ट्रस्टने देखील राम मंदिर उभारणीसाठी चांदीची वीट समर्पित केली आहे.  

श्रीरामजन्मभूमी न्यासाचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांच्याकडे ही वीट सोपविण्यात आली. अनुसूचित जाती वित्त आणि विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. लालजी यांनी कारसेवक पुरम येथे चांदीची वीट दान केली.

समाजातील सर्व घटकांप्रमाणेच दलित समाजही मंदिर उभारण्याबाबत उत्साहित असल्याचे निर्मल यांनी सांगितले. तसेच राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा केल्याबद्दल दलित समाज न्यायालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानतो, असेही निर्मल यांनी यावेळी सांगितले.

Back to top button