IslamNews

हिंदू गावावर हिफाजत-ए-इस्लामच्या हजारो कट्टरपंथियांचा हल्ला, ८० घरांची नासधूस

ढाका, दि. १८ मार्च : बांग्लादेशमधील हिफाजत-ए-इस्लाम या संघटनेच्या हजारो कट्टरपंथियांनी शाल्ला उपजिल्हा येथील सुनामगंजमधील हिंदू गावावर हल्ला करून येथील ८० घरांची नासधूस केली.

नौगाव येथील हिंदू तरुणाने आपल्या फेसबुक पोस्टमधून मुस्लिम धर्मगुरुंच्या वक्तव्याचा निषेध केल्याचा देराई उपजिल्हा येथे झालेल्या कार्यक्रमात संघटनेच्या एका सदस्याने आपल्या भाषणामधून उल्लेख केला. भाषणातील या वक्तव्याने चिथावलेल्या हजारो मुस्लिम कट्टरपंथियांनी याचा वचपा काढण्यासाठी हिंदू गावावर सशस्त्र हल्ला करुन येथील ८० घरांची नासधूस केली.

हबीबपूर युनियनचे अध्यक्ष असणाऱ्या विवेकानंद मुजूमदार बाकूल यांनी या गावातील अनेक घरांवर हल्ला झाल्याची माहिती दिल्याचे ‘ढाका ट्रिब्यून’ ने म्हटले आहे. या गावातील अनेक हिंदू कुटुंबांनी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी गाव सोडल्याचेही वृत्त आहे. अनेक हिंदूंनी गाव सोडल्यानंतर हिफाजत-ए-इस्लाम या संघटनेच्या कट्टरपंथियांनी गावामध्ये अनेक घरांची तोडफोड केली असून घरातील वस्तू चोरल्याची माहितीही समोर आली आहे.

Back to top button