News

चिमुकल्या ‘हृदयी’ने केली कोरोनावर मात!

जळगाव (प्रतिनिधी) केशवस्मृती प्रतिष्ठानच्या छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह कोविड केअर सेंटर येथे दि. २९ एप्रिल २०२१ रोजी बेटावद ता. जामनेर येथील कु. हृदयी दीपक मोरे (वय ४ वर्ष)  व कु. माही दीपक मोरे (वय ७ वर्ष)  या भगिनींची कोविड तपासणी पॉझिटीव्ह आढळल्याने उपचारार्थ त्यांच्या आई सोबत दाखल झाल्या होत्या.

कोविड केअर सेंटरमध्ये संवेदनशील मनाने कार्यरत असलेले डॉक्टर, नर्स, सेवाभावी स्वयंसेवक यांनी केलेल्या उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत दोघी चिमुकल्या त्यांची आई शितल दिपक मोरे यांच्यासोबत उपचार घेऊन सुखरूप घरी गेल्या. 

दररोज सकाळी योगा करतांना चिमुकल्या उपचार घेत असलेल्या रुग्णाचे मनोरंजन, बडबड गीते, धमाल गोष्टी सांगत.  कोविड केअर सेंटर मध्ये कोणत्याही प्रकारचे मनावर दडपण न ठेवता चिमुकलीनी सर्वाची मने जिंकत आपलेसे करून घेतले. उपचार पूर्ण झाल्यानंतर घरी जातांना सर्व कोरोना विरुद्धच्या लढाईची नवी उमेद देत निरोप घेतला.

– विश्व संवाद केंद्र, देवगीरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button