News

टाइम्स समूहाच्या प्रमुख इंदू जैन यांचे निधन

नवी दिल्ली, दि. १४ मे : टाइम्स समूहाच्या प्रमुख इंदू जैन यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. समूह बेनेट, कोलमन अँड कंपनी लिमिटेड म्हणजेच टाइम्स समूहाच्या त्या चेअरपर्सन होत्या. इंदू जैन या आध्यात्माच्या साधक, कला सेवक आणि महिला अधिकारांच्या समर्थक होत्या. त्यांना उत्तुंग कार्यासाठी २०१६ साली भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

शाश्वत सामाजिक विकास आणि परिवर्तनशील बदलांसाठी इंदू जैन यांनी सन २००० मध्ये दि टाइम्स फाउंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना केली. या संस्थेचा रिलीफ फंड चक्रीवादळ, भूकंप, पूर आणि इतर नैसर्गिक संकटात मदत कार्यासाठी वापरला जातो.

महिलांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यात इंदू जैन यांचे मोलाचे योगदान आहे. फिक्की महिला संघटनेच्या इंदू जैन या संस्थापक अध्यक्ष होत्या. १९८३ साली फिक्की महिला संघटनेची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यात इंदू जैन यांचे मोठे योगदान आहे.

पंतप्रधान मोदींनीही ट्वीट करून इंदू जैन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. देशाची प्रगती आणि संस्कृतीसाठी त्या झटल्या. त्यांनी केलेल्या समाजकार्यामुळे त्या सतत स्मरणात राहतील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही इंदू जैन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला असून देशाच्या राजकीय वर्तुळातूनही शोक व्यक्त करण्यात येत आहे.

बेनेट कोलमन अँड कंपनी लि

Back to top button