NewsSeva

अभाविपच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरण अभियान

मुंबई, दि. १५ मे : सध्या वाढत चाललेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्याकरिता शहरातील भायखळा , काळा चौकी , घोडपदेव या भागातील बेस्ट च्या बस , बस स्टॉप , चाळी व अनेक सोसायटींमध्ये निर्जंतुकीकरण अभियान राबविण्यात आले आहे .

राज्य सरकारने मुंबई मध्ये निर्बंध जरी लावले असले तरी , फ्रंटलाईन वर्कर्स व अत्यावश्यक सुविधांसाठी बस चालू आहेत तरी त्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी हे निर्जंतुकीकरण अभियान अभाविपने हाती घेतले आहे तसेच चाळींमध्ये , सोयासायटीमध्ये देखील अनेक फ्रंटलाईन वर्कर्स राहत असतात तेथे देखील कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे .

अभाविप प्रशासनाला सहकार्य करायला कटिबद्ध आहे , येणाऱ्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्याकरिता अभाविप प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करेल असे मध्यमुंबई भाग सहमंत्री सिद्धांत बनकर यांनी सांगितले .

सध्या राज्यामध्ये निर्बंध लावण्यात आलेले आहेत, मुंबई सोबतच राज्यामध्ये अभाविप प्रशासनाला व नागरिकांना अश्या उपक्रमांच्या माध्यमातून मदत करत आहे मग ते रुग्णालयामध्ये रुग्णसेवा असो, रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना भोजनाची व्यवस्था करणे , लसीकरण केंद्र उभा करणे असे अनेक उपक्रम राज्यभरात अभाविप राबवत आहे असे अभाविप प्रदेश मीडिया प्रमुख योगेश्वर राजपुरोहित म्हणाले.

Back to top button