Opinion

वैश्विक महामारीवर संजीवनी ठरतेय आयुर्वेद पंचगव्य ‘आयुरकोरो ३’

कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाला कधी नव्हे ते लॉकडाउन निमित्ताने घरी राहण्यास भाग पाडले आहे. कोरोना संक्रमित रुग्णांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सगळ्यांनाच घरात राहणे शासनाला अनिवार्य करावे लागले. ज्या कारणाने नित्य कार्यावर मर्यादा आल्याने अर्थतंत्रावर आघात होत आहेत ज्यातुन भविष्यात भीषण स्थिती निर्माण होण्याची चिंता होणे स्वाभाविक आहे. कोरोना हा विषाणू मानवनिर्मित असल्याचे सिद्ध झाल्यामुळे एक प्रकारच्या युद्धजन्य परिस्थिती समानच या विषाणूविरोधात कशाप्रकारे लढा दिला पाहिजे हे निश्चित करणे आता काळाची गरज बनली आहे.

आंतरराष्ट्रीय – राष्ट्रीय स्तरावर प्रसारित करण्यात आलेल्या मास्क, स्वच्छता, सुरक्षित अंतर या सूचनांचे पालन करायचे आहेच. परंतु यासोबतच आपल्या परंपरेतुन आलेल्या आणि अशा प्रकारच्या महामारीच्या प्रतिकूल परिस्थितीत कुठल्या पद्धतीने आचरण करावे याचा अंदाज घेत आहारातील, विहारातील, नित्यचर्ये मधील कारणे याचा आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून, त्याच्या अनुकरणातून स्वतःसोबत आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचेही रक्षण करायचे आहे. “जगायचे असेल तर जिंकावेच लागेल”, या सूत्रानुसार आपल्या आजूबाजूला असलेल्या या अदृश्य शत्रूशी लढताना सूचनांचे पालन तसेच शिस्त पाळणे अनिवार्य ठरते. परंपरा आणि आधुनिक विज्ञान यांचे संयुक्त स्वरूप म्हणजेच पंचगव्य औषधी आयुरकोरो ३ आहे. आयुर्वेदिक पंचगव्य औषध आयुरकोरो ३ हे

“गोमय वस्ते लक्ष्मी….गोमूत्र धन्वंतरी….”

या आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या या रचना सुत्राचा तर्क घेवून तयार करण्यात आले आहे.

गोमय म्हणजे गाईचे शेण. या औषधीशी शेणाचा संबंध नसला तरी शेती, नित्य आहार,पर्यावरण याविषयी नक्कीच याचा संबंध आहे. नित्य व्यवहाराचे चलन म्हणून कागदी नोटा आवश्यक आहेतच, या नोटा देऊन आपण दुकान किंवा शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करतो हे जरी व्यावहारिक दृष्टया सत्य असले तरी वास्तव काय आहे ?
धान्य हे जमिनीतून उगवते हे जरी खरे असले तरीही या जमिनीची उत्पादनक्षमता, तिची सुपीकता वाढविण्यासाठी शेणच खूप महत्वाचे ठरते. इतकेच नव्हे तर निसर्गचक्रातही शेणाचे महत्व याच कारणाने अत्याधिक आहे.

आधुनिक विज्ञान आधारावर निर्मित रासायनिक खते निसर्गाचे,भूमीचे शोषण करीत आहेत आणि त्यातून जमीनी कमी कसदार, नापीक होवून नवनवे रोग निर्माण होत आहेत यावर उपाय म्हणून पारंपरिक खतांचा वापर करून अर्थात गोमयाचा वापर करून सकस आणि आरोग्यवर्धक धान्य उत्पादन वाढविणे आवश्यक आहे, न कि रोगकारक ! “धान्यातून धन आहे, धनातून धान्य नाही” हे लक्षात घेतले पाहिजे, म्हणूनच
“गौमय वस्ते लक्ष्मी….”

दुसरे म्हणजे “गौमूत्र धन्वंतरी….”,
गोमूत्रामध्ये अनेक आजार बरे करण्याची क्षमता आहे, म्हणून त्यास देवांच्या वैद्याची म्हणजे धन्वंतरी यांची उपमा दिली आहे.

मानवी शरीर हे “वायु,अग्नी, जल,पृथ्वी आणि आकाश” या पंचमहाभूतांपासून बनलेले आहे. भारतीय परंपरेत आयुर्वेदिक उपचारात वैद्य प्रत्येक व्यक्तीची नाडी तपासून त्यावर औषधोपचार करतात. प्रकृती स्वास्थाकरिता योग्य आहार,व्यवहार आणि औषधोपचार केल्याने त्रिदोष संतुलित राखण्यास म्हणजेच आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. वर्षानुवर्षे भारतात औषधोपचाराचे हे शास्त्र वापरले जात आहे. विदेशी पाश्चात्य उपचार पद्धतीत मात्र केवळ लक्षणांच्या आधारावरच एकसारखी औषधे देण्यात येतात. साधन,संसाधनांचा मुबलक प्रमाणात पुरवठा होत असल्यामुळे शोध आणि तात्काळ परिणाम दिसून येत असल्याने स्वाभाविक या पाश्चात्य उपचार पद्धती प्रसिद्ध होवून प्रभावी वाटू लागतात. मात्र नफेखोरीच्या नावाखाली अडवणुक वा अन्य तत्सम कारणांसाठीही त्याचा गैरवापरही केला जात असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे त्याचा गैरवापर म्हणजेच विषाणुयुद्ध.

आयुर्वेदिक कितीही गैरवापर झाला तरी विषाणुयुद्ध यातून कधीच नाही होवु शकत, अशा विपरीत परिस्थितीत आपल्याला वरदान म्हणून लाभलेली आपली परंपरा पुन्हा एकदा या जागतिक महामारीमध्ये आधार बनून आपल्याला मदत करण्यासाठी पुढे आली आहे ती आयुर्वेदीय पंचगव्य औषधी “आयुरकोरो ३” या नावाने.

आयुर्वेदीय माहिती अभ्यास करीता संदर्भ म्हणून चरक संहिता या ग्रंथात महामारीच्या अनुभवावर आधारित “जनपदध्वंस” नावाच्या प्रकरणात असे म्हटले आहे कि “समाजातील लोकांची प्रकृती भिन्न असूनही जर जनसमुदायात एकाच प्रकारच्या आजाराची समान लक्षणे दिसल्यास एकाच प्रकारचे औषध विभिन्न प्रकृतीच्या लोकांना देखील चांगले आणि समान परिणामकारक ठरते” महामारीच्या पूर्वीच्या अनुभवावरून केलेल्या अभ्यासानुसार अधिकांश मानवी शरीरात वातदोष मोठ्या प्रमाणात निर्माण होतो आणि त्रिदोषांत वात दूषित होणे, हे गंभीर समस्येचे लक्षण असल्याचे मानले जाते. सध्याच्या या कोरोना महामारीमध्ये कफ दोष मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. कफाची वाढणारी गती ही सामान्यपणे श्वास घेण्यास बाधा उत्पन्न करते, ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजन कमी होऊन शरीरात गंभीर समस्या निर्माण होण्यास प्रारंभ होतो. अशावेळी गोमूत्र मधील औषधी घटक अत्यंत गुणकारी ठरतात. सध्याच्या शास्त्रीय परिभाषेत सांगायचे झाल्यास आतापर्यंत संशोधन केलेल्या ४०० हून अधिक विषाणूंना प्रतिकार करणारी नैसर्गिक शक्ति गोमूत्रात अंतर्भूत असल्याचे निष्पन्न झाले आहे. याच कारणाने अमेरीकासारखा देशही याचे पेटंट मिळावेत याकरिता उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.

केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाकडे अंतिम मान्यतेच्या प्रतिक्षेत हे फक्त एकच दिवस घ्यायचे औषध आहे. यातील औषधी घटकांना राज्य सरकारच्या अन्न आणि औषधी विभागाकडून रोगप्रतिरोधक म्हणून संमती मिळाली आहे. अशा औषधांचा संच आयुरकोरो ३ या नावाने स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून लोकहितार्थ मोठ्या प्रमाणात वितरित केले जात आहेत. केवळ एक दिवसाच्या औषधाच्या सेवनाने सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना या महामारीचे संक्रमण होऊ नये याकरिता देखील आयसीएमआरच्या नियमांनुसार जे वैद्यकीय परीक्षण (Clinical Trial ) करण्यात आले आहे, त्यातही हे औषध यशस्वी झाले आहे. या औषधामध्ये मानवी शरीराला हानी पोहोचविणाऱ्या जीवाणूंना अटकाव घालणारे घटक, तसेच विषाणूंना नष्ट करणाऱ्या घटकांचा समावेश आहे. प्रक्रिया युक्त गौमूत्र अर्क आणि इतर सहाय्यक औषधीच्या मिश्रणामधुन केलेल्या औषधी या औषधी संचामध्ये अंतर्भूत आहेत. आतापर्यंत १ लाखाहून अधिक जणांनी या औषधाचा लाभ घेतला आहे.

आयुष मंत्रालयात मात्र आयुर्वेद,होमियोपथी,सिद्ध,यूनानी इ. पारंपरिक उपचार पद्धतीतून आलेल्या ३ हजारांहून अधिक प्रस्तावातील फक्त सिद्ध उपचार पद्धती मधील एका औषधीला ते ही आयुष मंत्रालयाच्या स्वतःच्याच आयुष – ६४ या औषधाला कोरोना वर उपचार म्हणून संमती भेटली आहे. त्याव्यतिरिक्त अजुन एकाही शोध प्रस्तावाला संमती मिळाली नसून आयुरकोरो ३ ही त्याच प्रतिक्षा सूचित आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयाची परवानगी येईतो पर्यंत रोगप्रतिरोधक म्हणून हा औषधी संच आपण उपयोगात आणू शकतो.

केंद्रीय आयुष मंत्रालयात संयुक्त उपचार हेतु मान्यतेकरिता प्रतिक्षेत असलेल्या या औषधीच्या संशोधन प्रक्रियेत आयआयटी- बॉम्बे च्या संशोधकांनी बाह्य दृष्टया खुप सहाय्य केले आहे. या औषधीची तीन तीन वैद्यकीय परीक्षण यशस्वी झाली असून ती “भक्तिवेदांत रुग्णालय व संशोधन केंद्रामार्फत” करण्यात आलेली आहेत. “श्री सर्वेश्वर सेवा सहकार संस्थे” द्वारे प्रचारित हे औषध राज्य सरकारकडून प्राप्त झालेल्या “रोगप्रतिरोधक औषध संच” अशा मर्यादित अनुमतीच्या आधारावर लाखो लोकांना आलेल्या चांगल्या अनुभवानंतर आता मात्र करोडो लोकांचे रोगनिवारण करण्यासाठी सिद्ध झाले आहे. जीएमपी श्रेणीची मान्यता प्राप्त असणारा, रोज एक लाख किटच्या निर्मितीची क्षमता असणारा अद्ययावत यंत्रांनी सज्ज असा कारखाना ही औषध निर्माण करण्यास अहोरात्र झटत आहे.

औषधी ग्रहण आणि पथ्य याविषयी अधिक माहिती करीता प्रत्येक औषधी संचासह एक छापिल प्रत दिली आहे. सौम्य आणि मध्यम लक्षणा व्यतिरिक्त गंभीर लक्षण असलेल्या रुग्णानी अथवा त्यांच्या नातेवाईक यांनी वैद्यकीय सल्ला घ्यावा त्यासाठी डॉक्टर हेल्पलाइन क्रमांक दिला आहे.

या विषयातील संशोधन आणि व्यवस्थापनास जर योग्य शासकीय सहाय्यता मिळाल्यास अगदी नाममात्र दिवसात कोरोना मुक्तिचा लढा भारतातच नव्हे तर अगदी विश्वात यशस्वी होवू शकतो असा विश्वास वाटतो. तसेच वर्तमाना सहित भविष्यात येणाऱ्या प्रत्येक विषाणूंविरोधातील लढ्यासाठी आपण सज्ज होऊन स्वतःसोबतच भारताच्या वर्तमानाला आणि भविष्याला गौमातेचा आधार देवून संपूर्ण जगाला दिशा द्यायला नक्की सिद्ध होवू शकतो अशी आशा बाळगायला हरकत नसावी.

अधिक माहिती करीता संपर्क करावा.
श्री सर्वेश्वर सेवा सहकार संस्था
७२०८७८१२१२

Back to top button