NewsSeva

रा. स्व.संघ दांडेश्वर भागाच्यावतीने ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर उपलब्ध

मुंबई, दि. २४ मे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ  दांडेश्वर भाग – सेवा विभागाच्यावतीने  गरजू रुग्णांकरिता ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर  (५ लीटर) आणि  सिलेंडर (४७ लीटर) ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे . ही  सेवा नि:शुल्क असून, अनामत रक्कम मात्र भरावी लागणार आहे.  

सांताक्रूज (पश्चिम) येथील चंचल स्मृति, दुसरी गावठाण लेन येथे ही सेवा उपलब्ध करण्यात  आली आहे. संपूर्ण  बुकिंग आणि पैसे पुन्हा मिळवण्याची  प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे.  अधिक माहितीसाठी तसेच  फॉर्म भरण्यासाठी  www.mtdngo.org या लिंक चा उपयोग करायचा आहे.  संपर्क – सोनू कळसे   (9869658485 (ऑक्सीजन मशीन वितरण प्रमुख)

Back to top button