Health and WellnessOpinion

पंचगव्य आणि ओझोन वायूपासून तयार केलेले ‘आयुर व्हायरोनील’ ठरतेय संजीवनी

संपूर्ण जग कोरोना महामारीशी लढा देत आहे. कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येक पातळीवर प्रत्येक जण  आपापल्या परीने प्रयत्न करीत असताना दिसत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातही यावर संशोधन सुरु आहे. दरम्यानच्या काळात लसी आल्या. लसीकरणही मोठ्या प्रमाणावर होऊ लागले. जगातील इतर देशांप्रमाणे आपल्या भारतानेही लसीकरणाचा वेग पकडला आहे. कोरोनावर मात करत असतानांच  कोविड १९  या विषाणूची वंशावळ म्हणजे अनेक जाती-उपजाती तयार झाल्या आहेत. त्यावर कोणतेही विशिष्ट औषध सध्या उपलब्ध नाही. त्याच्यामुळे उद्भवणारे आजार खूप गंभीर स्वरूप धारण करीत आहेत. आज उपलब्ध केलेली लस ही कोविड १९ या विषाणूसाठी मर्यादित यश देणारी आहे. पण कोविड १९  व्यतिरिक्त कोविडच्याच  इतर जाती- प्रजातीमुळे उद्भवणाऱ्या इतर आजारांचे काय, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. मात्र आयुर्वेदाने या प्रश्नाचीही उत्तरे दिली आहेत. कोरोनावर अत्यंत उपयुक्त अशा पंचगव्य आणि ओझोन वायूपासून तयार करण्यात आलेले ‘आयुर व्हायरोनील’ हे औषध या याकरिता संजीवनी ठरत आहे.   

कोथरूड-पुणे येथील आयुर्वेदाचार्य डॉ. दिलीप कुलकर्णी यांनी या विषयावर अभ्यास व संशोधन करून ‘आयुर व्हायरोनील’ हे औषध तयार केले आहे. ही औषधे आयुर्वेदोक्त औषधी द्रव्ये, पंचगव्य (देशी गायीचे दूध, दही, तूप, गोमूत्र व गोबर) आणि ओझोन वायू यापासून तयार केलेली आहेत. यामध्ये कोणतेही रासायनिक द्रव्य वापरलेले नसल्यामुळे हे अत्यंत सुरक्षित असून त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. आतापर्यंत सुमारे २० हजारांहून अधिक जणांनी या औषधाचे सेवन केले असून या सगळ्यांना त्याचा अपेक्षित फायदा झाला असल्याचे  डॉ. दिलीप कुलकर्णी सांगतात. 

आयसीएमआर (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) च्या नियमानुसार सिटीआरआय (क्लिनिकल ट्रायल्स रजिस्टरी इंडियन) कडे नोंदणी करून लोकमान्य रुग्णालय, चिंचवड (पुणे) येथे या औषधाच्या क्लिनिकल ट्रायल्स  घेण्यात आल्या. त्यामध्ये याची उपयुक्तता सिद्ध झाली आहे. सादर करण्यात आलेल्या  लेखी रिपोर्टप्रमाणे शासकीय प्रमाणित औषधांपेक्षा हे पंचगव्य आधारित औषध अत्यंत उत्तम, सुरक्षित व परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले असल्याचेही डॉ. कुलकर्णी सांगतात.

या एकाच औषधात तीन प्रकारचे गुणधर्म आढळून येतात. यामध्ये शरीराची प्रतिकारशक्ती वाढविणे, रोग होऊ नये म्हणून प्रतिबंध आणि रोग झाला असल्यास उपचारात्मक अशा गुणांचा अंतर्भाव आहे. इतर कोणताही आजार असला तरीही हे औषध घेता येते. केवळ गर्भवती महिला हे औषध घेऊ शकत नाहीत.

आयुर व्हायरोनील संच मध्ये कोरोनील १ + कोरोनोझ १ + कोरिपेल  १ अशा तीन औषधांचा समावेश असून हे औषधे. सर्व प्रकारच्या विषाणूंवर उत्तम प्रकारे उपयुक्त ठरत आहेत.   आजाराची काही लक्षणे दिसत असतील किंवा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास आयुर कोरोनील १ हे औषध गुणकारी आहे. उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक अशा दोन्ही प्रकारे हे औषध कार्य करते. कोरोनोझ मुळे श्वसनमार्गाचे शुद्धीकरण, तोंडाची चव व नाकाचा वास परत येण्यासाठी हे औषध बाह्योपचार म्हणून वापरता येते. कोरिपेल हे मास्कवर टाकावयाचे औषध असून यामुळे कोरोना होण्याचा धोका ५० टक्के कमी होतो. पंचगव्य आणि ओझोन वायूपासून निरामय चूर्णही तयार  करण्यात आले आहे. हे चूर्ण प्रतिबंधक म्हणून कार्य करते.

संभाव्य तिसरी लाट ही लहान मुलांसाठी जास्त धोकादायक आहे, असा अंदाज आहे. त्यासाठी ६ महिने वयाच्या बाळापासून ते ५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ‘बाल आरोग्य रक्षक’ हे औषध डॉ.  कुलकर्णी यांनी  तयार केले आहे.

कॅन्सर या अत्यंत दुर्धर आजारामधील दुर्धर अवस्था म्हणजे मेटास्टेसीस. ही अवस्था येऊ नये म्हणून डॉ.दिलीप कुलकर्णी यांनी संशोधन करून “पंचगव्य आधारित ओझोन चिकित्सा” ही पध्दत शोधून काढली. याला अतिशय उत्तम यश प्राप्त झाले आहे. अशा प्रकारची चिकित्सा करणारे ते जगातील एकमेव डॉक्टर आहेत.  हाच विषय कोरोनासाठी घेऊन त्यांनी आयुर व्हायरोनील या औषधाची निर्मिती केली.  

कोरोनावर अत्यंत उपयुक्त अशा पंचगव्य आणि ओझोन वायूपासून तयार  केलेले ‘आयुर  व्हायरोनील’ हे औषध कोरोनावर यशस्वीपणे मात करत आहे.   कुठलेही दुष्परिणाम होत नसलेले हे  औषध पुन्हा एकदा मोकळा श्वास घेऊन आनंदाने जगण्यास नक्कीच वाव देणारे आहे…!

**

Back to top button