EnvironmentOpinion

पर्यावरण अनुकूल प्रकल्प राबविणे आवश्यक !

 मानवाचा जन्म होण्यापूर्वी पृथ्वीवर प्रदूषण आणि पर्यावरणाशी संबंधित इतर समस्या नव्हत्या.  या सर्व समस्या मनुष्याने आपल्या कृतीतून आणि निष्क्रियतेतून घडवून आणल्या आहेत. या समस्येवर योग्य तोडगा शोधून काढण्यासाठी या वर्षीचा जागतिक पर्यावरण दिनाचा विषय  ‘इकोसिस्टम’ अर्थात ‘नैसर्गिक  परिसंस्थांचे पुनरुज्जीवन’  यावर विशेष भर द्यावा लागणार आहे. नैसर्गिक  परिसंस्थांचे पुनरुज्जीवन करणे ही   प्रत्येकाची जबाबदारी असून प्रत्येकाने त्याची अंमलबजावणी कशी होईल, यावर कटाक्षाने लक्ष देणे आवश्यक आहे. किंबहुना ती प्रत्येकाची  जबाबदारी आहे. पर्यावरणातील  ‘इकोसिस्टम’ जर बिघडली   किंवा त्याकडे आपण दुर्लक्ष केले तर  निसर्ग चक्रीवादळ, भूकंप आणि साथीच्या रोगांसारख्या रौद्र रूप धारण केल्याशिवाय राहणार नाही. 

दैनंदिन जीवनातील आपल्या  क्रिया वा आपल्या निष्क्रियता या आपल्या विचार आणि भावनांमधून प्रकट होत असतात.   उदा.  धूर येताना पाहणे, एखाद्या वायूची गळती होणे  वगैरे सारख्या गोष्टी घडत असतील तर त्या आपल्याला सहज दिसतात आणि आपण त्याला अनुसरून तसे कार्यही करतो.  काही गोष्टी या कमी दृश्यमानअसतात, ज्या पटकन दृष्टीस येत नाहीत. पाणी, इंधन, वीज, जागा, वेळ, धातू यासारख्या  बऱ्याच गोष्टींचा अपव्यय हा  आपल्या नकळत होत असतो. त्यांचे संवर्धन करण्यासाठी  योग्य ती  खबरदारी घेणेही आवश्यक ठरते.  पुनर्वापर आणि  पुनर्प्रकिया या  पर्यायांवर जास्तीत  जास्त भर दिला तर  या   गोष्टींचा अपव्यय न होण्यास मदत होऊ शकते. 

कमीत कमी वापर – पुनर्वापर – पुनर्प्रकिया या  तत्त्वाचे एक चांगले उदाहरण म्हणजे जळगावच्या शेतकऱ्यांचे देता येईल.  हे शेतकरी केळीचे घड सोलून, ते सुकवून त्याची पावडर तयार करतात आणि मग या केळीची वाहतूक करून मुंबई व इतर शहरांना पुरवतात. . देठ, सोलणे आणि ते सुकवल्यामुळे  उत्पादनाचे वजन घटते.  त्यामुळे माल वाहतुकीचे काम करणारा  एक ट्रक  एकाच वेळी जास्तीत जास्त  केळ्याची मालवाहतूकी करत आहे.  यामुळे वाहतुकीसाठी येणाऱ्या खर्चातही  मोठ्या प्रमाणात बचत होते आणि परिणामी प्रदूषणही कमी होते. हे तत्व इतरही  पिकांना लागू होऊ  शकते.

भारत हा देश  जगातील सर्वात मोठा कागद  उत्पादक देश आहे. कृषी कचरा आणि पुनर्वापरातून वापरल्या जाणार्‍या कागदामुळे जगातील असंख्य झाडे आणि जंगले वाचवण्यास मदत झाली आहे.   अयोध्यामधील यश पेपरच्या  प्लास्टिक वेअरची जागा मोठ्या प्रमाणात डिस्पोजेबल पेपर पल्प वेअरने घेतली आहे. 

प्राचीन भारतातील  विचारवंत हे  पूर्वी काय घडले होते  आणि पुढे काय घडेल याचा सारासार  विचार करीत.  निसर्गाची उपासना करत आणि निसर्गाकडून प्रेरणा घेत. त्यांनी निसर्गामध्ये अंतर्भूत असलेल्या दैवी बुद्धिमत्तेचा शोध घेतला आणि त्याचा तसा उपयोग केला. निसर्गाकडून जे घेतले ते पुन्हा त्याला बहाल  केले. निसर्गाची हानी होऊ दिली नाही.   उदाहरणार्थ, – मातीपासून भांडी बनविणे. या भांड्यांच्या वापरानंतर त्याचे चिखलात रुपांतर केले जात.  प्राणी आणि शेतीच्या कचर्‍यावर पुनर्प्रक्रिया करून खत बनविले जात.  अयोध्या येथे साईदाता आश्रम सारखा मोठा समुदाय आहे. २०२१ मध्येही तेथील लोक पैसा, वीज किंवा इतर आधुनिक ‘चैनीच्या वस्तू’ न वापरता समग्र जीवन जगत आहेत. कोविड महामारीने आपल्याला  कमीत कमी साधनांचा वापर करण्यास शिकविले आहे. या महामारीत लॉकडाउन मुळे  वाहनांची  वर्दळ कमी झाली आहे    त्यामुळे प्रदूषण कमी झाले आहे. प्रदूषण कमी झाल्यामुळे सहारनपूर येथील नागरिकांना  45 वर्षांनंतर प्रदूषणविरहित हिमालय पाहता येणे शक्य होत आहे. 

घरबसल्या  रोजगार उपलब्ध करून देणे या कल्पनेचे अनुसरण भारतात  अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. भारतातील  घरांमध्ये एखाद्या कारखान्याप्रमाणे वस्त्र, भांडी, फर्निचर व इतर वस्तूंचे उत्पादन  करण्यात येत.  प्रत्येक गावाला त्याच्या एखाद्या वैशिष्टयपूर्ण वस्तू बनविण्यासाठी ओळखले जात. हजारो वर्षांच्या व्यवसायानंतर महाराष्ट्रातील पैठण हे गाव आजही आपल्या अनोख्या प्रकारच्या साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. कच्छतील प्रत्येक खेडे हे आपल्या खास उत्पादनाकरिता आणि डिझाइनसाठी प्रसिद्ध आहे.

एक्सेल इंडस्ट्रीजचे  के. सी.  श्रॉफ यांनी कच्छ जिल्हा दत्तक घेतला.  त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने आपल्या गावात कारागीरांना कच्च्या मालाचा  पुरवठा करण्यासाठी आणि जगभरातील त्यांच्या उत्पादनांच्या बाजारपेठासाठी ‘श्रुजन’ची स्थापना केली. महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून ‘श्रुजन’ने शेकडो खेड्यांमध्ये सामाजिक आणि आर्थिक क्रांती घडवून आणली. अशीच क्रांती उत्तर भारतातील जयपूर रग्जचे   नंद किशोर चौधरी यांनी गावोगावी हातांनी बनवलेल्या गालिच्यांची  कला पुनरुज्जीवित केली आहे. ही कंपनी खेड्यातल्या घरांमध्ये आवश्यक असलेली यंत्र आणि इतर उपकरणे बसवते आणि कच्च्या मालाच्या सामग्रींचे वितरण करते.  आंतरराष्ट्रीय दर्जाचे डिझाइनर आणि विपणन कर्मचारी इथे घडविले  जातात.    

वर्तमान काळातील आधुनिक माणूस हा असा चहुबाजुंनी विचार करताना आढळत नाही. आपल्या संशोधनाच्या अतिवापरामुळे भविष्यात त्याचा काय परिणाम होईल,  याचा विचार केला जात नाही.  याचे उत्तम उदाहरण म्हणजेच  प्लास्टिक आणि अणू कचरा.   आपण ज्या जगात राहत आहोत तेथे  पक्षी देखील स्वच्छंदी आयुष्य जगताना दिसतात.  त्यांच्याकडे सरकार, पोलीस, सैन्य, रुग्णालये किंवा रेडिमेड घरे नाहीत. तरीही त्यांची तक्रार नाही. ते स्वयंपूर्ण आहेत. पण अधिक सक्षम मेंदू असलेल्या मनुष्य  मात्र तक्रार आणि विव्हळणे याला कधीही कंटाळलेला दिसत नाही.   याचे कारण म्हणजे त्यांना अधिकाधीक यशस्वी व्हायचे आहे, प्रगती करायची आहे.    स्वाभाविकपणे हे योग्य देखील आहे,  परंतु याकरिता  मानवी बुद्धिमत्तेची जी खरी आवश्यकता आहे  ती  पूर्णपणे अपयशी ठरत आहे. 

आणखी एक उदाहरण,  आपण कधीही एखादे झाड दुसर्‍या झाडाला धक्का देऊन स्वतः वाढत असल्याचा प्रयत्न करत असताना पाहिले आहे का ? कोणतेही झाड नेहमीच आपल्यात अंतर राखूनच वाढते. ती अंतःप्रेरणा किंवा दैवी बुद्धिमत्ता आहे. पण दुसरीकडे मनुष्य मात्र जिथे आधीपासून इतर कोणीतरी असताना देखील जात असल्यामुळे  अनावश्यक गर्दी, स्पर्धा,  दारिद्र्य, रोग, प्रदूषण आणि त्रास यासारख्या  अनेक त्रासांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे.  

यशाचे मानकरी होण्यासाठी,  जिंकण्यासाठी जगण्याची धोरणे जाणून घेणे आवश्यक ठरते. आपल्या जन्मावेळी आपल्याला  विनामूल्य मिळालेल्या देणगीबद्दल कायम  जागरूक राहायला हवे.   आपल्याकडे सर्वात आधुनिक, शक्तिशाली आणि अष्टपैलू सुपर संगणक (मेंदू), व्हिडिओ कॅमेरे (डोळे ), ऑडिओ सिस्टम (कान) आहेत. वास रेकॉर्डर (नाक), चव रेकॉर्डर (जीभ), तापमान  रेकॉर्डर (त्वचा) आहे.  निसर्गाने तयार न केलेल्या गोष्टी ज्याला आपण कृत्रिम असे

संबोधतो अशा वस्तू तयार  करण्यासाठी,  नवीन कौशल्ये शिकण्यासाठी हात दिले आहेत.

सूर्यप्रकाश,  पिण्यासाठी भरपूर पाणी, प्राणवायू, फळे, धान्य, दूध, अंडी, खाण्यासाठी मांस, निवारा तयार करण्यासाठी लाकूड  इ. सर्व काही निसर्गाकडून आपल्याला वरदान म्हणून लाभले आहे. त्यामुळे निसर्गाचे ऋणी राहणे हे आपले आयुष्यभराचे कर्तव्य आहे.  आपण ज्यामध्ये सक्षम आहोत. त्या कार्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.  सेवा देणारे किंवा  उत्पादन निर्माण करणारे व्हायला हवे. गरजू लोकांना मदत करायला हवी. आपल्या कष्टाचे फलित हे कधीच व्यर्थ जात नाही.  त्यामुळे छोट्याछोट्या गोष्टींतूनच सुरुवात करून स्वतःला, समाजाला आणि पर्यायाने निसर्गालाही वाचवायला हवे. ते आपल्याच हातात आहे.

– सुरेश पंडित (कंपनी व्यवस्थापन सल्लागार)  

Back to top button