News

‘नासा’ करणार कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी संस्कृतचा वापर

बुद्धिजीवी वर्गामध्ये संस्कृतला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संस्कृत प्राचीन भाषा असूनही, या भाषेमध्ये काही आश्चर्यकारक वैशिष्ट्ये आहेत जी विविध क्षेत्रांमध्ये उपयुक्त मानली जातात. संस्कृतचा उपयोग मानसशास्त्रातील उपचार पद्दतींसाठी आणि आध्यात्मिक मार्गातही केला जातो. परंतु कृत्रिम बुद्धिमत्तेत संस्कृतचा होणारा उपयोग हा मैलाचा दगड ठरणार आहे.

संस्कृत मधील व्याकरण हे मशीन लर्निंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी योग्य ठरले आहे. इतिहासकार आणि सर्वसामान्य यांच्या मते, संस्कृतचा वापर हा कृत्रिम बुद्धिमान मशीन मध्ये करणे उपयुक्त असून त्यानिमित्ताने इतिहासात पुन्हा एकदा डोकावले जाईल. ज्याचा भविष्यासाठी नक्कीच फायदा होईल. .

नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अडमिनिस्ट्रेशन (नासा) आणि संस्कृतचे नाते तसे नवीन नाही. 1985 मध्ये नासाचे संशोधक, रिक ब्रिग्स यांनी एक शोधनिबंध लिहिला होता. आर्टिर्फिशियल इंटेलिजन्सी या विज्ञान विषयावर आधारित मासिकात तो प्रकाशित झाला होता. यामध्ये रिक यांनी नॉलेज रिप्रेझेंटेशन इन संस्कृत अँड आर्टिर्फिशियल लँग्वेज या शीर्षकाच्या लेखात अनेक मुद्दे लिहिले होते, जे कम्प्युटरसोबत संवाद साधण्यासाठी नैसर्गिक भाषेच्या वापराबद्दल होते. प्राचीन भाषांपैकी एक आणि लिपीबाबत खूप समृद्ध असल्यामुळे संस्कृत भाषेचा उल्लेख इथे झाला.

रिक शोधनिबंधात यांनी लिहिले आहे की, कॉम्पुटिंग प्रोग्रॅममध्ये नैसर्गिक भाषा ट्रान्समिशनसाठी अधिक सोयीची असते. संस्कृत ही एक भाषा आहे, जी हजारो वर्षांपासून जिवंत आहे आणि ज्यात मोठ्या प्रमाणात साहित्यदेखील उपलब्ध आहे. नैसर्गिक भाषा या आर्टिफिशियल लँग्वेजच्या जागी कशा आणल्या जाऊ शकतात हे ही त्यांनी यात सांगितले आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मशीन कॉम्प्युटिंगमध्ये रुपांतरित करता येणाऱ्या भाषेसाठी जवळपास २० दशकांपूर्वीपासून नासा यावर शोध घेत आहे. पुष्कळ पैसे, वेळ आणि साधनसामग्री यावर खर्च करण्यात आली आहे. यावरून नासाची संस्कृतबद्दल आवड दिसून येते तसेच यावरील संशोधनही नासाद्वारे अनेक स्तरांवर प्रामाणिकपणे केले जात आहे.

सध्या, नासा अंतराळ संवादासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर देखील काम करत आहे. नासामध्ये “कृत्रिम बुद्धिमत्ता विकास” हा विषय कधीच बंद झाला नसल्याचा हा स्पष्ट पुरावा आहे..

Back to top button