EnvironmentOpinion

कडुलिंब – जगातील सर्वांत प्रभावी सॅनिटायझर

अनेक पुराव्यांच्या आधारे हे दिसून आले आहे की, ७०%पेक्षा अधिक औषधे निसर्गापासून मिळतात. ५०%पेक्षा जास्त लोक आजही त्यांच्या आरोग्याच्या प्राथमिक गरजांसाठी झाडांवर अवलंबून आहेत. असाच एक मौल्यवान औषधी वृक्ष म्हणजे, महोगनी वर्गात मोडणारा कडुलिंब. हा वृक्ष उपोष्णकटिबंधीय समशुष्क आणि शुष्क प्रदेशांत वाढतो.

कडुलिंब मानवाला ज्ञात असलेल्या सर्वांत जुन्या, ‘सिद्ध’ या उपचारपद्धतीत सर्वांत प्रथम उल्लेख केलेल्या वृक्षांपैकी एक आहे हा वृक्ष भारतीय संस्कृतीत सर्वांत जास्त मान्यता पावलेल्या वृक्षांपैकी एक आहे. डासांना पळवून लावणे आणि तापावर गुणकारी असणे हे याचे उपयोग १८०३ मध्ये समोर आले. पर्शियन भाषेत कडुलिंबाला ‘आझाद दिरख्त’, म्हणजेच मुक्त वृक्ष असे म्हणतात, तर, स्वाहिली भाषेत यास ‘मुआरुबैनी’, म्हणजे ४० आजारांवर गुणकारी असे म्हटले जाते.

हा वृक्ष मूळचा म्यानमार येथील आहे; परंतु भारत, आफ्रिका, मध्य अमेरिका, कॅरिबियन प्रदेश आणि फिलिपाईन येथेसुद्धा याचा प्रसार झाला. कडुलिंब सदाहरित वृक्ष आहे, त्याचा घेर गोलाकार असतो, ३० सेमी पेक्षा मोठ्या असणाऱ्या देठाच्या दोन्ही बाजूंनी काहीशी मोठी अशी पाने असतात. छोट्या आणि काहीसा गंध असणाऱ्या पांढऱ्या फुलांच्या रूपात बहर दिसून येतो, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात फुले येतात. पाचव्या वर्षापासून झाडाला पिवळी, दोन सेमीपेक्षा मोठी ऑलिव्हसारखी फळे येऊ लागतात. एका पांढऱ्या टणक कवचामध्ये बदामसदृश एक अथवा दोन बिया असतात. बियांमध्ये मोठ्या प्रमाणावर azadirachtin द्रव असते, जो की कडुलिंबाचा सर्वांत उपयोगी आणि वैशिष्ट्यपूर्ण घटक आहे. हा वृक्ष विविध छोट्या आणि गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी आशिया आणि आफ्रिकेमध्ये वापरला गेला आहे.

कडुलिंबाच्या लाकडाला वाळवी लागत नाही, त्यामुळे फर्निचर आणि कलाकुसरीच्या वस्तुंमध्ये त्याचा वापर केला जातो. याच्या सालींमधे मोठ्या प्रमाणात टॅनिन मिळते आणि ती कपड्यांना लाल रंग देण्यासाठी वापरली जाते. बियांमधील तेल आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी औषधांमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते. या झाडाची फळे, फुले, पाने आणि मुळ अनेक आजारांवरील उपचारांसाठी वापरली जातात.

आज कडुलिंबाच्या तेलापासून काही शुद्ध स्वरूपातील संयुगे वेगळी काढली जातात, उदा., निंबीन, निम्बिनीन, निंबीडीन, इ. पण, ‘azadirachtin’ या घटकापासून इतर पदार्थांचे सर्वांत जास्त उत्पादन केले जाते. या कडुलिंबाच्या संयुगांचे मानवी आरोग्याला अनेक उपयोग आहेत, उदा., कडुलिंबाची फळे, फुले, खोड आणि मूळ बुरशीजन्य संसर्ग, दाह आणि जिवाणूजन्य संसर्ग नष्ट करतात असे दिसून आले आहे. कडुलिंब अर्कामध्ये प्रतिग्रंथी (antitumor) आणि संसर्ग रोखणारे (antiproliferative) गुणधर्मसुद्धा आढळून आले आहेत. यामध्ये प्रकार दोन मधुमेहास निरस्त करण्याचीसुद्धा क्षमता दिसून आली आहे.(सक्सेना अँड विक्रम,२००४). कडुलिंबाचे विविध अवयव अनेक मानवी रोगांवर पूर्वीपासून वापरात आहेत. उदा., लाखो लोक कडुलिंबाच्या काड्यांचा वापर दात घासण्यासाठी करतात.कडुलिंबाचे रोगनिवारक उपयोग चेन्नई येथील ‘सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिन अँड रिसर्च (सीटीएमआर)’ येथील लायब्ररीमध्ये जतन करून ठेवलेल्या एका ३५० वर्ष जुन्या ताडपत्रावरील हस्तलिखितामध्ये नोंदवलेले आहेत. हे हस्तलिखित कडुलिंबाचे पुढील उपयोग स्पष्ट करते : (१) पित्ताच्या समस्यांचा प्रतिबंध आणि त्यांच्यावर उपचारासाठी फुलांचा उपयोग (२) जखमा, व्रण, इ. वर उपचारासाठी पाने (३) मज्जासंस्था समस्या, पक्षाघात, मानसिक विकार,इ. वर उपचारासाठी सालीचा उपयोग .

कडुलिंब हा देवी आणि इतर संसर्गजन्य रोगांसाठी प्रतिबंधक आहे. मूत्रमार्गातील समस्या, कुष्ठरोग, जठर आणि आतड्यासंबंधी आजार,केसांच्या समस्या, व्रण, मधुमेह आणि रक्तदाब यावरील उपचारासाठीसुद्धा कडुलिंब वापरला जातो. दुष्ट शक्तींचा बिमोड करण्यासाठी कडुलिंबाचा वापर परंपरेने केला जातो. नायजेरिया, भारत आणि आशियाच्या इतर भागांमध्ये मलेरियावर उपचारासाठी कडुलिंब वापरला जातो. पलंग, पुस्तके, धान्याचे दाणे, कपाट, खोल्या, इ. मधून किडे नष्ट करण्यासाठीसुद्धा कडुलिंब वापरला जातो. इंडोनेशियामध्ये कडुलिंबाचा उपयोग मधुमेह, डोकेदुखी, छातीतील जळजळ, यासाठी केला जातो, तसेच मूत्रकारक आणि क्षुधा उत्पादक म्हणूनही केला जातो.

कडुलिंब अर्काच्या आयुर्वेदीय आणि शेतकी उपयोगावर बरेच साहित्य उपलब्ध आहे. आधुनिक विज्ञानाने कडुलिंबाचे औद्योगिक आणि पर्यावरणीय उपयोग यावर पुनःसंशोधन केले आहे.

शेळीसाठी प्रथिनयुक्त चारा म्हणून कडुलिंबाची पाने वापरणे वजन वाढवण्यासाठी एखाद्या बाजारू काँसंट्रेट केलेल्या मिश्रणाच्या बरोबरीने परिणाम दाखवते, असे दिसून आले आहे, त्यामुळे हि पाने अशा औषधांऐवजी वापरली जाऊ शकतात.

अभ्यासाने स्पष्ट होते आहे की, कडुलिंब हा कर्करोगावरील पर्यायी उपचारांमध्ये एक महत्त्वाचा सोर्स ठरतो. एक नैसर्गिक संसाधन म्हणून कडुलिंबापासून मिळवलेली संयुगे ही सुलभ उपलब्धता, अल्प खर्च आणि मानवासाठी सुरक्षित असणे, इ. मुळे कोणत्याही उपचारांसाठी बहुमूल्य ठरतात. कडुलिंब अर्कातील प्रतिकर्करोगी गुणधर्म हे कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखणे, त्या पेशी नष्ट करणे आणि रोगप्रतिकारक शक्तीला चालना देणे, यासाठी उपयोगास येतात. कडुलिंब अर्क हा चांगल्या पेशींना कमीत कमी दुष्परिणाम करून कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य बनवतो.

कडुलिंबातील बायोऍक्टिव घटक अजून स्पष्ट झालेले नसल्याने, त्यातील प्रतिकर्करोगी घटकांविषयी अजून अभ्यास व्हायला हवा.

संदर्भ : Agrawal, S., Popli, D. B., Sircar, K., & Chowdhry, A. (2020). A review of the anticancer activity of Azadirachta indica (Neem) in oral cancer. Journal of Oral Biology and Craniofacial Research, 10(2), 206-209. doi:10.1016/j.jobcr.2020.04.007

Chen, N., Kamath, S.G., Xiong, Y., Wenham, R., Apte, S., Humphrey, M., Cragun, J., Lancaster, J.M., Gedunin, a novel natural substance, inhibits ovarian cancer cell proliferation, Int. J. Gynecol. Cancer 19, 1564–1569.

Dida, M. F., Challi, D. G., & Gangasahay, K. Y. (2019). Effect of feeding different proportions of pigeon pea (Cajanus cajan) and neem (Azadirachta indica) leaves on feed intake, digestibility, body weight gain and carcass characteristics of goats. Veterinary and Animal Science, 8, 100079. doi:10.1016/j.vas.2019.100079

Gahukar, R. (2014). Factors affecting content and bioefficacy of neem (Azadirachta indica A. Juss.) phytochemicals used in agricultural pest control: A review. Crop Protection, 62, 93-99. doi:10.1016/j.cropro.2014.04.014

Girish, D., Vivek, D. S., Sruthi, T., Rao, C. K., & Vangalapati, M. (2019). Synthesis And Characterization Of Silver Nanoparticles Using Acidified Neem Saw Dust. Materials Today: Proceedings, 18, 5000-5005. doi:10.1016/j.matpr.2019.07.493

James, S.P., Lond, M.B. (1903) The Basil and the Neem. British Medical Journal, 1, p. 677

Mahara, M., & Singh, Y. (2020). Tribological analysis of the neem oil during the addition of SiO2 nanoparticles at different loads. Materials Today: Proceedings, 28, 1412-1415. doi:10.1016/j.matpr.2020.04.813

Marichelvam, M., & Azhagurajan, A. (2018). Removal of mercury from effluent solution by using banana corm and neem leaves activated charcoal. Environmental Nanotechnology, Monitoring & Management,10, 360-365. doi:10.1016/j.enmm.2018.08.005

McDonald, P., Edwards, R.A., Greenhalgh, J.F.D., Morgan, C.A. (2002) Animal nutrition 6th edition, Pearson Educational Limited, Edinburgh, Great Britain

Reuter, S., Ghosh, D., Bose, A., Haque, E., & Baral, R. (2006). Pretreatment with neem (Azadirachta indica) leaf preparation in swiss mice diminishes leukopenia and enhances the antitumor activity of cyclophosphamide. Phytotherapy Research, 20(9), 814-818. doi:10.1002/ptr.1948

Rinaldi, F., Hanieh, P.N., Longhi, S., Carradori, S., Secci, D., Zengin, G., Ammendolia, G.N., Mattia, E., Favero, E.D., Marianecci, C., Carafa, M. (2017) Neem oil nanoemulsions: characterization and antioxidant activity J. Enzym. Inhib. Med. Chem., pp. 1265-1273

Saxena, A., & Vikram, N. K. (2004). Role of Selected Indian Plants in Management of Type 2 Diabetes: A Review. The Journal of Alternative and Complementary Medicine, 10(2), 369-378. doi:10.1089/107555304323062365

Sharma, C., Vas, A.J., Goala, P., Gheewala, T.M., Rizvi, T.A., Hussain, A. (2014). Ethanolic neem (Azadirachta indica) leaf extract prevents growth of MCF-7 and HeLa cells and potentiates the therapeutic index of cisplatin, J. Oncol. 2014 321754.

Smith, B. A., Eudoxie, G., Stein, R., Ramnarine, R., & Raghavan, V. (2020). Effect of neem leaf inclusion rates on compost physico-chemical, thermal and spectroscopic stability. Waste Management, 114, 136-147. doi:10.1016/j.wasman.2020.06.026

Sujarwo, W., Keim, A.P., Caneva, G., Toniolo, C., Nicoletti, M. (2016). Ethnobotanical uses of neem (Azadirachta indica A.Juss.; Meliaceae) leaves in Bali (Indonesia) and the Indian subcontinent in relation with historical background and phytochemical properties. J. Ethnopharmacol. 189, 186–193.

Trivedi, A., Ahmad, R., Sahabjada, & Misra, A. (2018). Effect of alkaline pH on cytotoxicity profile of neem (Azadirachta indica) ethanolic extract against human breast cancer cell line MDA-MB-231. European Journal of Integrative Medicine, 24, 1-7. doi:10.1016/j.eujim.2018.10.004

Back to top button