Opinion

दुर्गा मंडळाचा आदर्श; नवरात्री उत्सवातील उर्वरित निधीतून गोशाळेस केली मदत!

जरंडी – सोयगांव (जि. संभाजीनगर) येथील जगदंब दुर्गा मंडळाने नवरात्री उत्सव दरम्यान गोळा केलेल्या वर्गणीतील उर्वरित निधीचा गोसेवेसाठी उपयोग करून समाजासमोर सकारात्मक उदाहरण प्रस्तुत केले आहे. मंडळातील कार्यकर्त्यांनी एकमताने ठरवून उत्सवाच्या उर्वरित निधीतून धान्याची नऊ पोती व ढेप विकत घेतली व ती २४ नोव्हेंबर रोजी घोसला येथील निर्लोभ गोशाळा येथे देऊ केली.

गोसेवक बऱ्याचदा कसायाच्या तावडीतून किंवा अवैधरित्या गोवंशाची वाहतूक होताना प्रशासनाच्या मदतीने कारवाई करतात. त्यांनतर हे पकडलेले गोवंश गोशाळेत पाठवली जातात. परंतु बहुतेक वेळा गोशाळेत चाऱ्याची टंचाई भासते, आर्थिक समस्या उभ्या राहतात, तेव्हा समाजातील सज्जनशक्ती सढळ हाताने मदत करत असतात. परंतु मंडळ म्हणून घेतलेला हा निर्णय अधिक स्वागतार्ह व अभिनंदनीय ठरतो. गणेशोत्सव मंडळे व दुर्गा मंडळे उत्सव पर्वातील दहा दिवस देवाची उपासना करतातच, परंतु त्याबरोबर वर्षभर समाजसेवा व राष्ट्रसेवाही करत असतात. नैसर्गिक आपत्तीच्या काळात अशी बरीच उदाहरणे समोर आली आहेत. हे त्यापैकीच एक. अश्या अनेक मंडळांनी आपापल्या गावातील सामाजिक, पर्यावरणीय, स्वच्छता विषयक समस्या यशस्वीपणे सोडवून एक उत्तम आदर्श निर्माण करू शकतात.

विश्व संवाद केंद्र, देवगिरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button