InternationalNewsWorld

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक आघाडीवर

ज्यांनी आपल्यावर २०० वर्षे राज्य केलं आज त्यांचाच सत्ताधीश होण्याची अपूर्व संधी आहे…

ब्रिटनचे भारतीय वंशाचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठीची औपचारिक प्रचारमोहीम सुरू केली आहे, काँझव्‍‌र्हेटिव्ह पक्षाचे नेतृत्वपद आणि ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून निवडून येण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेत शनिवारी त्यांनी आघाडी घेतल्याचे दिसले. 

‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई असलेल्या ४२ वर्षीय सुनक यांना ‘हाऊस ऑफ कॉमन्स’चे नेते मार्क स्पेन्सर, पक्षाचे माजी अध्यक्ष ऑलिव्हर डाउडेन आणि माजी मंत्री लियाम फॉक्स यांच्यासह संसदेच्या अनेक वरिष्ठ सदस्यांकडून जाहीर पाठिंबा मिळाला आहे.

सुनक यांनी त्यांच्या समाजमाध्यमांतील प्रचाराच्या प्रारंभीच्या चित्रफितीत म्हटले आहे, की जेव्हा आपण करोनाच्या दु:स्वप्नाचा सामना केला, तेव्हा मी सरकारमधील सर्वात आव्हानात्मक विभागाची जबाबदारी सांभाळत होतो. ‘ब्रेक्झिट’चे समर्थक असलेले पंतप्रधान व पक्षनेतृत्वाचे उमेदवार सुनक विभाजित सत्ताधारी पक्षाचे विभाजन टाळू शकतीत. माजी कुलपती असलेले सुनक ब्रिटनसमोरील मोठय़ा आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी समर्थ नेतृत्व ठरतील, असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे.

‘ऑडस्चेकर’ या संकेतस्थळाच्या माहितीनुसार, सट्टेबाजांच्या मतानुसार सुनक यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्यानंतर ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री लिझ ट्रुस आणि संरक्षण मंत्री बेन वॉलेस यांची नावे आहेत.

Back to top button