News

जगातील सर्वात मोठ्या कॉफी ब्रँड ‘स्टारबक्सचे’ नवे सीईओ होणार: लक्ष्मण नरसिंहन

भारतीयांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अमेरिकेची प्रसिद्ध कॉफी ब्रँड कंपनी स्टाबक्सने (Starbucks) सीईओ (CEO) म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिम्हन (Laxman Narasimhan) यांची निवड केली आहे.स्टारबक्स ही अमेरिकेतील मोठी कंपनी आहे.लक्ष्मण नरसिम्हन आता सीईओ हॉवर्ड शुल्त्स (Howard Schultz) यांच्या जागी कार्यरत होतील. भारतीय लक्ष्मण हे मूळचे पुण्याचे आहेत. जगभरातील दिग्गज कंपन्यांनी सीईओ भारतीय वंशाचे आहेत. त्यात आता लक्ष्मण नरसिम्हन यांच्या निवडीमुळे भारताची मान आणखीच उंचावली आहे.

लक्ष्मण नरसिम्हन मूळचे पुण्याचे

लक्ष्मण नरसिम्हन यांचा जन्म 15 एप्रिल 1967 रोजी पुण्यात झाला.त्यांचे शिक्षण पुण्यात झालं. ते सध्या 55 वर्षांचे आहेत.त्यांनी पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापिठातून मेकॅनिकल इंजिनीअरींगचं शिक्षण पूर्ण केलं.पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील लॉडर इन्स्टिट्यूटमधून त्यांनी जर्मन आणि आंतरराष्ट्रीय अभ्यासात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.तसेच पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधून त्यांनी व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी देखील घेतली आहे.

लक्ष्मण नरसिम्हन यांनी आतापर्यंतची कामगिरी

नरसिंहन हे अगदी अलीकडे रेकिट कंपनीचे (Reckitt) सीईओ होते. रेकिट ब्रिटनमधील ग्राहक, आरोग्य, स्वच्छता आणि न्यूट्रिशन कंपनी आहे. रेकिट कंपनीने गुरुवारी अचानक यांच्या राजीनाम्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर रेकिटचे शेअर्स पाच टक्क्यांनी घसरले. रेकिट बेंकिसर समूहाने एक निवेदन जारी करत कंपनीच्या सीईओ पदावरून लक्ष्मण नरसिंहन हे तीन वर्षांच्या दीर्घ कार्यकाळानंतर सप्टेंबरच्या शेवटी पाय उतार होणार असल्याचे म्हटले होते.

नरसिंहन यांनी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात मॅकिन्सेमध्ये रुजू होऊन केली. त्यानंतर त्यांनी 2012 पर्यंत तेथे 19 वर्षे काम केले. कंपनीतील त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या नवी दिल्ली कार्यालयात संचालक आणि व्यवस्थापक या पदावर बढती देण्यात आली. 2012 मध्ये, नरसिंहन पेप्सिकोमध्ये रुजू झाले. जिथे त्यांनी जागतिक मुख्य व्यावसायिक अधिकारी म्हणून विविध नेतृत्व केले, जिथे ते कंपनीच्या दीर्घकालीन धोरण आणि डिजिटल मीडिया प्रभारी होते. त्यांनी कंपनीच्या लॅटिन अमेरिका, युरोप आणि सब-सहारन आफ्रिका ऑपरेशन्सचे सीईओ आणि यापूर्वी पेप्सिको लॅटिन अमेरिकेचे सीईओ आणि पेप्सिको अमेरिका फूड्सचे सीएफओ म्हणूनही काम केले आहे.ऑक्टोबर महिन्यामध्ये लक्ष्मण स्टारबक्सचा कार्यभार स्विकारण्याची शक्यता आहे.

जागतिक कंपन्यांमध्ये भारतीयांचा डंका

अनेक जागतिक कंपन्यांची धुरा भारतीय वंशांचे दिग्गज सांभाळत आहेत. या जागतिक कंपन्यांनी मोठ्या आशेने त्यांच्या हातात धुरा दिली होती. त्यांनी या संधीचे सोने केलेले आहे. त्यामुळे इतर कंपन्यांनीही त्यांचे अनुकरण केले. भारतीय टँलेटला योग्य प्लॅटफॉर्म मिळत आहे. विविध कंपन्यांच्या सीईओच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, अल्फाबेटचे सुंदर पिचाई, अडोबचे शंतनू नारायण, डेलॉइटचे पुनीत रंजन आणि फेडएक्सचे राज सुब्रमण्यम यांचा समावेश आहे. याआधी इंद्रा नूयी या पेप्सिको आणि अजय बंगा मास्टरकार्डसारख्या दिग्गज कंपन्यांचे सीईओ होते.

भारतीय जगाच्या पाठीवर कोठेही गेले तरी ते दुधात साखर मिसळ्याप्रमाणे एकरूप होतात. त्यांना रंग,रूप,भाषा.भौगिलिक परिस्तिती याची कुठलीच आडकाठी येत नाही. कारण ‘वसुदैव कुटुंबकम’ यावर असलेली त्यांची असीम श्रद्धा

Back to top button