News

लोकशाही विरोधी,हिंसाचार,जाळपोळ आणि राष्ट्राची बदनामी म्हणजेच माओवादी च(व)ळवळ

TOI ने प्रसिद्ध केलेल्या लेखात टुकडे टुकडे गँगचे लालन पोषण करणाऱ्या,माओवादी(maovadi) संघटनांचा गोपनीय अहवाल उजेडात आला आहे. यामध्ये दिल्ली येथील हिंसक शेतकरी आंदोलनात यशस्वीपणे घुसखोरी केल्याचे माओवादी संघटनेने म्हटले आहे.

{शेतकरी आंदोलन हिंसाचार आणि त्यात २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी झालेला हिंसाचार,जाळपोळ,आणि राष्ट्राची बदनामी हेदेखील माओवाद्यांचेच कटकारस्थान होते हे आता उघड झाले आहे.शहरी भागात प्रतिबंधित ‘भाकपा-माओवादी’ संघटना अधिक सक्रिय आहे.माओवादी संघटनेच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अशाच प्रकारच्या आंदोलनात खुले व गोपनीय पद्धतीने घुसायचे आदेश दिले आहेत.’युनाइटेड फोरम’ च्या माध्यमातून माओवाद्यांनी गोपनीय मार्गाने अनेक आंदोलनात शिरकाव केल्याची माहिती आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे भारतीय सैन्याच्या अग्नीवीर योजनेच्या विरोधात भडकलेल्या आंदोलनातही माओवादी सक्रिय होते.}

माओवादी हे नेहमीच लोकशाही विरोधीच असतात.लोकशाहीला विरोध हा माओवाद्यांच्या रक्तातच आहे आणि ते आजचे नाही तर त्यांच्या उत्पत्तीपासून लोकशाही विरोधी, राष्ट्र विरोधी आहेत. म्हणूनच नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्या लोकशाही विरोधी कारवाया अधिक तीव्र झाल्या आहेत.

आपल्याला कल्पना आहे की, नक्षल चळवळीच्या पूर्वी माओवादी चळवळ आणि माओवादी चळवळीच्या पूर्वी ‘कम्युनिस्ट चळवळ’ सुरू झाली होती. १९१७ साली ‘बोलशेविक रिव्हॉल्युशन’ सुरू झाली होती. ज्यावेळेला रशियामध्ये लेनिन यांनी जाहीर केले होते की, जे काही लोकशाहीमध्ये असलेल्या त्रुटी आहेत, त्या त्रुटींचा आपण पूर्ण फायदा घ्यायचा आणि सत्तेच्या जवळ जायचे. एकदा सत्तेच्या जवळ पोहोचल्यानंतर आपले जे कोणी विरोधक असतील, त्यांची मुस्कटदाबी करायची आणि आपली हुकूमशाही राबवायची, हा आपला खरा उद्देश आहे आणि हे जे लेनिन १९१७ साली ‘बोलशेविक रिव्हॉल्युशन’च्या वेळी जाहीर केले होते. तेच माओंनीसुद्धा जाहीर केले होते, ज्यावेळी चीन स्वतंत्र झाला होता. १९४९ साली माओंनी ज्यावेळेला चीनमध्ये साम्राज्य स्थापन केले, त्यावेळेला लोकांचे दशकानुदशके अनन्वित हाल झाले. अशा हे लेनिन असो किंवा मधल्या काळातला रशियातला स्टॅलिनसारखा हुकूमशाह असो किंवा माओ असो, याच्यापासून प्रेरणा घेणारे आणि स्वतःला माओवादी आणि लेनिनमध्ये असणारे गट भारतामध्ये होते.

१९६७ मध्ये बंगालमध्ये नक्षलबाडिया या गावी ही चळवळ मोठ्या प्रमाणात सुरू झाली आणि त्याला एक नाव पडले ‘नक्षलवादी मूव्हमेंट.’ १९८० पासून ती महाराष्ट्रातही सुरू झाली. गडचिरोली आणि आजूबाजूंच्या गावांमध्ये त्यांनी डोके वर काढायला सुरुवात केली. मधल्या काळामध्ये यांच्यात मोठ्या प्रमाणात फाटाफूट झाली. २००४ साली यांच्यामध्ये विचारमंथन सुरु झाले. २००७मध्ये यांनी कम्युनिस्ट पार्टी माओईस्टची स्थापना झाली.जंगल भागात मोठे नुकसान झाल्याने माओवादी चळवळ शहरी भागात अधिक लक्ष केंदित करीत आहे, असे गडचिरोली पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी स्पष्ट केले आहे.

डाव्याच्या (left) राजवटीत पश्‍चिम बंगालमध्ये हिंदूंची कत्तल

१९७७ पासून २००९ पर्यंत पश्‍चिम बंगालमध्ये डाव्या आघाडीचे सरकार होते. या आघाडीत भाकपा हाही पक्ष होता. या कालावधीत प. बंगालमध्ये तब्बल ५८,४०८ राजकीय हत्या झाल्या. विरोधी पक्षांची हत्या करणार्‍या डाव्या आघाडीच्या सरकारने विरोधकांची कशी गळचेपी केली होती,एवढ्या मोठ्या संख्येत हत्या ?

जमीन अधिग्रहणविरोधी आंदोलनामुळे नंदीग्राम देशभर गाजले. जवळच हल्दिया पेट्रोकेमिकल्सचा मोठा प्रकल्प आहे. बुद्धदेव सरकारने नव्या औद्योगिकरणाचे धोरण राबवण्यासाठी नंदीग्राम परिसराची निवड केली. २००७च्या सुमारास त्याचा आराखडा तयार होताच, डाव्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली. आपले अस्तित्वच नष्ट करण्याचा हा डाव आहे, या भावनेतून इथे असंतोषाचा वणवा पेटवला. माओवाद्यांनी त्यात भरपूर तेल ओतले. सिंगुरला मोठे आंदोलन झाले, त्याचे दृश्य पडसाद नंदीग्राममधेही उमटले. पोलीस आणि माओवाद्यांमधे २००७ साली रक्तरंजित महासंग्राम झाला. दोन डझनांहून अधिक आंदोलक गोळीबारात ठार झाले. याच आंदोलनाचा परिपाक म्हणजे डाव्यांची जुलमी राजवट संपुष्टात आली . 

कम्युनिस्टांनी आधी आपल्या कार्यकाळात कोणते दिवे लावले, याचे उत्तर दिले पाहिजे.महिलांवरील अत्याचाराचे आकडे तर मन सुन्न करणारे आहेत.हेच का माओवाद्यांचे सर्वसामान्य जनतेविषयीचे प्रेम? वनवासींच्या अधिकाराचे हनन माओवाद्यांनीच अधिक केले आहे. राष्ट्रवाद, राष्ट्रीय सुरक्षा, विरोधकांची गळचेपी वगैरे मुद्यावर बोलण्याआधी कम्युनिस्टांनी आपल्या हातात सत्ता असताना, कोणते दिवे लावले आणि आताही लावले जात आहेत, याकडे आधी लक्ष दिलेले बरे!

आमच्या जवानांनी सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक केले. त्याचे पुरावे मागताना माओवाद्यांना जराशीही लाज कशी काय वाटली नाही? दहशतवादी आणि नक्षल्यांजवळून जप्त केलेली शस्त्रे ही चिनी बनावटीची असल्याचे आढळून आले आहे. विरोधक आणि स्वत:ला सेक्युलर, मानवतावादी, एनजीओ म्हणविणारा एकही माईचा लाल या घटनांचा साधा निषेधदेखील करत नाही.

ईशान्य दिल्लीतील दंगली ‘वामपंथी-जिहादी मॉडेलची क्रांती’चे सादरीकरण होते. यांची योजना अर्बन नक्षल जिहादी नेटवर्कने तयार केली. या दंगली, दिल्लीच्या केंद्रीय विद्यापीठात सक्रिय वामपंथी-जिहादी-नक्षल नेटवर्कद्वारा दिल्लीच्या मुख्यत: अशिक्षित मुसलमानांना नागरिकता संशोधन कायद्यावरून भडकविणे, तसेच जिहादी बनविण्याचा हा दु:खद परिणाम होता. घटनास्थळी अतिरेकी जिहादी पीएफआयचे सूत्रधार उपस्थित होते.

मुंबईच्या नालासोपारा भागातून कारू हुलाश यादव या जहाल नक्षलवाद्याला, दहशतवाद विरोधी पथकानं काल अटक केली. कारू हा माओ या संघटनेचा नक्षलवादी असून, तो २००४ पासून नक्षली कारवायांमध्ये सक्रीय आहे. तो औषधोपचारासाठी नालासोपारा इथं आला असल्याची माहिती मिळताच ठाणे शाखेच्या वतीनं ही कारवाई करण्यात आली. हा मूळचा झारखंडमधल्या हजारीबागचा असून, झारखंड सरकारने त्याच्यावर १५ लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं आहे.

सध्या तर सीपीआय (माओवादी) या सर्वात मोठ्या नक्षलवादी पक्षापुढे नेतृत्वाचेच आव्हान आहे. अनेक मोठे नेते मारले गेले आहेत, कोबाद गांधीसारखे काही वरिष्ठ नेते तुरुंगात आहेत. अनेकांनी शरणागती पत्करली आहे. पहिल्या फळीतील अनेक नेत्यांचे वय झालेलं आहे. त्यामुळे या कोंडीतून मार्ग काढण्याची नक्षलवादी चळवळीची धडपड सुरु आहे.पुण्यात झालेली एल्गार परिषद आणि त्यात असलेले देशविरोधी नारे कोणीही विसरू शकत नाही.

कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2018 घडवून हिंसा माजवली होती.अर्बन नक्सालीना समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करायची आहे, हे साफ दिसून येते. महाराष्ट्र ,छत्तीसगड ,तेलंगण राज्यांनी एकत्र येऊन न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांचे नक्षलवाद विरोधी कृती दल तयार केले आहे, त्यामुळे आता राज्यांच्या सीमा मागे पडून नक्षलवाद विरोधी मोहीम तीव्र झाली आहे.

नक्षलवाद आणि इस्लामिक दहशतवादाचे मोठे आव्हान

चीन आणि पाकिस्तानसह देशांतर्गत नक्षलवाद आणि इस्लामिक(PFI) दहशतवादाचे मोठे आव्हान देशासमोर आहे,२००४ साली ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ची (माओवादी) स्थापना झाली. भाकप माओवादी संघटनेच्या लोकांवर झालेल्या छापेमारीमध्ये त्यांची शहरी भागात काम करण्याची रणनीती उघड झाली. माओच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये ज्या प्रकारे क्रांती झाली, नक्षलवादी ती ‘टेक्निक’ १०० टक्के जशीच्या तशी भारतामध्ये प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत ते आपण कोरेगाव-भीमाच्या निमित्ताने पाहिले आहे.

नक्षलवाद प्रभावी भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे 

केंद्र सरकारचे गृहखाते परस्परांत समन्वय घडवून आणत आहे. त्या-त्या राज्यांना भरगोस मदत केली जात आहे. नक्षलग्रस्त भागात रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण अशा विकासाच्या योजना आणि तेथील जनतेला रोजगार मिळेल यासाठी विशेष तरतुदी केल्या जात आहेत.नक्षलवाद प्रभावी भागात BRO ने लष्करी संरक्षणात रस्ते बांधले आहेत,म्हणूनच त्याचा दर्जा उत्तम आहे,त्यामुळे पोलीस जळत कारवाई करू शकतात.DBT (Direct Benefit Transfer) मुळे विकासकामांना मोठ्याप्रमाणावर गती आली आहे. विकासाची गंगा आता शेवटच्या घटकापर्यंत पोहचू लागली आहे त्यामळे ग्रामीण भागात नक्सली चळवळीला समर्थन नाहीसे झाले आहे.शहरीभागात आता सोशल मीडियामुळे या नक्सलीना आपली ओळख लपवून समाजात विष कालावण्याचे साधन मोठया प्रमाणावर प्राप्त झाले आहे. म्हणून आपण अखंड सावधान राहायला हवे.

नक्सलवाद्यांच्या विरोधात होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर !

देशात कुणाच्याही हाती अनिर्बंध सत्ता येऊ नये यासाठी देशात एक सशक्त विरोधी पक्ष असावा, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवले आहे. त्याच वेळी विरोधकांचे दायित्व काय आहे, हेही त्यांनी सांगून ठेवले होते. वागत आहेत का विरोधक त्याप्रमाणे? केरळमध्ये विरोधकांची सर्रास हत्या केली जात आहे. हे आहे का विरोधकांचे दायित्व?डॉ. आंबेडकरांचे नाव घेऊन दलित युवकांना भडकाविणे आणि नक्षल्यांसाठी कॅडर तयार करणे, हा यामागील उद्देश आहे. शेवटी ‘‘ज्या वेळी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला धोका निर्माण होईल, त्या वेळी सर्व भारतीयांनी आपल्या शरीरातील रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढा देऊन स्वातंत्र्याचे रक्षण करावे,’’ हा आंबेडकरांचा मंत्र देशवासी विसरले नाहीत आणि विसरणार देखील नाहीत.

आपल्याला या भारत राष्ट्राला विश्वगुरू पदापर्यंत घेऊन जायचे आहे, आपल्याला या नव्या संकटाची, धोक्यांची आणि आव्हानांचीसुद्धा एका प्रकारे काळजी घ्यावी लागणार आहे. नक्षल आपल्याला माहीत होते. मात्र, ‘अर्बन नक्षल’ एक नवा प्रकार सुरू झाला. जिहाद आपल्याला माहीत होता. ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’ अशा प्रकारचे शब्द कानावर यायला लागले आहेत आणि त्यांचा आवाका दिवसेंदिवस वाढतच आहे. हे प्रश्न सोडायचे असतील तर समाजाचे प्रबोधन करणे आणि समाजमध्ये समरसता  निर्माण करणे हाच सोपा उपाय आहे.

https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/maoist-document-confirms-urban-focus-infiltration-into-agitations/articleshow/94288049.cms?from=mdr

Back to top button