News

करवीर नगरीच्या दारावर “लव्ह जिहादची” दस्तक

छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचा वारसा लाभलेल्या करवीर नगरीत लवजिहादचे संतापजनक आणि धक्कादायक प्रकरण घडले आहे.

कोल्हापूरच्या १४ वर्षे ३ महिने वयाच्या शालेय हिंदू अल्पवयीन विद्यार्थिनीला, २२ वर्षांच्या अल्ताफ मिनाजअहमद काझी या मुसलमान कॉलेज विद्यार्थी तरुणाने पळवून नेल्याचा दाट संशय आहे.मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिच्या संमतीचा इथे प्रश्नच उद्भवत नाही, त्यामुळे कोल्हापूर पोलीस दोघांचा शोध घेत आहेत. कायद्याच्या दृष्टीने मुलीची संमती असली तरीही हा अपहरणाचा गुन्हा ठरतो.

लव जिहाद” च्या भयानक वास्तवापासून आपण सुरक्षित आहोत असे कोणत्याही हिंदू कुटुंबाने समजण्याचे कारण नाही. मुलगी पळून जाईपर्यंत तिच्या आई-वडिलांना या प्रेम प्रकरणाचा कोणताही सुगावा लागलेला नसतो हे आपल्या कुटुंब व्यवस्थेचे अपयशच म्हणावे लागेल.

आजपर्यंत अशी घटना कधीही न ऐकलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात हे काळजाचा थरकाप उडवणारे दुर्दैवी प्रकरण घडले आहे. कदाचित जिल्ह्यात पूर्वी घडलेली अशी प्रकरणे प्रकाशात आलीही नसतील. परंतु या प्रकरणाने मात्र कोल्हापूरकरांच्या दरवाजावर लव जिहादच्या षड्यंत्राने जोरदार थाप मारली आहे. या घटनेने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडालेली आहे.
संपूर्ण देशातील लव जिहादच्या षडयंत्राने किती हिंदू भगिनींचा बळी घेतला असेल त्याची गणती नाही. त्यात ह्या कोल्हापूरच्या भगिनीची एकाने भर असे म्हणून आता हिंदू समाजाला निष्क्रिय व उदासीन राहता येणार नाही. लव जिहादच्या देशव्यापी षडयंत्राचा सामना करण्यासाठी संपूर्ण हिंदू समाजाला, विशेषतः माता भगिनी वर्गाला खडबडून जागे करावे लागेल. लव जिहादच्या बहुतांशी लग्नांचा शेवट त्या फसलेल्या हिंदू मुलीच्या करुण अंताने होतो हे आजपर्यंतच्या शेकडो उदाहरणांचा दाखला देऊन त्यांना पटवून द्यावे लागेल. हा संपूर्ण हिंदू समाजाने हाती घेण्याच्या कुटुंब प्रबोधनाचा विषय आहे.

जागते रहो… रात्र वैऱ्याची आहे.

Back to top button