News

“द केरला स्टोरी”… The Untold True Story.

ही काळीज पिळवटून टाकणारी कहाणी एकट्या, आद्य शंकराचार्यांच्या जन्मभूमीतील केरळच्या(kerala) शालिनी उन्नीकृष्णनची नाही… तर केरळच्या अशा सुमारे ३२ हजार शालिनींची ही प्रातिनिधिक शोकांतिका आहे…

शालिनीला नर्स व्हायचं होतं, रुग्णांची सेवा करायची होती पण शालिनी लव्ह जिहादच्या षड्यंत्रात फसली गेली… आज ती फातिमा बा आहे…
शालिनी कुठल्यातरी इस्पितळात रुग्णांची सेवा करण्याचे स्वप्न बघत होती… प्रत्यक्षात आज ती अफगाणिस्तानातल्या एका तुरुंगात आहे… ISIS ची आतंकवादी म्हणून पकडली गेलेली एक निष्पाप निरागस शापित हिंदू तरुणी…
लव्ह जिहादच्या षडयंत्रामुळे असे दुर्दैवाचे दशावतार नशिबी आलेली शालिनी एकटी नाही… केरळच्या अशा सुमारे ३२ हजार हिंदू तरुणी येमेन आणि सीरियाच्या वाळवंटात ISIS च्या दहशतवादी म्हणून दफन झालेल्या आहेत…

आपल्या सुखी समृद्ध भविष्याची स्वप्ने उराशी बाळगून नुकत्याच यौवनात पदार्पण केलेल्या भोळ्याभाबड्या हिंदू तरुणींना मुसलमान तरुण अगदी ठरवून योजनाबद्ध रीतीने प्रेमाच्या जाळ्यात ओढतात… मुलाच्या बाजूने त्यात प्रेम वगैरे काही नसतं… असतं ते फक्त ISIS साठी काफिर महिला दहशतवाद्यांची भरती करण्याचे षडयंत्र… या षडयंत्राचा सुगावा लागेपर्यंत खूप उशीर झालेला असतो… परतीचे दोर कापले गेलेले असतात… हाती उरतं ते फक्त वाट्याला आलेले भोग निमूटपणे भोगण्याचे असहाय्य जीवन… आणि हे षडयंत्र केरळात अगदी खुलेआम दिवसाढवळ्या बेधडक सुरू आहे… याला कोणीही थांबू शकत नाही का? असा काळीज चिरणारा टाहो शालिनीने आपल्या त्या ३२ हजार अभागी केरळी हिंदू भगिनींच्या वतीने, अफगाणिस्तानच्या तुरुंगातून फोडला आहे…

फिल्म निर्माते विपुल अमृतलाल शहा यांच्या सन शाईन पिक्चर्स निर्मित, सुदीप्तो सेन दिग्दर्शित लव्ह जिहादच्या षडयंत्रावरील येऊ घातलेल्या “द केरला स्टोरी” या चित्रपटाचा हा जेमतेम १.३० मिनिटांचा हा टीझर देखील, समस्त हिंदू समाजाला नुसताच जागृत करणाराच नाही तर अंतर्मुखदेखील करायला लावणारा आहे. हा टिझर बघितल्यानंतर प्रेक्षकांना या चित्रपटाच्या आगमनाची आतुरता नक्कीच लागेल.

Back to top button