News

हिंदुस्थानातच हिंदूंच्या आदर्शांचा अपमान कशासाठी…?

कुत्र्याने चाटलेलं तूप अन् सीता मातेची तुलना होऊच कशी शकते ?

देशातील लोकप्रिय शिक्षक म्हणवणारे माजी आयएएस अधिकारी डॉ. विकास दिव्यकीर्ती (Vikas Divyakirti) यांच्या विधानावरून गदारोळ निर्माण झाला आहे. कोचिंग इन्स्टिट्यूट दृष्टी आयएएस (Drishti IAS) वर बंदी घालण्याची मागणी सोशल मीडियावर (Social Media)जोर धरत आहे. यासोबत #BanDrishtiIAS हा हॅशटॅगही टेंड्र होत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विकास दिव्यकीर्ती यांच्यावर टीका होत आहे. (Controversy over Vikas Divyakirti remark on Lord Ram and Goddess Sita Debate broke out on social media)

सीता मातेचा अपमान

कथित व्हायरल व्हिडिओमध्ये विकास दिव्यकीर्ती हे भगवान राम (shri ram) आणि देवी सीता (Sita) यांच्याबद्दल बोलत आहे. दिव्यकीर्ती म्हणतात,

“हे सीते अगर तुम्हें लगता है कि युद्ध मैंने तुम्हारे लिए लड़ा है तो तुम्हारी गलतफहमी है। युद्ध तुम्हारे लिए नहीं लड़ा है, युद्ध अपने कुल के सम्मान के लिए लड़ा है। रही तुम्हारी बात तो जैसे कुत्ते द्वारा चाटे जाने के बाद घी भोजन योग्य नहीं रहा जाता है वैसे ही अब तुम मेरे योग्य नहीं हो।”

या वायरल व्हिडिओवरुन सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. विकास दिव्यकीर्ती यांनी भगवान राम आणि देवी सीता यांचा अपमान केला आहे असे टीका करणाऱ्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर काही लिबरल,साम्यवादी (विकास दिव्यकीर्तीच्या भाषेत प्रगतीवादी ) लोक दिव्यकीर्ती यांचे समर्थन करत आहेत. दिव्यकीर्ती यांचा फक्त काही सेकंदांचा व्हिडिओ मुद्दाम शेअर केला जात आहे आणि त्यांनी जे सांगितले आहे ते शास्त्रात लिहिलेले आहे, असे या बिनडोक समर्थकांचे म्हणणे आहे.

कोण आहेत विकास दिव्यकीर्ती ?

डॉ. विकास दिव्यकीर्ती यांनी दिल्ली विद्यापीठात शिक्षक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. 1996 मध्ये त्यांनी पहिल्याच प्रयत्नात युपीएससी (UPSC) परीक्षा उत्तीर्ण केली. ते आयएएस अधिकारी झाले आणि त्यांची गृह मंत्रालयात नियुक्ती झाली. मात्र, त्यांना ते काम आवडले नाही. अवघ्या वर्षभरानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि 1999 मध्ये त्यांनी दृष्टी आयएएस या कोचिंग इन्स्टिट्यूटची सुरुवात केली.

साध्वी प्राचींनी शेअर केला व्हिडीओ

राष्ट्र सेविका समितीच्या सदस्या साध्वी प्राची यांनी ट्विटरवर BanDrishtiIAS या हॅशटॅगसह हा व्हिडिओ शेअर केला आहे.

दिव्यकीर्ती यांच्या या कथित वक्तव्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. काहींनी तर हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल कोचिंग इन्स्टिट्यूटवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शुक्रवारी सकाळपासून ट्विटरवर #BanDrishtiIAS ट्रेंड करत आहे.

नेहमी हिंदूंच्याच आदर्शांना टार्गेट केले का जाते ? कशाचा कशाशी संबंध नसताना पोकळ प्रसिद्धीसाठी हे दुष्कृत्य दिव्यकीर्तीनी करून स्वतःची अपकीर्ती का करून घेतली ? देश आता जागा झालाय याची जाणीव स्वतःला शिक्षक म्हणवणाऱ्या दिव्यकीर्तीना होऊ नये याचेच आश्चर्य वाटते.सोशल मीडियाचे अत्यंत आभार त्यांच्यामुळेच हे प्रकरण उजेडात आले आहे.

तथाकथित लिबरल,साम्यवादी,अर्बन नक्सलीनी हिंदूंना डिवचण्याचा विचार देखील मनात आणू नये अन्यथा सोशल मीडियाचा बुलडोझर निश्चित…

Back to top button