News

सार्वजनिक ठिकाणी नमाज पडण्याचे देशव्यापी सुनियोजित षडयंत्र…

घटनेचा दिनांक: रविवार, २० नोव्हेंबर २०२२

घटनेचे स्थान: दिल्ली ते विशाखापट्टणम, स्वर्ण जयंती एक्सप्रेस धावती ट्रेन (ट्रेन क्रमांक – १२८०४), डबा क्रमांक S-४. घटना: ट्रेन मधील स्वच्छता गृहाचा मार्ग रोखून नमाज पडण्याची अरेरावी.

सदर बातमी प्रमाणे या अरेरावीचे पर्यावसान डब्यातील एका हिंदू सहप्रवाशाला पँट्री कार कर्मचाऱ्यांकडून मारहाणीत झाले आहे. या हिंदू प्रवाशाचे नाव विलास नाईक असून ते माजी सैनिक आहेत… विलास नाईक यांनी नमाजी मंडळींनी स्वच्छतागृहाचा मार्ग ३ वेळा नमाज पडण्यासाठी रोखून धरल्यानंतर तेथे मंत्र पठण सुरू केले. त्यांना स्वच्छतागृहात जाऊ दिले नाही.

धावत्या ट्रेनमध्ये नमाज पडला जातो तर मंत्र पठण का केले जाऊ शकत नाही? असा रोकडा सवाल करत विलास नाईक यांनी तेथे मंत्र पठण सुरू केले.

यावरून सुरू झालेली बाचाबाची विलास नाईक यांना मारहाण करण्यापर्यंत पोहोचली. पँट्री मॅनेजर हरवेश श्रीवास्तव आणि पॅन्ट्रीच्या अन्य कर्मचाऱ्यांनी आपल्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली असा विलास नाईक यांचा आरोप आहे.

ट्रेन मधील एक प्रवासी मुजाकीर अहमद यांनी धावत्या ट्रेनमध्ये नमाज पढला गेला हे मान्य केले आहे.

बैतूल स्टेशनच्या रेल्वे सुरक्षा बल चौकी या मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

मात्र या निमित्ताने मुसलमानांची शक्य त्या प्रत्येक ठिकाणी नमाजाच्या बहण्याने काफिरांची अडवणूक करण्याची ऊद्दामपूर्ण मानसिकता लक्षात येते. सामूहिक नमाज पठणाची अरेरावी ही फक्त धावत्या ट्रेनमध्येच नसून रेल्वे स्थानकांवर, मोकळी मैदाने, रस्त्याच्या कडेला, संख्याबळ पाहून हमरस्त्यावर आणि अगदी आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांमध्ये देखील हे प्रकार बघायला मिळतात.

धार्मिक स्वातंत्र्याच्या बुरख्याआड आपले शक्ती प्रदर्शन करणे व त्यानिमित्ताने काफीरांची काय प्रतिक्रिया येते याची चाचपणी करणे हा सुप्त हेतू असतो. काफिर जर घाबरले तर त्याचा एक वेगळाच विकृत आनंद असतो. त्याशिवाय काफीरांमध्ये जागृती आणि संघटितपणा तर आलेला नाही ना? याची चाचपणी देखील केली जात असते.

काफीरांकडून या अरेरावीला अटकाव केला गेला नाही की ही भीड चेपत जाते आणि मग खुलेआम आपला जन्मसिद्ध हक्क असल्याप्रमाणे अशा सर्व सार्वजनिक जागा व्यापल्या जातात. त्यानिमित्ताने आपले शक्ती प्रदर्शन देखील खुलेआम करण्यात येते.

हा प्रश्न धार्मिक असल्यामुळे, आपण एकटे पडू या भीतीने साधारणतः काफीर पुढे सरसावत नाहीत. विलास नाईक हे मात्र त्याला अपवाद ठरले. कदाचित माजी सैनिक असल्यामुळे, चाललेली अरेरावी सहन न झाल्यामुळे आणि हृदयाच्या कोपऱ्यात कुठेतरी आपण हिंदू असल्याची ज्योत तेवत असल्यामुळे म्हणा, एकटे असूनही त्यांनी हे अतुलनीय धाडस दाखवले असावे. त्याबद्दल त्यांचे मनापासून कौतुक करावेसे वाटते.

गेल्या ७५ वर्षात मतपेटीच्या लांगूनचालनामुळे अल्पसंख्यांक नावाखाली मुस्लिम समाजाचे करण्यात आलेले लाड आता खूप झाले. सार्वजनिक मालमत्ता ही सरकारच्या मालकीची असते. त्याचा उपयोगही फक्त सार्वजनिक सोयीसाठीच झाला पाहिजे. धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली यापुढे असले लाड सरकारने अजिबात खपवून घेता कामा नयेत.

येत्या काळात काफीरांना विलास नाईक यांच्यासारखे धाडस दाखवावेच लागेल अन्यथा… शेरास सव्वाशेर आणि सव्वाशेरास छटाक या अनुभवसिद्ध म्हणीची प्रचिती आपण काफिरांना कधीच घेता येणार नाही.

MP: Argument breaks out on Swarn Jayanti Express over offering Namaz, ex-soldier beaten up by pantry staff near Betul

https://www.msn.com/en-in/news/other/mp-argument-breaks-out-on-swarn-jayanti-express-over-offering-namaz-ex-soldier-beaten-up-by-pantry-staff-near-betul/ar-
AA14mD83? ocid=msedgdhp&pc=U531&cvid=ab828dafac7444d1955 6cf71c75e90d8

Back to top button