News

भले तरि देऊं कासेची लंगोटी। नदवचे माथी हाणू काठी॥

IFFI अर्थात् इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियाचा ५३ वा फिल्म महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोवा येथे आयोजित करण्यात आला होता.या महोत्सवातील मुख्य ज्युरी म्हणून इस्रायली फिल्म निर्माते नदव लॅपिड (Nadav Lipid) यांची निवड करण्यात आली होती. सदर फिल्म महोत्सवात दाखवण्यात आलेला “द काश्मीर फाइल्स” चित्रपट अश्लील व प्रचारकी थाटाचा असल्याची आगाऊ व आगंतुक टिप्पणी नदव लॅपिड महाशयांनी केली.

शक्यतो आपण उत्स्फूर्त भाषण करतो, मात्र यावेळी लिहून आणलेले भाषण वाचून दाखवणार आहोत अशी पु्स्तीही त्यांनी सुरुवातीला जोडली.

१९७५ साली तेल अविवला जन्मलेल्या नदव लॅपिड यांना दुसऱ्या महायुद्धा दरम्यान जर्मनीचा क्रूरकर्मा हुकुमशहा हिटलर याने ६५ लाख ज्यूंना गॅस चेंबरमध्ये कोंडून मारण्यासाठी उघडलेल्या छळ छावण्यांचा (Holocaust) अनुभव असण्याचा प्रश्नच नाही. मात्र ते त्याबाबत अनभिज्ञ असतील असेही मानण्याचे कारण नाही. आजपर्यंत १३ इजरायली चित्रपटांचे दिग्दर्शन केलेला हा चित्रपट निर्माता, त्याच्या जन्मापूर्वी ३०-४० वर्षे आधी घडलेल्या इतिहासाबद्दल अज्ञानी असेल ही शक्यताच नाही. त्या अघोरी ज्यू (Jew) हत्याकांडावर जगात आजपर्यंत शेकडो चित्रपट, माहितीपट (Documentry) बनवले गेले आहेत. नदव लॅपिड यांच्या मते ते सारे चित्रपट, माहितीपट अश्लील व प्रचारकी थाटाचे आहेत का? कदाचित नदव लॅपिड याचे देखील उत्तर “हो” असेच देतील कारण…

नदव लॅपिड यांची खुद्द इजरायल मध्ये “मातृभूमीचा द्वेष” करणारा अशीच प्रतिमा आहे. पॅलेस्टाईन प्रेमी हा यहुदी चित्रपट निर्माता आपल्या मातृभूमीचे, इजरायलचे वर्णन Collective soul of Israel is a “Sick Soul”… इजरायल देशाचा आत्मा हा “दूषित आत्मा” असल्याचे करतो.

थोडक्यात नदव लॅपिड हा लिबरल (Liberal), पुरोगामी (Progressive) आणि अलबत्ता विकृत मानसिकतेचा दळभद्री गृहस्थ आहे.

लक्षावधी यहूद्यांच्या अमानवीय हत्याकांडावर आधारित चित्रपट हे वास्तवावर आधारित चित्रपट असल्यामुळे ते कोट्यावधी प्रेक्षकांच्या मनाला जाऊन भिडतात. या दुर्दैवी हत्याकांडाला ७ दशके उलटून गेली तरी आजही त्या चित्रपटांची लोकप्रियता कायम आहे. उदाहरणे द्यायची झाली तर Roberto Benigni यांचा The Life is Beautiful असो किंवा Steven Spielberg यांचा The Schindler’s List असो, ते बघताना आजही प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. ते अश्रूही अश्लील आणि प्रचाराकी थाटाचे असतात असे नदव लॅपिड सुचवू इच्छितात का? जर याचे उत्तर होय असेल तर नदव लॅपिड यांची मानसिकता “एहसान फरामोश” आहे असेच म्हणावे लागेल.

जितके हे चित्रपट सत्य कथांवर अर्थात वास्तव इतिहासावर आधारित आहेत, तितकाच द काश्मीर फाइल्स ( The Kashmir Files) हा चित्रपट वास्तवावर आधारित आहे. म्हणूनच तो प्रेक्षकांच्या मनाला जाऊन भिडतो. बहुदा म्हणूनच तो विकृत नदव लॅपिड यांना खुपला. हेच त्या चित्रपटाचे सर्वात मोठे यश आहे. त्यावर टीका करण्यासाठी नदव लॅपिड यांना त्यांच्यासारख्याच कोणीतरी विकृत भारतीयाने लिहून दिलेला कागद वाचावा लागला.

आणि आमच्याच भूमीवर उभे राहून आमचाच इतिहास नाकारण्याचा अगोचरपणा करण्याचा अधिकार नदव लॅपिड यांना कोणी दिला? आम्ही दिलेल्या सन्मानाचा त्यांनी घेतलेला हा गैरफायदा आहे.

अर्थात जो विकृत दळभद्री आपल्या देशाच्या इतिहासाशी एकनिष्ठ राहू शकत नाही तो भारताच्या इतिहासाची कदर ती काय करणार? त्याच्याकडून अपेक्षा करणे देखील व्यर्थ आहे.

भारतातील इजरायलचे कॉन्सुलेट जनरल कोब्बी शोशानी (Kobbi Shoshani) यांनी मात्र ताबडतोब नदव लॅपिड यांच्याशी पूर्णपणे असहमती दर्शवून लॅपीड यांना सणसणीत चपराक मारली आहे.

जगाच्या ज्ञात इतिहासात, एक हृदयद्रावक हत्याकांड (Genocide) भोगलेल्या इजरायल देशात नदव लॅपिड
यांच्यासारखा “कुपुत्र” जन्माला यावा, हे त्या देशाचे दुर्दैवच म्हणावे लागेल.

बॉलीवूड असो किंवा हॉलीवूड… कावळे सगळीकडे काळेच असतात.

नदव लॅपिड… पुढच्या वेळी आमच्या कोणत्याही चित्रपट महोत्सवाला आलास तर प्रेक्षक म्हणून ये. आमचे चित्रपट बघ आणि कोणतेही मतप्रदर्शन न करता चुपचाप निघून जा. नाहीतर… अनेक शतकांपूर्वी आमच्या देशात शरण घेतलेल्या यहूद्यांसाठी आम्ही कासेची लंगोटी सोडून दिली होती… पण तुझ्यासारख्या एका नाठाळ यहूद्याच्या माथी काठी हाणण्यास देखील आम्ही मागे पुढे पाहणार नाही.

Back to top button