News

अभिमानास्पद… !

देशामध्ये रस्ते विकासाची कामे प्रगतीपथावर असून दर्जेदार व कमी खर्चातील रस्तेबांधणीवर विशेष भर देण्यात येत आहे.

देशात मोठ्या प्रमाणात महामार्गाचे जाळे विणले जात आहे. रस्ते हे विकासाचे महामार्ग असल्याने रस्त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे.ज्या देशात वा राज्यात रस्ते जास्त त्या देशाचा वा राज्याचा विकास अधिक वेगाने होतो. त्यामुळे विकास आणि प्रगतीचा मार्ग हा या देशातील महामार्गामधून जातो असे म्हणतात.

नागपूर मेट्रोच्या ‘डबल डेकर व्हाया-डक्ट’ला गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान

नागपूर मेट्रो प्रकल्प (Nagpur Metro) राबवताना अनेक विक्रम स्थापित करणाऱ्या महा मेट्रोने आणखी एक मैलाचा दगड (Mile Stone) गाठला आहे. महा मेट्रो नागपूरच्या वर्धा रोड ‘डबल डेकर व्हाया-डक्ट’ची(double decker via duct) संपूर्ण जगात मेट्रो श्रेणीतील सर्वात लांब डबल डेकर ठरली आहे. यामुळं अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या ३. १४ किमी लांबीच्या ‘डबल डेकर व्हाया-डक्ट’ला आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये या आधीच मानांकन मिळाले आहे.

वर्धा रोडवरील ‘डबल डेकर व्हाया-डक्ट’ प्रकल्प राबविणे एक मोठे आव्हान होते. हा 3-स्तरीय संरचनेचा भाग आहे. ज्याच्या वरच्या बाजूला मेट्रो रेल्वे, मध्यम स्तरावर महामार्ग उड्डाणपूल आणि जमिनीच्या पातळीवर रस्ता आहे.३.१४ किमीचा “डबल डेकर व्हाया डक्ट” फक्त भारतातातच आहे.

महा मेट्रोने गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड (genius book of world record ) नोंद होण्यासाठी अर्ज केला होता. GWR च्या देशातील प्रतिनिधींनी त्याचा पाठपुरावा केला आणि या विषयाशी संबंधित आपल्या टीमसोबत या प्रस्तावावर सविस्तर अभ्यास केला. त्यानंतर गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्डने महा मेट्रोचा दावा मान्य करत गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याच्या समावेशाची घोषणा केली. या अतिशय मानाच्या आणि विश्वप्रसिद्ध रेकॉर्डसाठी महा मेट्रोच्या प्रकल्पाची निवड होणे ही अभिमानाची बाब आहे. नजीकच्या काळात महा मेट्रो या सारखे आणखी काही विक्रम करणार आहे यात शंका नाही.

गाव, जिल्हा, राज्य आणि देश यांची प्रगती तेथील दळणवळणाच्या सोयींवर अवलंबून असते. दळणवळणाच्या सोयीसुविधा आणि मजबूत उड्डाणपूल आदींमुळे त्या-त्या भागात उद्योगांची संख्या वाढते. पर्यायाने यातून नागरिकांना रोजगार, व्यवसायाची उपलब्धता आणि नागरिकांचा आर्थिक व सामाजिक विकास घडून येतो. त्यामुळे रस्ते आणि पूल हे नागरिकांच्या विकासाचे प्रारंभबिंदू आहे.

भारत सरकारचे महत्वाकांक्षी प्रकल्प, महामार्ग, द्रुतगती मार्ग, रेल्वे बांधणी अतिशय वेगाने पूर्ण होत असून त्यामुळे जगातील बड्या देशांनाही आश्चर्य वाटत आहे. कारण, महामार्ग आणि रेल्वे जाळे विस्तारात क्रांतिकारी काम झाले आहे. द्रुतगती महामार्गाच्या दररोजच्या बांधणीने जागतिक विक्रम केला आहे.

…आणि ही तर फक्त सुरुवात आहे.

“परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं”

भारत माता की जय…

Back to top button