HinduismLiteratureOpinion

समृद्ध ,संपन्न, सामर्थ्यवान भारताचा ‘मेरुमणी’… तंजावर

तंजावर, ज्याला कधीकधी “मंदिरांचे शहर” म्हणून संबोधले जाते, हे दक्षिण भारतातील एक आश्चर्यकारक स्थान आहे, जे ऐतिहासिक महत्त्व आणि सांस्कृतिक प्रासंगिकतेसाठी प्रसिद्ध आहे. तंजोर पेंटिंग्ज, कापड आणि साड्या, कर्नाटक संगीत,हस्तकला हे शहराला सांस्कृतिक खजिना बनवणारे काही महत्त्वाचे घटक आहेत. याव्यतिरिक्त, हे शहर अनेक प्रसिद्ध वास्तुशिल्पीय चमत्कारांचे घर आहे जे क्षेत्राचा समृद्ध इतिहास दर्शविते.

बृहदेश्वर मंदिर:-

शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे बृहदेश्वर हे शिव मंदिर इसवीसन १००४ ला बांधायला घेतलेले हे मंदिर १०१० मधे बांधून पूर्ण झाले. पूर्व-पश्चिम २४०.७९ मीटर तर उत्तर-दक्षिण १२१.९२ मीटर पसरलेली ही विशाल कलात्मक वास्तू अक्षिय व सममितीय सूत्रे काटेकोर पाळत बांधली आहे. त्याकाळात आजसारखे आधुनिक तंत्रज्ञान नसतांना हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अवघ्या सहा वर्षात पूर्ण झाला याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्णपणे ग्रॅनाईटमध्ये बांधले असून त्यासाठी १,३०,००० टन ग्रेनाईट वापरले गेले आहे असे म्हणतात: हा शुद्ध स्थापत्याचा नमुना मानला जातो. (म्हणजे पायऱ्यांपासून ते शिखरापर्यंत एकच बांधकाम साहित्य वापरून बांधलेले स्थापत्य इथे ग्रेनाईट) अगदी जवळ त्याची उपलब्धता नसल्याने मंदिरापासून ५० ६० किलोमीटर दूरवरून ते आणण्यात आले होते. २०१० साली या मंदिराला एकहजार वर्षे पूर्ण झाली. त्याचे औचित्य साधत भारत सरकारने एक हजार मूल्याचे नाणे काढले होते. ज्यात ८०% चांदी व २०% तांबे वापरले होते.

त्यात प्रवेश करण्यापूर्वी मंदिराभोवतीची दगडी तटबंदी दिसते एखाद्या किल्ल्याभोवती असावी अशी ही भक्कम तटबंदी असून त्याच्या अलीकडे खंदकही आहे. मुळची तटबंदी वासळल्यानंतर त्याची पुनर्बाधणी सोळाच्या शतकात नायक राजांनी केली आहे. मंदिरात शिरतांना सर्वप्रथम लागते ते दगडी तोरणद्वार ‘मराठा गेट हे नाव ऐकूनच अभिमान दाटून येतो.

बृहदेश्वर मंदिर व नृत्यकला यांचा फार जवळचा संबंध दाखवणारा हा संकेत असावा असे लयदार नृत्यमग्न शिव-पार्वती मूर्ती बघून वाटून गेले. कारण नृत्यकलेतील कलाकारांसाठी हे मंदिर म्हणजे आकर्षण बिंदूच होते. उदार राजाश्रय देत राजाने भरतनाट्यममध्ये पारंगत झालेल्या कलाकारांसाठी या मंदिराद्वारे मानाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. या मंदिरात भरतनाट्यमच्या ८१ नृत्यमुद्राही कोरल्या आहेत. दुसरे म्हणजे १०८ प्रकारातील शिवाचे तांडव नृत्य गर्भगृहावरील वरच्या स्तरावर शिल्पांकित केले आहे. त्या काळात चारशे नृत्यांगना व दोनशे पन्नास वादकांच्या राहण्याची सोय मंदिराच्या अंतर्गत भागात केली गेली होती. ईश्वर अर्चनातील अनेक अंगांपैकी वादन व गायन हे चौदावे तर नृत्य हे पंधरावे अंग मानले गेले आहे. त्यामुळे इथे प्रातः, माध्यान्ह व सायं पूजेच्या वेळी नृत्य, गायन वादनातून ईश्वराला भक्तिभाव अर्पण केला जात असे. या गोष्टींची माहिती आपल्याला गोपुरावर कोरलेल्या लेखांवरून मिळते. हे शिलालेख तमिळ भाषेत असून त्यावर मंदिराबद्दलच्या महत्त्वाच्या तपशिलांबरोबर तिथे नेमलेल्या नृत्यांगना. त्यांची नावे, अभिनय, मुद्रा, चापल्य यापैकी त्या नर्तिकेचे प्राविण्य क्षेत्र, त्यासाठी धन अथवा जमीनजुमला स्वरूपात राजाने दिलेले पुरस्कार, वेतन या सगळ्यांवर प्रकाश पडतो..

दाक्षिणात्यमंदिर स्थापत्यात गर्भगृह व त्यावरील शिखर याला ‘विमान‘ हे संबोधन वापरले जाते. शिखरावर बाह्य भागात कैलास पर्वताचा भास निर्माण होईल असा आकार देऊन त्यावर शिव, कार्तिकेय, गणपती व इतर देवमूर्ती कोरल्या आहेत. या विमानाची उंची ६६ मीटर आहे. त्यावरील गोलाकार मुख्य शिखर ज्याला कुंभक म्हटले जाते ते ७.८ मीटर घेर असलेले आहे. त्याचे वजन ८० टन असून ते एकसंध दगडाचे बनले आहे.

असा किस्सा सांगितला जातो की… हे मंदिर बांधून पूर्ण झाल्यावर राजराज राजा त्याची पहाणी करीत होता. त्याच्या सोबत मुख्य स्थापत्यविशारदही होता. पहाणी झाली काम मनाजोगत य उत्तमच झाले होते. खुशीत येऊन राजा त्या भव्य व देखण्या मंदिराकडे पहात असतांनाच त्याच्या मनात अचानक चिंता डोकावली व त्याने विचारले, हे मंदिर भविष्यात कधी पडेल का? पावर स्थापत्यविशारद हसून गमतीने महणाला, ‘राजा, हे मंदिरच काय पण याची सावलीही पडणार नाही.’

“तामिळनाडू मधील तंजावरच्या मराठा साम्राज्याचा भव्य इतिहास” :-

१) श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे सख्खे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे हे तंजावरचे पहिले मराठा राजे होते.
२)श्रीमंत शहाजी राजांनी ही सत्ता व्यंकोजी राजे यांना मिळवून दिली होती.चेन्नई जवळच्या जिंजीचा किल्ला हा मराठा साम्राज्याचा भाग होता.
३) तंजावरचे मराठा साम्राज्य एकूण 180 वर्षे टिकून होते.
४) सन १८३२ मध्ये तिसरे शिवाजी यांची सत्ता ब्रिटिशांनी बरखास्त केली. हे तंजावरचे शेवटचे मराठा राजे होत.
५) सातारा, कोल्हापूर प्रमाणे आजही तंजावर येथे भोसले संस्थानिक आहे.
६) तंजावरच्या मराठा राजवटीतील शूर व विद्वान राजा म्हणजे पहिले “सरफोजी” होय.
७) तंजावरचे मराठा साम्राज्य विद्वत्ता व कला संपन्न होते.
८) तेथील मराठा राजांनी 50 हून अधिक विविध विविध ग्रंथ लिहिले असून, त्यात 12 दर्जेदार नाटके आहेत.
९)यातीलच एक मराठी नाटक रंगमंचावर तंजावर येथे सादर केले गेले, ते रंगमंचावरील पहिले मराठी नाटक होय.
१०) राजा चोळ याने बांधलेल्या बृहदेश्वर राजराजेश्वर मंदिराच्या भींतीवर मराठा राजांनी मराठा साम्राज्याचा जगातील सर्वात मोठा मराठी शीलालेख कोरला आहे.
११) भारतातील पहिला छापखाना राजे सरफोजी यांनी तंजावर येथे सुरू केला.
१२) कवी परमानंद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार लिहिण्यास सुरुवात केलेला “शिवचरित्र” ह्या मुळ ग्रंथाची अस्सल प्रत येथे आजही आहे.
१३) भारतातील मुलींची पहिली शाळा राजे सरफोजी यांनी तंजावर येथे काढली.मराठा राजांनी भरतनाट्यम या नृत्याला राजाश्रय दिला होता.
१४) मराठा राजांनी मराठी सण, उत्सव, व्रत, कला ई. तंजावर मध्ये रूजविले.तसेच सरफोजी यांनी भव्य ग्रंथालय उभारले आहे. सदरील पोस्ट आपण आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची या पेजवर वाचत आहात त्यात युध्दशास्त्रा पासून वैद्यकशास्त्रा पर्यंत पशू, पक्षी, आरोग्य, अर्थ, कला, ज्यातिषशास्र, वास्तूशास्र, बांधकामशास्त्र ईत्यादी 17 विषयावर हजारो ग्रंथ येथे आहेत. एकूण ग्रंथ संपदा 3 लक्ष एवढी आहे.

१५) तंजावरच्या या ग्रंथालयात एक ग्रंथ असा विस्मयचकित करणारा आहे, त्याच्या ओळी उजवीकडून वाचल्या तर “रामायण”, डावीकडून वाचल्या तर “महाभारत” आणि “वरून खाली वाचल्या तर “श्रीमदभागवत” आहे.
१६) ताडाच्या, पामच्या झाडाच्या पानावर लिहिलेले पुरातन ज्योतिष शास्त्र व इतर ग्रंथ तंजावरच्या मराठा राजांनीच जतन करून ठेवलेले आहेत.
१७) तंजावरच्या भोसले संस्थानने सन 1962 च्या चीन युद्धाच्या वेळी जवळपास 2000 तोळे सोने भारत सरकारला मदत म्हणून दिले होते.
१८) विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीला 100 एकर जमीन दान दिली होती.
१९)तंजावर मध्ये आजही सुमारे 1 लाख मराठी लोक राहतात, ते पेहराव तामिळी घालत असले तरी ते घरात तोडकी मोडकी मराठीच बोलतात.

सरस्वती महाल लायब्ररी:-

ब्रिटानिका एन्सायक्लोपीडियाने सरस्वती महाल लायब्ररीला “भारतातील सर्वात आश्चर्यकारक ग्रंथालय” म्हणून सूचीबद्ध केले आहे.

तामिळनाडूतील तंजावर मधील सरस्वती महाल लायब्ररी ही आशिया खंडातील एक जुनी लायब्ररी आहे. सरफोजी राजे मेमोरियल म्यूजियम म्हणूनही ती ओळखली जाते. तिकडे छत्रपती शिवाजी महाराज यांचे बंधू व्यंकोजी राजे भोसले यांचे राज्य होते. ही लायब्ररी 16 व्या शतकात आधीच्या नायक राजांनी सुरु केली असली तरी व्यंकोजी राजेंचे वंशज सरफोजी भोसले II यांनी ती 17व्या शतकात खूप वाढवली. भूर्जपत्रे, हस्तलिखिते अशा सुमारे 60 हजार प्राचीन, जुन्या ग्रंथांचा तिथे समावेश आहे. त्यापैकी काही इंटरेस्टिंग पुस्तके तिथे डिस्प्लेला ठेवली आहेत.
सरफोजी हे स्वतः अतिशय मोठे अभ्यासक, ज्ञानी आणि कलाकार होते. अनेक विज्ञानशाखा तसेच भारतीय भाषांबरोबरच त्यांना जर्मन, फ्रेंच, इटालियन अशा अनेक भाषा अवगत होत्या. लायब्ररी संपन्न करण्यासाठी त्यांनी उत्तरेकडील संस्कृत अध्ययन केंद्रांकडून पुस्तके मिळवणे, विकत घेणे, लिहिणे, प्रति करणे ह्यासाठी अनेक पंडितांना नोकरी दिली.

साधारण 40 हजार हस्तलिखिते ही तामिळ आणि संस्कृतमधील असली तरी 3 हजार पेक्षा जास्त मराठीतील ग्रंथही आहेत. मराठीत 1200 ग्रंथ हे मोडी लिपीतही आहेत. तेलगू, पर्शियन, उर्दू असेही ग्रंथ आहेत. मराठीत संत साहित्य आहे तसंच मराठा राज्याचे खूप मोठे रेकॉर्ड सांभाळून आहे.विषयांचं वैविध्य देखील प्रचंड आहे त्यात आयुर्वेद, धन्वंतरी, मेडिकल केस स्टडी, चित्रमय बायबल, जगाचे प्राचीन नकाशे, तंजावरचे टाऊन प्लांनिंग आणि underground drainage नकाशे, व्याकरण, भाषाशास्त्र, अश्वशास्त्र, वनस्पतीशास्त्र, जीवशास्त्र, फुलपाखरे, प्राणी, पक्षी प्रकार, चित्र, शिल्प कला, संगीत अशी वेगवेगळी पुस्तके, मराठा दरबारातील भोजन कुट्टुकेलम आणि सरभेंद्र पाकशास्त्रम अशा नावाने मराठी पाककलेची दोन पुस्तके तिथे संग्रहि आहेत. प्राण्यांच्या चेहेऱ्याचे मनुष्य अशी प्रत्येक प्राण्यांच्या चेहेऱ्यावरून केलेली मजेशीर पुस्तकेही तिथे होती.

जगाचा प्राचीन नकाशा आणि अखंड भारत बघून स्वस्थ वाटलं. बरोबरच समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वेदांत उपदेश केल्यासंदर्भातील हस्तलिखित तिथे महाराज आणि समर्थ रामदास दोघांच्या चित्रासहित डिस्प्ले केलं होतं. समर्थ रामदासांचे सतराव्या शतकातले एक चित्र तिकडे तंजावर मधल्या लायब्ररीत महाराजांच्या भावाच्या वंशजांनी अजून जपून ठेवलं आहे.

गंगाईकोंडा चोलापुरम

भारतीय इतिहासातील महान राज्य म्हणून ओळखल्या जाणार्‍या चोल साम्राज्याने हे वास्तुशिल्पीय आश्चर्यकारक स्थान विकसित केले. सुमारे दोन शतके, गंगाईकोंडा चोलापुरमने चोल साम्राज्याची राजधानी म्हणून काम केले. ही अप्रतिम रचना काळाची आहे आणि तंजावरच्या इतिहासात ती महत्त्वाची आहे. चोल राजा राजेंद्र याने पाल राजघराण्यावरील विजयाचे प्रतीक म्हणून त्याची उभारणी केली. तंजावरमध्ये पाहण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक म्हणजे भगवान शिव मंदिर, जे या शहराच्या एका छोट्याशा शहरात आधुनिक रूपांतराच्या दरम्यान भव्यतेचे प्रतीक आहे.

विजयनगर किल्ला

बृहदीश्‍वर मंदिरापासून सुमारे २ किलोमीटर अंतरावर विजयनगर किल्ला हे लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. इसवी सन १५५० च्या सुरुवातीला, नायक राजे आणि काही मराठा शासकांनी हा भव्य किल्ला बांधण्यासाठी सहकार्य केले. तंजोर पॅलेस, संगीता महल, ग्रंथालय आणि अनेक शिल्पे आणि चित्रे असलेली एक अप्रतिम कलादालन हे सर्व किल्ल्याच्या आत आहे. कंपाऊंडमध्ये शिवगंगा उद्यानाचाही समावेश आहे. बहुतांशी भग्नावस्थेत असूनही हा किल्ला आजही एकेकाळी असलेले सामर्थ्य आणि वैभवाची प्रचिती आपल्याला येते.

राजराजा आणि त्याचा मुलगा राजेंद्र प्रथम यांनी तंजापूर आणि गंगाईकोंडाचोलापुरम येथे अनेक मोठी मंदिरे बांधली, ज्यांना स्थापत्य आणि शिल्पकलेचे चमत्कार म्हणतात. राजराजा चोलाला प्रजेने पोन्नियिन सेल्वन हे नाव दिले होते, म्हणजे कावेरीचा पुत्र.चौलांनी ९ व्या शतकापासून ते १३ व्या शतकापर्यंत दक्षिण भारताच्या मोठ्या क्षेत्रावर राज्य केले.त्यांचा राजकीय प्रभाव श्रीलंका, मालदीव, थायलंड आणि मलेशियापर्यंत पसरला.

प्राचीन भारताच्या उन्नत संस्कृतीचा अद्भुत मानबिंदू म्हणजे आपली ऐतिहासिक मंदिरे वारसास्थळे. या मंदिरांच्या कणाकणात इतिहासाचा श्रीमंत खजिना भरून राहिला आहे जो आपल्या पूर्वजांनी वारसारूपाने आपल्याकडे सोपवला आहे. आणि म्हणूनच तो प्रत्येक भारतीयाने समजून घ्यायलाच हवा.

नुकताच पीएस -१ (पोन्नियिन सेल्वन-कावेरीचा मुलगा ) हा चित्रपट येऊन गेला त्यात चोल साम्राज्याचा समृद्ध इतिहास दर्शवला आहे….

Back to top button