CultureNews

सांस्कृतिक भारताचे दर्शन घडवणार … ही क्रूझ

पंतप्रधानांच्या(PM) हस्ते वाराणसी येथे जगातील सर्वात लांब ‘रिवर क्रूझ’-“गंगा विलास”चं लोकार्पण.

भारतात जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे कारण यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

ॐ नमो गंगायै विश्वरुपिणी नारायणी नमो नम:।

गंगा (Ganga river cruise ) समस्त भारतीयांसाठी पवित्र नदी आहे. गंगा नदीला केवळ नदीच नव्हे तर माता म्हणून पूजले जाते. भगीरथ राजाने अथक प्रयत्न करून गंगेला स्वर्गातून पृथ्वीवर आणले. वेद आणि पुराणांमध्ये सुद्धा गंगेचा उल्लेख पाहायला मिळतो. आजही कितीतरी ऋषी-मुनींचे आश्रम या नदी किनारी पाहायला मिळतात. भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखल्या जाणार्‍या भारताची सर्वात पवित्र नदी गंगा देखील ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्वाची आहे. भारताच्या ४०% लोकसंख्येला ती पाणी पुरवते म्हणून, गंगा भारताची जीवनरेखा मानली जाते.

आज याच गंगा नदीतून समग्र विश्वाला(WORLD) भारतराष्ट्राच्या आध्यात्मिक,सांस्कृतिक वैभवाचे(INDIAN CLTURE) दर्शन घडवायला सज्ज आहे “गंगा विलास क्रूझ.”

गंगा विलास क्रूझचा प्रवास वाराणसीतील रविदास घाट येथून सुरू होईल आणि बिहार, बंगालमार्गे बांगलादेशला वळसा घालून आसाममधील दिब्रुगड मध्ये संपेल. ही क्रूझ एकूण ५१ दिवसांत ३,२०० किमीचा प्रवास करेल.

गंगा विलास क्रूझची वैशिष्ट्ये:-

-गंगा विलास क्रूझ कोलकात्यातील एका शिपयार्डमध्ये तयार करण्यात आली आहे. संपूर्णपणे स्वदेशी बनावटीची(MADE IN INDIA) असलेली ही क्रूझ आत्मनिर्भर भारताचे(ATMNIRBHAR BHARAT ) एक सर्वोत्तम उदाहरण आहे.

ही क्रूझ २०२० मध्ये पूर्ण तयार झाली होती. मात्र कोरोनामुळे उद्घाटन करता आलं नाही.

प्रवासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पंचतारांकित सोयीसुविधा या क्रूझमध्ये देण्यात आल्या आहेत.

६२.५ मीटर लांब, १२.८ मीटर रुंद आणि १.३५ मीटर खोल असलेल्या या ३ मजली क्रूझमध्ये एकूण १८ स्विट्स (suites) म्हणजेच लक्झरी रूम्स आहेत.

प्रत्येक रूममध्ये कन्व्हर्टिबल बेड, फ्रेंच बाल्कनी, एअर कंडिशनर, सोफा, एलईडी टीव्ही, स्मोक अलार्म, अटॅच बाथरूम अशा सर्व सुविधा आहेत.

क्रूझवर ऑनबोर्ड जिम, स्पा, आउटडोअर ऑब्झर्व्हेशन डेक, खाजगी बटलर सेवा आणि प्रवाशांसाठी विशेष संगीत, सांस्कृतिक कार्यक्रमांची देखील रेलचेल आहे.

देशातील वैशिष्ट्यपूर्ण खाद्य संस्कृती, धार्मिक विविधता आणि नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद पर्यटकांना अनुभवता येईल.

क्रूझचं इंटेरिअर आपल्या देशाची संस्कृती आणि वारसा लक्षात घेऊनच तयार करण्यात आलंय.

महत्वाचं म्हणजे या क्रूझवर एक सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे, जेणेकरुन कोणतेही सांडपाणी गंगेत वाहून जाऊ नये.

गंगा विलास क्रूझचा प्रवासाचा रूट :-

ही क्रूझ १३ जानेवारीला वाराणसीहून निघेल, त्यानंतर ५१ दिवसांनी म्हणजेच १ मार्चला ही क्रूझ आसाममधील दिब्रुगडला पोहोचेल. या ५१दिवसांत ही क्रूझ भारतातील उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम अशा पाच राज्यांमधून प्रवास करत बांगलादेशकडे रवाना होईल. क्रूझ बांगलादेशात १५ दिवस मुक्कामी असेल.

https://twitter.com/shipmin_india?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1613376674900643841%7Ctwgr%5Ec075d762b1121f4fe311e4f320ee7f4fe6fed98d%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.bbc.com%2Fmarathi%2Farticles%2Fc3gz79n88zdo

ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्वाच्या ठिकाणी थांब्यांसह भारताचा समृद्ध वारसा दाखवण्यासाठी गंगा विलासचा प्रवास कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. वाराणसीतील गंगा आरती आणि बौद्ध पंथासाठी अत्यंत पवित्र ठिकाण असलेल्या सारनाथला भेट दिल्यानंतर या प्रवासाला सुरुवात होईल. त्यानंतर प्रवासी बिहार स्कूल ऑफ योगा, विक्रमशिला विद्यापीठाला भेट देतील, ज्यामुळे त्यांना अध्यात्म आणि ज्ञानाच्या समृद्ध वारशाचं दर्शन घडेल. रॉयल बंगाल टायगरसाठी प्रसिद्ध असलेल्या बंगालच्या सुंदरबनच्या डेल्टामधील जैवविविधतेने नटलेल्या जागतिक वारसा स्थळ, तसेच एक शिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातून देखील ही क्रूझ प्रवास करेल.

या शिवाय संपूर्ण प्रवासात पर्यटकांना विविध राज्यातील एकूण ५० पर्यटन स्थळांना भेटी देता येतील. यात जागतिक वारसा स्थळे, राष्ट्रीय उद्याने, नद्यांचे घाट आणि इतर ठिकाणांचा समावेश असेल.

गंगा विलास क्रूझचे भाडे किती असेल?

गंगा विलास क्रूझ सुरू झाल्यामुळे देशातील रिव्हर क्रूझ पर्यटनाला मोठी चालना मिळेल. या क्रूझवर एकूण ३६ प्रवाशांची राहण्याची सोय आहे. गंगा विलास क्रूझ राईडसाठी, दररोज ४०,००० रुपये मोजावे लागतील; म्हणजेच, जर एखाद्या व्यक्तीने ५१ दिवस प्रवास केला तर त्याला अंदाजे २० लाख रुपये द्यावे लागतील. या पंचतारांकित क्रूझचे तिकीट अंतरा लक्झरी रिव्हर क्रूझच्या www.antaracruise.com या वेबसाइटवरून बुकिंग केले जाऊ शकते.

भारताची समृद्ध आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि भौतिक विविधता दर्शविणाऱ्या क्रूझच्या उद्घाटनाच्या वेळी जहाजात सर्व प्रवासी स्वित्झर्लंडचे आहेत. यावरूनच भारताची पर्यटन क्षमता सिद्ध होते. क्रूझचे संचालक राज सिंग म्हणाले की, पुढच्या २ वर्षांसाठीची तिकिटं आधीच बुक झाली आहेत. स्वदेशी तंत्रज्ञान आणि फर्निचरयुक्त हे क्रूझ भारतातील एकमेव असं क्रूझ आहे. या क्रूझचं डिझाइन भारतातील आर्ट हिस्टोरियन डॉ. अन्नपूर्णा गरिमाला यांनी केलंय.

आपल्या सणांमधील दान, तपस्या आणि श्रद्धेचे महत्व त्यातील नद्यांची भूमिका अत्यंत आवश्यक आहे. यामुळे नदी जलमार्गाशी संबंधित प्रकल्प अधिक महत्वपूर्ण ठरतात. या क्रूझमुळे भारतातील पर्यटनस्थळे जगाच्या पर्यटन नकाशावर येतील, पर्यटन आणि रोजगार क्षमतांना चालना मिळेल.

“Nothing is softer or more flexible than water, yet nothing can resist it.” — Lao Tzu

गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती।
नर्मदे सिन्धु कावेरी जले अस्मिन् सन्निधिम् कुरु।।

https://economictimes.indiatimes.com/news/india/worlds-longest-river-cruise-ganga-vilas-costing-rs-50-55-lakh/person-fully-booked-till-mar24/articleshow/96968200.cms

Back to top button