NewsWorld

मोसादेघ….आणि….मोदी

इराण (Iran) ऐतिहासिक नाव पर्शिया (Persia ) !सध्‍याचे नाव इराण… भारत आणि इराणचे इतिहासकालापासून चांगले संबंध आहेत… आपल्या मराठी, हिंदी किंवा इतर भारतीय भाषांतून देखील अनेक फारसी शब्द आपण सर्रास वापरतो… वानगीदाखल चादर, जमीन, चेहरा, सफेद आणि असे अनेक शब्द… परंतु ते मूळचे फारसी आहेत हे आपणाला माहित नसते… आपल्या अनेक खाद्य पदार्थांवर फारसी खाद्य संस्कृतीचा प्रभाव आहे… अखंड भारताची सीमा १४ ऑगस्ट १९४७ पर्यंत इराणला भिडलेली होती… आपल्या भाषा, संस्कृती आणि परंपरांमध्ये अनेक समान दुवे आहेत… आजच्या आधुनिक युगात दोन्ही देशांमध्ये मजबूत व्यावसायिक, ऊर्जा, सांस्कृतिक संबंध आहेत…

भारतासाठी (bharat) पर्शियन आखात आणि कॅस्पियन समुद्र यांच्यातील भौगोलिक स्थितीमुळे इराणचे स्थान धोरणात्मक आणि महत्त्वपूर्ण आहे… अनेक अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर, अफगाणिस्तान आणि मध्य आशियाई देशांना कनेक्टिव्हिटीचा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देत असल्याने इराण भारतासाठी महत्त्वपूर्ण आहे… इराणकडे जगातील सर्वात मोठे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे आहेत… ज्याचा भारत आपल्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी वापर करत आहे… तर दुसरीकडे, इराणसाठी, भारताचे धोरणात्मक स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे…

इराण भारताला मोठ्या प्रमाणावर तेल निर्यात करत असल्याने जेव्हा-जेव्हा इराण-अमेरिका संघर्ष वाढतो तेव्हा त्याचा भारतावरही विपरीत परिणाम होतो…

तुम्ही कधी विचार केला आहे का “इराणी लोक अमेरिकेला “सैतानी देश” का म्हणतात?

इराणच्या तेल व्यापारावर इंग्रजांचे आधीपासून वर्चस्व होते… ते प्रमाण इतके होते की, इराणच्या एकूण तेलाच्या उत्पादनापैकी ८४ % तेलावर इंग्रजांचे हक्क होता तर इराणकडे फक्त १६% हक्क होते… इराणचा सम्राट मोहम्मद रझा पहलवी हा अत्यंत भ्रष्ट होता… त्यामुळे त्याची इंग्रजांना पर्वा नव्हती! (इराणमध्ये घटनात्मक राजेशाही होती, संवैधानिक राजेशाहीमध्ये निवडणुका, संसद असतात)…

१९५१ मध्ये मोहम्मद मोसादेघ(Mohammad Mosaddegh) पंतप्रधान म्हणून निवडून आले…ते कट्टर देशभक्त होते… इराणच्या तेल व्यापारात परकीय कंपन्यांचे वर्चस्व त्यांना अजिबात आवडले नाही… १५ मार्च १९५१ रोजी त्यांनी इराणच्या तेल उद्योगाच्या राष्ट्रीयीकरणाचे विधेयक संसदेत मांडले… ते बहुमताने मंजूर करून घेतले… हे विधेयक मंजूर झाल्यानंतर इराणी जनतेला आनंदाची स्वप्ने पडू लागली की… आता आपली गरिबी दूर होईल… देशात सुबत्ता येईल…

टाइम्स मासिकाने १९५१ मध्ये मोसादेघला “मॅन ऑफ द इयर” म्हटले होते…

पण या घडामोडींमुळे इंग्रजांचे(british) खूप नुकसान झाले… मोसादेघला हटवण्यासाठी इंग्रजांनी अनेक छोटे-मोठे प्रयत्न सुरू केले… मोसादेघला प्रचंड मोठी लाच देण्याचा प्रयत्न केला गेला… पण मोसदेघ त्याला बळी पडला नाही… मोसादेघच्या हत्येचा… त्याला संपवण्याचा… तसेच त्याच्याविरुद्ध लष्करी उठाव करण्याचा प्रयत्न केला गेला… परंतु मोसादेघ अत्यंत अनुभवी, हुशार आणि चलाख असल्यामुळे ब्रिटिशांच्या हत्येचे… लाचखोरीचे… लष्करी उठावाचे डाव फसले… उलट मोसादेघ हा इराणमध्ये पूर्वीपेक्षा लोकप्रिय झाला…

मोसादेघ अत्यंत लोकप्रिय असल्याने लष्करी उठाव शक्य नव्हता… शेवटी ब्रिटिशांनी अमेरिकेकडे मदत मागितली… अमेरिकेच्या सीआयएने मोसादेघला हटवण्यासाठी १ दशलक्ष डॉलर्सचा निधी मंजूर केला… १ मिलियन डॉलर म्हणजे ४२५० कोटी रियाल (इराणी चलन)… तेहरान (इराणची राजधानी) येथील अमेरिकन राजदूताकडे हा निधी पाठवण्यात आला…

इथे मोसादेघला इराणमधील राजेशाही पूर्णपणे संपवून संसदेला सर्व अधिकार द्यायचे होते… त्यामुळे इराणचा सम्राटही इंग्लंड आणि अमेरिकेच्या बाजूने होता…

मोसादेघ यांच्या विरोधात असंतोष निर्माण करणे… मोसादेघला असलेले जनसमर्थन संपवून टाकणे… नंतर भ्रष्ट संसद सदस्यांच्या मदतीने त्यांचे सरकार उलथून टाकणे ही ब्रिटिशांची योजना होती…

मोठ्या संख्येने इराणी पत्रकार, संपादक, मुस्लिम धर्मगुरू यांना अमेरिकेने ६३१ कोटी रियाल दिले होते… आणि त्या बदल्यात मुस्लिम धर्मगुरुंसकट या सर्वांना एकच गोष्ट करायची होती… ती म्हणजे मोसादेघच्या विरोधात लोकांना भडकवणे…

इराणच्या संसदेच्या सदस्यांना मोसादेघ यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी प्रत्येकी ४६ दशलक्ष रियाल दिले गेले… खोट्या निषेधांमध्ये सहभागी होण्यासाठी हजारो इराणींना पैसे देण्यात आले… त्यानंतर संसदेवर मोर्चा काढण्यास सुरुवात केली गेली… जगभरातील मोठ्या मीडियाने देखील अमेरिकेला पाठिंबा देण्यास सुरुवात केली… “द न्यू यॉर्क टाईम्स” मध्ये मोसादेघला “हुकूमशहा” म्हणून संबोधले जाऊ लागले… टाईम मासिकाने मोसादेघची निवड धोकादायक म्हटले… मोसादेघचा विरोध अत्यंत खालच्या पातळीवरून सुरू झाला… व्यंगचित्रांमध्ये त्याला समलिंगी म्हणून दाखवण्यात आले…

इराणने अमेरिकेवर(USA) आपल्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप केला… १९५३ मध्ये अमेरिकन गुप्तचर एजन्सी CIA ने युनायटेड किंगडमच्या मदतीने… इराणचे पहिले लोकशाही पद्धतीने निवडलेले पंतप्रधान मोहम्मद मोसादेघ यांनी देशाच्या तेल उद्योगाचे राष्ट्रीयीकरण करण्याचा प्रयत्न केल्यानंतर… त्यांना पदच्युत करण्यासाठी सुरू असलेल्या बंडाचे समर्थन केले…

भ्रष्ट खासदारांद्वारे आपले सरकार उलथून टाकले जाणार आहे हे लक्षात येताच मोसादेघ यांनी संसद विसर्जित केली… आणि शेवटी अमेरिकेने इराणच्या सम्राटाला मोसादेघला पंतप्रधानपदावरून हटविण्यास भाग पाडले… मोसादेघला आदेश स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा घटनात्मक अधिकार असल्याने
.. त्याने आदेश नाकारल्यास त्याला अटक करण्याचा निर्णय घेतला… पण मोसादेघच्या सैनिकांनी त्याला अटक करण्यासाठी आलेल्या आर्मी युनिटला अटक केली… आणि हे समजताच इराणचा सम्राट बगदादला पळून गेला… शेवटी २१० दशलक्ष रियालची लाच देऊन अमेरिकेने इराणच्या राजधानीत दोन्ही बाजूंच्या भाडोत्री सैनिकांसह बनावट दंगल घडवून आणली… दंगलखोरांनी मोसादेघच्या घरावर हल्ला केला… मोसादेघला पळून जाण्यास भाग पाडले… सैन्याने सत्ता उलथून टाकली…

सम्राट बगदाद वरून इराणला परतला… मोसादेघने आत्मसमर्पण केले… त्याच्यावर खटला चालवला गेला… तुरुंगात डांबण्यात आले आणि नंतर मृत्यूपर्यंत घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले… मोसादेघचा वयाच्या ८५ व्या वर्षी मृत्यू झाला… त्याचे पार्थिव कब्रस्तानात दफन न करता… त्याच्या घराच्या दिवाणखान्यातच पुरण्यात आले…

मोसादेघ राजवट उलथून टाकल्या नंतर… अमेरिका आणि इंग्लंडने ४०% – ४०% इराणी तेल वाटून घेतले आणि उर्वरित २०% इतर युरोपीय कंपन्यांना दिले…

अनेक दशके इराणी जनतेला शाहच्या हुकूमशाहीत राहावे लागले… १९७८ सालाच्या इस्लामिक क्रांतीने राजेशाही संपवली खरी… पण धर्मांध हुकुमशहा आयातोल्ला खोमेनी सत्तेवर आला… आणि इराणी जनतेचा आणखीनच वाईट काळ आला…

मोसादेघचा गुन्हा काय होता?… आपल्या देशातील क्षेत्रांवर विदेशी कंपन्यांऐवजी स्वदेशी कंपन्यांचे अर्थात जनतेचे वर्चस्व असावे… हे धोरण त्याचा गुन्हा..? मोसादेघ यांच्या नेतृत्वाखाली इराण १९५५ पूर्वीच पूर्णतः लोकशाही देश बनला असता… आणि तेल उत्पादनाचा इराणला १०० % फायदा झाला असता… इराणी लोकांवर पुढील अनेक दशके अत्याचार केले गेले नसते… एक मजबूत लोकशाही आणि तेल तसेच नैसर्गिक वायू उत्पादन क्षेत्रात स्वदेशी कंपन्यांची मालकी असलेली मजबूत अर्थव्यवस्था… इराण कदाचित आज सौदी अरेबियापेक्षा अधिक समृद्ध देश असता… पण इराणचे भ्रष्ट संसद सदस्य, पत्रकार, संपादक, निदर्शक जनता यांनी इराणचे समृद्ध भविष्य अवघ्या दहा लाख डॉलर्सला विकले…

या दडपशाहीच्या काळात इराणी जनतेला कळू लागले की मोसादेघचे सरकार पाडण्यात अमेरिकेचा हात आहे… १९७९ मध्ये इराणींनी अमेरिकन दूतावासात ४४४ दिवस अमेरिकन लोकांना ताब्यात ठेवले… आणि दूतावासात इराणींना कागदपत्रांचे ७७ खंड सापडले… ज्यामध्ये इराणमधील आपल्या कठपुतळ्यांना अमेरिकेने कशी भरघोस मदत केली याचा पुरावा होता… म्हणूनच इराणी लोक अमेरिकेला ‘सैतानाचा देश’ म्हणतात…

विदेशी कंपन्यांचे वर्चस्व मोडून देशी कंपन्यांना प्रोत्साहन देण्याचे धोरण मोसादेघ यांना पूर्ण करता आले नाही… त्यांनी जगातील दोन महासत्तांशी वैर स्वीकारले होते… सरतेशेवटी त्याचा दुर्दैवी अंत झाला… कारण बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये देखील प्रत्येक वेळी नायक जिंकत नाही…

शेवटी इराणचा खरा खलनायक कोण..?

अमेरिकेला विकले गेलेले पत्रकार, संपादक, खासदार आणि सारासार विवेक बुद्धी हरवून बसलेले विकाऊ राजकीय कार्यकर्ते… हे लोक विकले गेले नसते तर जनता मोसादेघच्या मागे उभी राहिली असती… अमेरिका इंग्लंड यशस्वी झाली नसती… पण चार पैशांसाठी देशभक्त नेत्याला ‘हूकुमशाह’ म्हटले गेले आणि पाहता पाहता संपूर्ण देश उद्ध्वस्त झाला!

आज आपला भारत देशही त्याच मार्गावर आहे… वेळीच सावध राहून या अत्यंत भ्रष्ट माध्यमांच्या प्रचाराला बळी न पडणे शहाणपणाचे आहे… आपल्या भारतीय नेतृत्वावर विश्वास ठेवून त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहिले पाहिजे… नाहीतर इराण सारखी आपली अवस्था अटळ आहे..त्यासाठी बड्या भांडवलदार देशांच्या गुप्तचर यंत्रणा रात्रंदिवस काम करत आहेत… या गुप्तचर संस्था भारतातील अनेक राजकारण्यांना पैसे पुरवून खेळवत आहेत… BBC ची डॉक्युमेंट्री याचे उत्तम उदाहरण आहे…

२०१४ पासून आपले सर्व विरोधी पक्ष यात आघाडीवर आहेत हे आता गुपित राहिलेले नाही… आपण अखंड सावधान असणे अत्यंत आवश्यक आहे…

शेवटी “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार”… अर्थात आपले नशीब आपल्याच हातात आहे… फक्त आपण ते नीट समजून घेणे गरजेचे आहे.

( वरिष्ठ भारतीय राजनैतिक अधिकारी म्हणून इराणमध्ये सेवा बजावलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मूळ इंग्रजी शब्दांकनाचा स्वैर अनुवाद)

https://www.quora.com/Why-should-Britain-go-to-war-with-Iran

https://www.cfr.org/timeline/us-relations-iran-1953-2022

https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/jagachya-parighatun/country-connected-with-india-iran/

Back to top button