News

वीरशैव लिंगायत हिंदूच ! भाग ४

लिंगायत(lingayat), वीरशैव (veershaiv), आरक्षण, बसवण्णा(Basava),स्वतंत्र धर्म यावरील दोन मित्रांमधील संवाद

(सत्य घटनेवर आधारीत)

ब्रिगेडि – आम्हीही हिंदूच आहोत. पण आम्हा बसवप्रेमिंना नीट मान सन्मान मिळत नाही. त्यामुळे स्वतंत्र धर्माची मागणी आहे. योग्य मान सन्मान मिळाला तर स्वतंत्र धर्म कोणाला हवाय ?

मी – योग्य मानसन्मान म्हणजे कसे ? एखादे उदाहरण देता येईल काय ?

ब्रिगेडि – हो. एक काय अनेक उदाहरणे देईन. तुम्ही एखाद्या लिंगायत मठात जा, तिथे पाहा महात्मा बसवेश्वर यांचा एकही फोटो दिसणार नाही.

मी – मग तुमची मागणी मठांमध्ये महात्मा बसवेश्वर यांचा फोटो लावा असे असले पाहिजे. स्वतंत्र धर्माची मागणी यामागे काय तर्क ?

ब्रिगेडि – आमचा शिवाचार्य, मठ यांना विरोध आहे. महात्मा बसवेश्वर यांनी यांना विरोध केला होता..

मी – महात्मा बसवेश्वर यांनी जातवेद शिवाचार्य यांच्या गुरुकुलात राहून शिक्षण घेतले. त्यांच्याकडून दीक्षा घेतली. मग महात्मा बसवन्ना हे शिवाचार्य यांच्या विरोधात कसे शक्य आहे ?

ब्रिगेडि – आता मी घाईत आहे, पुन्हा बोलूया…

(दोन दिवसांनी मी ब्रिगेडी मित्राच्या घरी गेलो. तो घरीच होता. पडवीत महात्मा बसवेश्वर, महात्मा फुले यांचा मोठा फोटो लावलेला होता.)

मी – तू शिवयोगी सिद्धरामेश्वर यांचा द्वेष करतो का ?

ब्रिगेडि – नाही. का ? तुला असं का वाटलं?

मी – घरात फक्त महात्मा बसवेश्वर यांचा फोटो आहे. शिवयोगी सिद्धराम यांचा फोटो का नाही ? मन्मथ स्वामी यांचा फोटो का नाही ? छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा का लावल्या नाहीत ?

ब्रिगेडि – येथे ज्यांचा फोटो लावला नाही, त्यांचा मी द्वेष करतो असा अर्थ होतो का?

मी – मठात, शिवालयात महात्मा बसवण्णा यांचा फोटो नाही लावला तर ते द्वेष करतात असा अर्थ होत असेल तर… ?

(मधेच थांबवत…)

ब्रिगेडि – बस.. बस… समजलं मला. सगळ्या जाती आरक्षण मागत असताना आपण गप्प राहायचं हे योग्य आहे का ? आपल्या समाजात गरीबी नाही का ?

मी – अच्छा… मूळ मुद्दा आरक्षण आहे. आरक्षण मागण्यासाठी “आम्ही हिंदू नाही” असे खोटे सांगण्याची काय गरज ? हिंदू धर्मातील अनेक जातींना आरक्षण आहे. लिंगायत समाजातील अनेक पोटजातींना सुद्धा आरक्षण आहे.

ब्रिगेडि – म्हणजे स्वतंत्र धर्माची मागणी न करता देखील आरक्षण मिळवता येऊ शकते ?

मी – मराठा आंदोलकांनी स्वतंत्र धर्माची मागणी केली आहे काय ?

ब्रिगेडि – जैन समाजास अल्पसंख्य दर्जा मिळाला. तो समाज किती प्रगत आहे.. पहा.

मी – जैन समाजाची गणना अल्पसंख्य म्हणून झाल्याने तो श्रीमंत झाला नाही. तो आधीपासूनच श्रीमंत आहे. मुस्लिम समाज अल्पसंख्य असूनही त्या समाजात गरिबी, दारिद्र्य आहे. अल्पसंख्य दर्जा मिळाल्याचा केवळ त्या समाजातील शैक्षणिक संस्थांना फायदा होतो. शैक्षणिक संस्था चालवणारे तसे आधीपासूनच गब्बर गंड आहेत.

ब्रिगेडी – तुला नेमके काय म्हणायचे आहे ?

मी – मला म्हणायचे आहे की लिंगायत समाजाचा खरा विकास करायचा असेल तर समाजात निस्वार्थ लोकांच्या संघटना उभारल्या पाहिजेत. समाजातील गरीब, होतकरू तरुणांना दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी, खेड्यातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या शहरातील शिक्षणासाठीची व्यवस्था केली पाहिजे. स्पर्धा परीक्षा, उद्योजकता याकडे विद्यार्थी वळतील असे वातावरण तयार केले पाहिजे. लिंगायत समाजात आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेल्यांची संख्या कमी नाही. आपण दिलेला पैसा समाजाच्या हिताला योग्य पद्धतीने वापरला जातोय असा विश्‍वास तयार झाल्यास मोठा निधी समाजातूनच उभारला जाऊ शकतो.

भारत स्वतंत्र झाल्यापासून आजवर विविध जाती जाति, संस्था आणि संघटना यांनी स्वतंत्र धर्माची मान्यता मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी केली. अशी मागणी करणाऱ्या या प्रस्तावांची संख्या 218 इतकी आहे. यापैकी एक प्रस्ताव लिंगायत समाजाचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची राज्यघटना बनवताना स्वतंत्र धर्माला मान्यता देण्याची व्यवस्था ठेवलेली नाही.

इच्छा असो वा नसो सर्वोच्च न्यायालय, लोकसभा, राज्यसभा, पंतप्रधान, मुख्यमंत्री यापैकी कोणालाही स्वतंत्र धर्माची मान्यता देण्याचा अधिकार नाही. जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळाला आहे, पण स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता नाही. आजही जैन समाजाला हिंदू कोड बिल नुसारच कायदे लागू होतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फार विचारपूर्वक हिंदू कोड बिल ची निर्मिती केली आहे. त्यात वर्णन केल्यानुसार जैन, बौद्ध हेदेखील हिंदू अंतर्गतच येतात.

ब्रिगेडि – मित्रा धन्यवाद. ही सगळी माहिती मला नव्हती. बामसेफी लोकांच्या संगतीला लागून मी हिंदू धर्माचा द्वेष करायला लागलो होतो. आता माझे डोळे उघडले. तुला खूप धन्यवाद. हिंदू वीरशैव लिंगायत हे तुझे पुस्तक मला वाचायला दे. मला समाजासाठी खरंच काहीतरी करायचं आहे.

मी – धन्यवाद मित्रा. तू मोठ्या मनाचा आहेस. माणसात अहंकार असेल तर तो स्वतःची चूक ध्यानात येऊनही स्वतःचेच समर्थन करत राहतो. तू तसा नाहीस. याचा मला आनंद वाटतो. आपल्यातील हा संवाद मी सोशल मीडियावर पोस्ट करू का?

माजी ब्रिगेडि – यात काय विचारायचे ? हा समाजाला जोडणारा विचार अधिक लोकांपर्यंत गेला पाहिजे.

मी – शरणू शरणार्थी. जय बसवा. ओम नमः शिवाय. मानव धर्म क्के जयवागली. सनातन धर्माचा विजय असो. भारत माता की जय.

(केवळ गैरसमज आणि चुकीची माहिती यामुळे अनेक लिंगायत तरुण फुटीर संघटनांच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यांच्यापर्यंत हा संवाद पोहोचावा, या उद्देशाने.)

Back to top button