NewsScience and Technology

शास्त्रज्ञ २१
आंतरराष्ट्रीय दर्जाचा रसायन अभियंता तुहिनकुमार रॉय

२०२३ हे वर्ष एक-दोन नव्हे तर तब्बल २३ प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञांच्या (indian scientists) जन्मशताब्दीचे वर्ष आहे. चला तर मग भारतभूमीच्या या २३ विद्वान विज्ञानकर्मींची महती आजच्या आणि उद्याच्या पिढीला सांगूया…

बदलत्या जागतिक वातावरणाचा अनुभव असलेले शास्त्रज्ञ तयार व्हावेत यासाठीच्या सरकारी योजनेचा लाभ घेत भरपूर जागतिक अनुभव गोळा करून त्यानंतर देशातील औद्योगिक विश्व समृद्ध व्हावे यासाठी थेट कंपनी स्थापन करून तरुणांना मार्गदर्शन करणारे रसायन अभियंता म्हणून तुहिनकुमार रॉय(Dr. Tuhin Kumar Roy) कायम ओळखले जातील.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच आपापल्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्थितीचा अंदाज असलेले प्रशीक्षित मनुष्यबळ निर्माण करण्याची निकड भारत सरकारला वाटू लागली. त्यामुळे १९४७ सालीच सरकार विविध क्षेत्रांतल्या पाच तरुण संशोधकांची निवड करून त्यांना अमेरिकेतील मसॅच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील प्रगत प्रशिक्षणासाठी पाठवले. त्या सर्वांना तीन वर्षांसाठी शिष्यवृत्ती व आनुशंगिक होते. खर्च देण्यात आला होता. टी के रॉय या नावाने ओळखले जाणारे तुहिनकुमार रॉय यांचा समावेश या पाच जणांत होता.

बिहारच्या मुंगेरमध्ये १ ऑगस्ट १९२३ रोजी रॉय यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण त्यांचे वडील वकिली करीत असलेल्या बद्वान शहरात झाले. तुहिन उत्तम विद्यार्थी होते. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण कोलकात्याच्या सेंट झोवियर्स महाविद्यालयात झाले तर, कोलकाता विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ सायन्समधून त्यांनी उपयोजित रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली. एमआयटीमध्ये जाण्यासाठी त्यांची निवड झाली तेव्हा ते रांचीच्या लाख संशोधन संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते.

त्यांना शिष्यवृत्तीचा कालावधी वाढवून मिळाला आणि ते रसायन अभियांत्रिकीमधील पीएचडी पूर्ण करू शकले. अमेरिकेत असताना त्यांना औद्योगिक क्षेत्रातील उपयोजित रसायनशास्त्राची झलकही पाहायला मिळाली.

त्यांनी काही कंपन्यांसाठी कामही केले आणि निकेल व कोबाल्ट खनिजापासून वेगळे करण्याच्या पद्धतींची पेटंटेही त्यांना मिळाली. ते १९५४ मध्ये भारतात परतले आणि जादवपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रसायन अभियांत्रिकी विभागात शिकवण्यास सुरुवात केली. लवकरच हे महाविद्यालय नव्याने सुरू झालेल्या जादवपूर विद्यापीठाचा भाग बनले. पण, लवकरच ते काही कालावधीसाठी अमेरिकेला गेले. तिथून परतल्यावर चार वर्षे जादवपूर विद्यापीठात राहून ते कायमचे स्थायिक होण्यासाठी दिल्लीला गेले. दिल्लीमध्ये त्यांनी सरकारी सहाय्याने तरुण रसायन अभियंत्यांना उत्तेजन देण्याकरिता एका कंपनीची स्थापना केली. या कंपनीचे पुढे केमिकल मेटलर्जिकल डिझाइन कंपनीमध्ये रुपांतर झाले आणि ते या नव्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बनले.

रॉय यांनी क्युबाला अमेरिकेशी संबंध बिघडल्यामुळे कमी झालेले त्यांचे औद्योगिक उत्पादन सुरळीत करण्यासाठी मदत केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनिअर्स या संस्थेची त्यांनी स्थापना केली. इंडियन केमिकल इंजीनियर या नितकालिकाचेही ते मानद संपादक होते. १९७४ मध्ये इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसचे फेलो म्हणून त्यांची निवड झाली आणि या संस्थेशी ते दीर्घकाळ संबंधित राहिले.

लेखक :- डॉ. भूपती चक्रवर्ती

(डॉ. भूपती चक्रवर्ती कोलकात्याच्या सिटी कॉलेजचे सेवानिवृत afterख प्राध्यापक व शिक्षक संघटनेचे सरचिटणीस होते.)

(साभार: डिसेंबर २०२२ च्या विज्ञान विश्व अंकात प्रसिद्ध झालेली लेखमाला)

Back to top button