HinduismNews

पांचजन्य आणि ऑर्गनायझर… वाचाल तर वाचाल

पांचजन्य (हिंदी) आणि ऑर्गनायझर (इंग्रजी) ही दोन साप्ताहिके स्वातंत्र्यापासून आजतागायत राष्ट्रीय विचारांच्या आधारावर निरंतर समाज प्रबोधन करत आहेत. राष्ट्र जीवनाशी संबंधित कोणताही विषय असो…हिंदुत्व,राष्ट्राची एकात्मता, अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा,परकीय आक्रमण किंवा भारतीय समाजजीवनातील सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक असा कोणताही विषय असो या दोन्ही साप्ताहिकांनी यातील प्रत्येक विषयावर सत्य व तथ्यावर आधारित प्रचुर सामग्रीच्या आधारे समाज प्रबोधनाचे आपले कर्तव्य चोख बजावले आहे. या दोन्ही साप्ताहिकांमधून वेळोवेळी राष्ट्र जीवनाशी निगडित अनेक विषयातील तज्ज्ञांनी आपले विचार प्रकट केले आहेत. विशेषतः राष्ट्रासमोरील नवनवीन आव्हानांचे अचूक व बिनतोड विश्लेषण हे या साप्ताहिकाचे आगळे वेगळे वैशिष्ट्य राहिले आहे. देशातील लोकशाही व व्यक्तीस्वातंत्र्य या घटनादत्त मुल्यांसाठी कायमच संघर्ष केला आहे.

पांचजन्य (panchjanya) आणि ऑर्गनायझर (organiser) हे “राष्ट्राचा बुलंद आवाज” या भूमिकेतून ७५ वर्षे निरंतर राष्ट्रसेवा करत आहे. राष्ट्राच्या समस्या आणि त्यावरील अचूक उपाय याच बरोबर देशभरातील रचनात्मक सेवा कार्यांच्या प्रसार व प्रचार करणे हा या साप्ताहिकांचा स्थायी भाव आहे.

विशेषतः डाव्या विचारसरणीचा पगडा असलेल्या प्रिंट माध्यमांच्या भाऊगर्दीमध्ये राष्ट्रीय विचारसरणीचा वसा घेतलेली ही दोन साप्ताहिके राजहंसासारखी उठून दिसतात. किंबहुना कम्युनिस्टांनी तर पांचजन्य आणि ऑर्गनायझरचा धसकाच घेतला आहे.

एकेकाळी पाञ्चजन्यच्या संपादकपदाची धुरा स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी ( atal bihari vajpayee) यांनी सांभाळली होती. आज तो वारसा हितेश शंकरजी यांच्याकडे चालत आला आहे आणि तो ते समर्थपणे सांभाळत आहेत.

ऑर्गनायझरचे संपादक पद श्री लालकृष्णजी अडवाणी यांनी एकेकाळी भूषवले होते. आज प्रफुल्लजी केतकर ऑर्गनायझरच्या संपादकपदाची धुरा त्याच ताकदीने सांभाळत आहे.

Pen is mightier than the sword in the hands of men extremely great..

या इंग्रजी उक्तीची प्रचिती आपल्याला ही दोन्ही साप्ताहिके वाचताना पदोपदी येते. अर्थात पांचजन्य आणि ऑर्गनायझर आपल्या घरी येणे हा निश्चितपणे अभिमानाचा विषय आहे.

ही दोन्ही साप्ताहिके देशातील अधिकाधिक वाचकांच्या हातात पडावीत यासाठी भारत प्रकाशनाने गुरुवार, दिनांक १ जुन २०२३ पर्यंत या वार्षिक सदस्यता नोंदणीसाठी विशेष अभियान चालविले आहे. आपण सर्वानी मोठ्या प्रमाणात या ज्ञान यज्ञात सहभागी होऊन राष्ट्र उभारणीच्या कार्यास हातभार लावावा हे विनम्र आवाहन…

वार्षिक सदस्यता नोंदणीसाठी अगदी सोपा मार्ग म्हणजे..

https://abhiyan.bpdl.in/konkan/

या लिंकवर जाऊन नोंदणी करणे किंवा…

संपर्क नंबर:- 9987133252

या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधणे.

Back to top button