NewsRSSSeva

संघाच्या स्वयंसेवकांनी केले ५०० युनिट रक्तदान

बालासोर रेल्वे अपघात जखमींसाठी स्वयंसेवक ठरले देवदूत

बालासोर (ओडिशा) ३ जून;-

ओडिशातील( orissa) बालासोर(balasore) येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ( rashtriya swayamsevak sangh) शेकडो स्वयंसेवक मदत आणि बचाव कार्यात गुंतले असून संघाच्या स्वयंसेवकांनी सुमारे ५०० युनिट रक्तदान केले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत प्रचार प्रमुख रवी नारायण पांडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर नेहमीप्रमाणे संघाचे स्वयंसेवक सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचले.एनडीआरएफ आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच साडेसात वाजता स्वयंसेवक तेथे पोहोचले होते. ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या बहनगा गावात सुरुवातीला स्वयंसेवक थोड्या संख्येत होते. मात्र रात्री उशिरापर्यंत सुमारे २५० स्वयंसेवकांनी अपघातस्थळी पोहोचून प्रशासन आणि मदतकार्यात गुंतलेल्या जवानांना मदत केली.मदत आणि बचावकार्यात विलंब होऊ नये म्हणून स्वयंसेवकांनी जखमींना तात्काळ ऑटो आणि मोटारसायकलने रुग्णालयात नेले. स्वयंसेवक रमेशजी हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बोगीच्या आत गेले आणि रात्रभर जखमींना बाहेर काढत राहिले तर अन्य स्वयंसेवक त्यांना रुग्णालयात नेत राहिले.

संघ स्वयंसेवकांसह प्रशासन आणि बचाव कार्यात गुंतलेल्या विविध यंत्रणांच्या जवानांनी अपघातात अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात मदत केली. अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढण्याबरोबरच त्यांना रुग्णवाहिकेत बसवण्याच्या कामात स्वयंसेवक गुतले होते.जखमी प्रवाशांना रुग्णालयात नेण्याचे काम सुरु झाल्यानंतर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी बालेश्वर जिल्हा रुग्णालयात उपस्थित राहून सेवाकार्य चालविले. संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवक रक्तदान करू लागले. येथे सुमारे ३०० स्वयंसेवकांनी रक्तदान केले.

संघाच्या स्वयंसेवकांनी स्वतः रक्तदान करण्याबरोबरच जखमी प्रवाशासाठी रक्तदान करवून घेतले. तसेच काही जखमी प्रवाशांना भद्रक जिल्हा मुख्यालय रुग्णालय आणि सोटो मेडिकलमध्ये नेण्यात आले. तेथेही स्वयंसेवकांनी रुग्णालयांमध्येही रक्तदान केले तसेच रक्ताची व्यवस्था केली. घटनास्थळापासून ते रुग्णालयापर्यंत स्वयंसेवकांनी मृतदेह बाहेर काढून रुग्णवाहिकेत नेले, जखमींना रुग्णालयात दाखल केले, रक्ताची व्यवस्था केली आणि अन्न- पाण्याचीही व्यवस्था केली. एवढेच नाही तर स्वयंसेवकांनी मोबाईलवरून जखमींच्या नातेवाईकांशी संवाद करून दिला.

या मदतकार्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद(abvp), हिंदू जागरण मंच, बजरंग दल(bajrang dal) व सेवा भारती यांचे शेकडो कार्यकर्ते सतत गुंतले होते. त्याचप्रमाणे कटकच्या एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये संघाच्या सेवा विभागाशी संबंधित स्वयंसेवक कार्यरत होते. संघाचे क्षेत्रीय सेवा प्रमुख जगदीश खाडंगा आणि राज्य सेवा प्रमुख शंतनू माझी हे देखील अपघातस्थळी उपस्थित होते आणि त्यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली हे काम करण्यात आले.

साभार :- विश्व संवाद केंद्र पुणे.

Back to top button