IslamNews

ज्ञानवापी मशिद… कशाला हवे पुरातत्व खात्याचे (ASI) सर्वेक्षण ? हा घ्या पुरावा…

वाराणसी सत्र न्यायालयाची वादग्रस्त भाग वगळता उर्वरित जागेच्या ASI सर्वेक्षणला परवानगी..

ज्ञानवापी मशिद( gyanvapi masjid) प्रकरणात ASI सर्वेक्षणासाठी परवानगी देण्यात आली आहे. वाराणसी न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या निर्णयात म्हटले आहे की, वादग्रस्त भाग वगळता उर्वरित मंदिराचे नुकसान न करता वैज्ञानिक सर्वेक्षण करावे. ASI ने ४ ऑगस्टपर्यंत न्यायालयात अहवाल सादर करावा.त्यामुळे मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळण्यात आली आहे.

मुस्लीम पक्षाने सर्वेक्षणाला स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केली होती. सुमारे दीड तास चाललेल्या चर्चेनंतर १४ जुलै रोजी वाराणसी जिल्हा न्यायाधीश डॉ.अजय कृष्ण विश्वेश यांनी आपला निर्णय राखून ठेवला होता. हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितले की, ASI ने संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण करावे, असे आम्ही सांगितले होते. आज कोर्टाने आमचा अर्ज मान्य केला आणि आता ASI या प्रकरणाची दिशा आणि स्थिती ठरवेल. शिवलिंगाचे सर्वेक्षण होणार नाही. त्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ज्याची पुढील सुनावणी २९ ऑगस्टला होणार आहे. वाराणसी न्यायालयात १४ जुलै रोजी हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी ज्ञानवापी हे आदि विश्वेश्वराचे मूळ स्थान जनभावनेशी जोडलेले असल्याचे सांगितले होते.

पाहणीदरम्यान पश्चिमेकडील भिंतीवर सापडलेल्या खुणा व अवशेषांवरून ती मंदिराची भिंत असल्याचे सूचित होते. तोंडी पुराव्याच्या आधारे कोणतीही बाजू घेता येत नाही, त्यामुळे सर्वेक्षण अनिवार्य आहे. आम्ही संपूर्ण मंदिर परिसराची सर्वेक्षणाची मागणी करतो जेणेकरून सर्वांना कळेल की हा परिसर स्वयंभू आदि विश्वेवर मंदिर आहे. मंदिराबद्दल सांगायला कोणी जिवंत नाही पण इतिहास खूप काही सांगून जातो. सर्वेक्षणानंतर वाराणसीचा इतिहास समोर येईल.मुस्लीम बाजूने सांगितले की, येथे पूर्वीपासून मशीद होती.जी कोणत्याही धार्मिक स्थळाच्या ठिकाणी बांधलेली नव्हती. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. ज्ञानवापी संकुलाचे पुरातत्व सर्वेक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे, अशी विनंती हिंदू बाजूच्या वकिलांनी जिल्हा न्यायाधीशांना केली होती.

हिंदूंमध्ये संभ्रमाचे वातावरण..

ज्ञानवापी प्रकरणावरून निर्माण झालेल्या तणावावर शास्त्रोक्त तथ्ये समोर आल्यावर त्यावर सौहार्दपूर्ण तोडगा काढला जाईल. मुस्लीम बाजूनेही यावर सहमती असली पाहिजे आणि सर्वेक्षणामुळे सध्याच्या परिस्थितीला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचणार नाही. असे अधिवक्ता विष्णू शंकर जैन यांनी वाराणसी न्यायालयात युक्तिवाद केला. १४ ते १६ मे दरम्यान ज्ञानवापीच्या ASI सर्वेक्षणात २.५फूट उंच गोलाकार शिवलिंगासारख्या आकृतीच्या वर एक वेगळा पांढरा दगड सापडला होता. त्याच्या मधोमध एक खूण होती.त्यात हुक टाकल्यावर ६३ सेमी खोलवर आढळली. गोलाकार आकाराच्या दगडाचा व्यास चार फूट असल्याचे आढळून आले. ज्ञानवापी येथील कथित कारंजात पाईपला जागा नव्हती. तर स्वस्तिक, त्रिशूल, डमरू आणि कमल ही चिन्हे ज्ञानवापीमध्ये आढळून आली. हौदाच्या मध्यभागी सापडलेली काळ्या रंगाची दगडी आकृती मुस्लिम कारंजे असल्याचे सांगत होते. त्यात कोणतेही छिद्र आढळले नाहीत. तसेच त्यात पाईप टाकण्याचीही जागा नाही.

पण आम्ही म्हणतो , जे उघड्या डोळ्यांना दिसत आहे आणि ज्याचा कागदोपत्री भरभक्कम पुरावा आहे त्यासाठी ASI सर्वेक्षणाची गरज तरी काय ?

हे घ्या ज्ञानवापी मशीद हे मूळचे काशी विश्वनाथाचे मंदिर( kashi vishwanath temple) होते याचे पुरावे..

१) ८ एप्रिल १६६९ रोजी क्रूरकर्मा औरंगजेबाने( aurangzeb) आपला सुभेदार अबुल हासन च्या नावाने एक फर्मान जारी करून काशी ची मंदिरे तोडण्याचा आदेश दिला आहे.हे फर्मानानूसार २ सप्टेंबर १६६९ ला औरंगजेबाच्या अधिकाऱ्यांनी काशी विश्वनाथाचे मंदिर पाडल्याचे जाहीर केले. वाराणसी गॅझेट मध्ये याचे लिखित दस्ताऐवज उपलब्ध आहेत.

https://www.aajtak.in/india/uttar-pradesh/story/kashi-vishwanath-temple-demolished-ordered-by-aurangzeb-maasir-alamgiri-saqi-mustaid-khan-ntc-1466721-2022-05-19?utm_source=atweb_story_share

https://www.amarujala.com/uttar-pradesh/varanasi/gyanvapi-survey-aurangzeb-demolished-vishwanath-mandir-gave-decree-destroy-all-temples-and-sanskrit-school-in-kashi

२) १७७७ ते १७८० या काळात क्रूरकर्मा औरंगजेबाने उध्वस्त केलेल्या काशी विश्वनाथ मंदिराच्या गर्भगृहाचे राजमाता अहिल्याबाई होळकर (rajmata ahilyadevi holkar) यांनी पुनर्निर्माण केले व मूर्तीची शास्त्रोक्त प्राण-प्रतिष्ठा देखील करण्यात आली. या संबंधीचे भरभक्कम पुरावे आजही होळकर घराण्याकडे उपलब्ध आहेत.

https://www.jagran.com/news/national-aurangzeb-did-the-demolition-of-kashi-vishwanath-temple-rani-ahilya-bai-got-it-rebuilt-know-the-full-story-jagran-special-22290863.html

३) इस्लामी विचारधारे नुसार एखाद्या मशिदीचे नाव ज्ञानवापी असू शकते का ?

४) ज्ञानवापी मशिदीच्या समोर असलेला नंदी काय निर्देशित करतो ? हा नंदी मशिदी समोर तोंड करून बसला आहे,जगातल्या कोणत्याही शिव मंदिरात नंदीच्या तोंडासमोर शिवलिंग असते याचा अर्थ स्पष्ट होतो की, मशिदीच्या जागी शिवलिंगच असले पाहिजे.

५) ASI च्या सर्वेक्षणाआधी सत्र न्यायालयाने कथित ज्ञानवापी मशिदीला प्रदक्षिणा घालावी मशिदीचा मागचा संपूर्ण भाग मूळ मंदिरच असल्याचे उघड्या डोळ्यांना दिसते.

६) कथित ज्ञानवापी मशिदीच्या आतील भिंतींवर हिंदू देव देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मूर्ती भंजक इस्लामी विचारधारेला मशिदींमध्ये काफ़िरांच्या देव देवतांना मूर्ती स्वरूपात काही स्थान मिळणे शक्य आहे का ?

७) ज्या वादग्रस्त भागाचे, अर्थात वजूखान्याचे ASI सर्वेक्षण होणार नाही त्या भागात लपवण्यासारखे काय आहे ? तर तेथे एक हुबेहूब शिवलिंगाच्या आकाराचा दगड आहे. ज्ञानवापी मशिदीच्या मुसलमान पक्षकारांचे म्हणणे आहे की, ते एक क्रूरकर्मा औरंगजेबाने बसवलेले कारंजे आहे. कारंज्यासाठी आवश्यक असलेली पाण्याची कोणतीही पाइपलाइन तेथे नाही. मग ते काय आहे ? जर ते खरेच कारंजे असेल तर होऊन जाऊ दे त्याचेही सर्वेक्षण त्याला विरोध का ?

सत्याला मरणही नसते आणि कुठल्याही टेकूची गरजही नसते आज ना उद्या कथित ज्ञानवापी मशीद ही काशी विश्वनाथ मंदिर पाडूनच बांधण्यात आली आहे हे सिद्ध होईलच खोटी आहे ती फक्त हिंदू समाजाने सुसंघटित होऊन बाबा विश्वनाथ की जय म्हणून ललकारी देण्याची..

हर हर महादेव

Back to top button