IslamNational SecurityNewsWorld

“अज्ञातांची” जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती…

shahid latif dead islamic republic of pakistan

शीर्षक वाचून आपण अचंबित झाले असाल परंतु घटना देखील तशीच घडली आहे. पंजाबमधील पठाणकोट हल्ल्याच्या सूत्रधार असलेल्या शाहिद लतीफची (shahid latif) इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानात ( islamic republic of pakistan) निर्घृण हत्या झाली आहे.लतीफ हा NIA च्या मोस्ट वॉन्टेड यादीतील दहशतवादी होता.

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार सियालकोटजवळच्या एका मशिदीत शाहीदची हत्या करण्यात आली आहे. दोन हल्लेखोर मोटारसायकलवरून आले, त्यांनी शाहीदवर गोळ्या झाडल्या आणि तिथून फरार झाले. या हत्याकांडानंतर पोलिसांनी सियालकोट भागात नाकाबंदी केली आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी as usual सर्च ऑपरेशन हाती घेतलं आहे.

पठाणकोट दहशतवादी हल्ला..

पंजाबमधील पठाणकोट (Pathankot attack) येथील वायूदलाच्या तळावर २०१६ मध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात ७ भारतीय जवान शहीद झाले होते. या हल्ल्याच्या सूत्रधाराची इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये हत्या करण्यात आली आहे. शाहिद लतीफ असं या दहशतवाद्यांच्या म्होरक्याचं नाव असून सियालकोट येथे काही अज्ञातांनी त्याची गोळ्या घालून हत्या केली आहे. या घटनेमुळे पाकिस्तानात प्रचंड खळबळ उडाली असून दहशतवाद्यांचे धाबे दणाणले आहे.

कोण आहे हा शाहिद लतीफ..

शाहीद हा जैश-ए-मोहम्मदच्या सियालकोट सेक्टरचा कमांडर होता. भारतात दहशतवादी पाठवणे, हल्ले घडवून आणणे, दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणे, हल्ल्यांची योजना आखणे, इत्यादी कामं लतीफ करत होता. पठाणकोट हल्ल्याची योजनाही त्यानेच आखली आणि त्यानेच दहशतवाद्यांना भारतात घुसवले होते.

दहशतवादी शाहीद लतीफ याला १२ नोव्हेंबर १९९४ रोजी अटक करण्यात आली होती. भारतातल्या तुरुंगात १६ वर्षे शिक्षा भोगल्यानंतर २०१० मध्ये त्याला वाघा सीमेवरून पाकिस्तानात पाठवण्यात आलं होतं. फक्त लतिफालाच नव्हेतर तब्बल २५ अतिरेक्यांना सोडून देण्यात आले का तर फक्त ‘सद्भावना’ म्हणून ! त्यानंतर सहा वर्षांनी २०१६ मध्ये त्याने जैशचे दहशतवादी भारतात पाठवून पठाणकोट येथील वायूदलाच्या तळावर हल्ला घडवून आणला. इतकेच नव्हेतर १९९९ मध्ये IC ८१४ इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण करणार्‍या आतंकवाद्यांमध्ये लतिफ देखील सामील होता.

देशाच्या शत्रूला पकडून न्यायालयात शिक्षा देणे किंवा तसे शक्य नसेल, तर तो जिथे असेल तिथे जाऊन, त्याला शिक्षा देणे, हे इस्रायलच्या ‘मोसाद’चे धोरण आता भारताच्या ‘रॉ’नेसुद्धा स्वीकारले आहे अशी खात्री आता संपूर्ण जगाला झाली आहे. अर्थात मोसाद प्रमाणेच “रॉ” देखील या हत्यांचे श्रेय आपण न घेता अज्ञात हल्लेखोरांना देत असते.

गेल्या वर्षभरात इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानात जवळपास १४ आतंकवाद्यांची हत्या झाली आहे ज्यांचा संबंध भारताशी होता. इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानने नेहमीप्रमाणे या हत्यांचे खापर R&AW (Research and Analysis Wing) वर फोडले आहे.

दहशतवादाच्या बाबतीत ‘zero tolerance policy’ भारताने अधिकृतपणे स्वीकारलेली आहे. गेल्या वर्षी २०२२ मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये १७२ दहशतवादी सुमारे ९० लष्करी ऑपरेशनमध्ये ठार केले गेले आहेत. यातील ४२ जण हे प्रामुख्याने इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानी दहशतवादी आहेत. भारताने २०११ मध्ये ५० ‘मोस्ट वाँटेड’ जणांची यादी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला दिलेली आहे. यांना भारताकडे सुपुर्द करावे, अशी मागणी भारताची होती. पण,इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानने उलटे भारतावरच दहशतवादाचे आरोप केले.

(संदर्भ दी गार्डीयन- दि. २२ सप्टेंबर २०२३ Very messy- India-Canada row over Sikh killing causes diplomatic shock waves)

१) इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला दिलेल्या भारताच्या ‘मोस्ट वाँटेड’ यादीत खलिस्तान कमांडो फोर्सचा प्रमुख परमीत सिंग पंजवार हे एक नाव होते. पुढे २०२३ च्या मेमध्ये परमीत सिंग पंजवार लाहोरच्या जोहार टाऊन येथे गोळ्या घालून ठार केला गेला. पंजवारला दि. ६ मे ला सकाळी तो फिरायला गेला असताना त्याची हत्या झाली.

२) ‘हिजबुल मुजाहिद्दीन’चा (hizbul mujahideen) कमांडर बशीर अहमद पीर याची रावळपिंडी येथे दुकानाबाहेर हत्या झाली.

३) भारताच्या ‘मोस्ट वाँटेड’ यादीतील एझाज अहमद अहनगर हा इस्लामिक स्टेट हिंद /खोरासनचा काश्मीरमध्ये काम करणारा दहशतवादी भारताच्या यादीत होता. तो दि. १४ फेब्रुवारीला अफगाणिस्तानच्या काबुल येथे तालिबानकडून मारला गेला.

४) सईद खालिद रझा हा जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय असणारा अल बदरचा माजी नेता होता. त्याची कराचीत त्याच्या घराबाहेर दि. २६ फेब्रुवारीला हत्या झाली.

५) सईद नूर शालोबर हा दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये अनेक तरुणांना संघटनेत भरती करण्याचे काम करत होता. याची खेबरख्तुनख्वा भागात दि. ३ मार्चला हत्या झाली.

६) ‘इंडियन एअर लाईन्स आय-सी-८१४ च्या अपहरणात सहभागी असणारा मिस्तरी झाहूर इब्राहिम याला दि. १ मार्च २०२२ ला हत्या झाली.

(Khalistan leaders shot dead- Canada blames India, Pakistan says “regular killing- The Mint -21 sep 2023)

चांद्रयान-३ (chandrayaan-3) च्या यशस्वी मोहिमेनंतर आजचा स्वतंत्र भारत जगाच्या पटलावर महासत्ता म्हणून उदयास येत असल्याचे पाश्चिमात्य देशांनीही मान्य केले आहे. संपूर्ण विश्वाला आता कळून चुकले की, भारत आता कोणताही दहशतवाद खपवून घेणार नाही. दुसरीकडे विदेशामध्ये बसून आपण भारतविरोधी कारवाया करू. त्याला भारी जनसमर्थन लाभेल, तसेच त्याविरोधात भारताकडून जाब विचारला जाणार नाही, या भ्रमात असलेल्या दहशतवाद्यांना चांगलीच चपराक बसली आहे.

शेवटी इतकंच म्हणू इच्छितो की,

नीति सही, रीती नई,

गति सही, राह नई,

चुनो चुनौती, सीना तान,

जग में बढ़ाओ, राष्ट्र का नाम।

ये नवयुग है, ये नवभारत है।

“खुद लिखेंगे अपनी तकदीर,

हम बदल रहे हैं राष्ट्र की तस्वीर,

हम निकल पड़े हैं प्रण लिये ,

ये नवयुग है, ये नवभारत है ।

अपना तनमन अर्पण करके,

ज़िद है नया सूर्य उगाना है,

अम्बर से ऊंचा जाना है,

एक नया भारत बनाना है।।

Back to top button