HinduismNews

IIT पवईबाहेर विवेक विचार मंचचे तीव्र आंदोलन…

vivek vichar manch

मुंबई आयआयटीत हमासला पाठिंबा देणारं व्याख्यान आयोजित करण्यात आल्यानं वादाची ठिणगी पडली आहे. विवेक विचार मंच या संघटनेनं या विरोधात आज जोरदार निदर्शनं केली.

आयआयटी, मुंबई (IIT Mumbai) येथे झालेल्या कार्यक्रमात आतंकवादी झकारिया झुबेदी व दहशतवादी घासान कानिफणीच्या अतिरेकी हल्ल्यांचे व हिंसेचे समर्थन झाले. दहशतवाद्यांच्या क्रौर्याचे समर्थन केल्याच्या विरोधात आयआयटी मुंबई च्या मेन गेट वर मानवी हक्क कार्यकर्ते ,देशप्रेमी नागरिक व आयआयटी मुंबई मधील आजी-माजी विद्यार्थी यांच्या उपस्थिती मध्ये निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी पोलिस प्रशासनाला विवेक विचार मंच खालील मागण्या करत आल्या.

1.प्रा शर्मिष्ठा साहा HSS विभाग आयआयटी मुंबई यांना आयआयटी मुंबई प्रशासनाने तातडीने पदावरून काढून टाकावे.

2.सुधन्वा देशपांडे जन नाट्य मंच यांच्या भूमिके वरून त्यांना पोलिस प्रशासनाने त्यांची सखोल चौकशी करून यामध्ये दहशतवादी संघटनेचे व त्यांच्या अतिरेक्यांचे आयआयटी मुंबई सारख्या संस्थेच्या व्यासपीठावर गुणगान करून विद्यार्थ्यांना हिसंक दहशतवादी संघटने मध्ये भरती करण्याचा हेतू तर नाही ना? हे पोलिस प्रशासनाने सुधन्वा देशपांडे यांच्या कारवाई करून तातडीने ताब्यात घेऊन सखोल चौकशी करून सत्यता समोर आणावी.

3.पोलिस प्रशासनाने प्रा शर्मिष्ठा साहा व सुधन्वा देशपांडे जन नाट्य मंच दिल्ली यांचे फोन रेकॉर्डिंग तपासावी,त्यांचा ईमेल संवाद तपासावे म्हणजे हा कार्यक्रम घेण्या मागचा हेतू यातून पुढे येईल.

4.आयआयटी मुंबईमध्ये दहशतवाद्यांचे उदात्तीकरण करणारे कार्यक्रम घेणे व त्या कार्यक्रमात त्या वक्त्यांच्या दहशतवादी समर्थन असलेल्या भूमिकेला विरोध न करणे यासाठी पोलिस प्रशासनाने प्रा शर्मिष्ठा साहा यांच्यावर पण कायदेशीर कारवाई करावी.

Back to top button