ChristianityNews

गोवा मुक्ती दिन.. भाग 4

goa liberation day

( गोवा मुक्तीचा इतिहास सांगणारी १० भागांची विशेष मालिका.. )

छत्रपती आणि गोवा..

शिवनेरीवर एक तेजस्वी, महापराक्रमी शक्ती १९ फेब्रुवारी १६३० ला उदयाला आली होती. राजे शिवाजी (chatrapati shivaji maharaj) स्वराज्य आणि सुराज्याची स्थापना करून त्याच्या मजबुतीचं काम करत होते. या द्रष्ट्या महापुरुषाने तेव्हाच्या कोणत्याही भारतीय शासकाने फारशा न केलेल्या अनेक गोष्टी केल्या. त्यातली एक म्हणजे “आरमाराची स्थापना.”

“मायनाक भंडारी” उर्फ मायाजी पाटकर हा पहिला सरखेल म्हणजे नौदल प्रमुख होता.

आरमाराची पोर्तुगीजांनाही एवढी दहशत होती की, त्यांनी राजांच्या नौकांना आपल्या बंदरात येऊ द्यायला नकार दिला होता! संपूर्ण कोकण किनाऱ्या वर महाराजांनी अनेक जलदुर्ग उभारले. पोर्तुगीजांना धडकी भरवणारा सिंधुदुर्ग इ.स. १६६४ मध्ये अस्तित्वात आला. सन १६६५ मध्ये स्वतः जहाजावर स्वार होत मालवण हून कर्नाटकातील बसरुर वर नौदल मोहीम यशस्वी करत पोर्तुगीजांच्या समुद्र सतेची हुकमशाही मोडीत काढली.

chhatrapati shivaji maharaj..

इ.स. १६६६च्या अत्यंत थरारक अशा आग्र्याहून सुटकेनंतर राजांनी अजिबात उसंत न घेता कोकणातून गोव्यावर स्वारी केली. पोर्तुगिजाना दहशत बसली. इ.स. १६६७ साली पोर्तुगीज गव्हर्नर कोंद दीड सांव्हॅतसेती याने दोन महिन्याच्या आत बारदेश मध्ये शिल्लक राहिलेल्या हिंदूंना बारदेश सोडून जाण्याचे किंवा धर्मातर करण्याचा हुकूम काढला होता तसेच या काळात शेजारील शिवाजी महाराजांच्या राज्यातील कुडाळ, पेडणे, डिचोली येथील बंडखोर वतनदार पोर्तुगीजांच्या आश्रयाला बारदेश मध्ये राहत होते.

पोर्तुगीजांचा हिंदूंवरील हुकूम व बंडखोर वतनदार यांना जा विचारण्यासाठी सन 19 नोव्हेंबर 1667 रोजी शिवाजी महाराजांनी बारदेश वर पोर्तुगीजांवर स्वारी केली पोर्तुगीजांना धर्म व राजकारण यावर पोर्तुगीजांवर आक्रमण करत विचारणारा हा पहिला राजा होय बारदेशस्वारीच्या दरम्यान पोर्तुगीजांचे सैन्य कोलवाळ किल्ल्यातून पळून गेले. परंतु पोर्तुगीजांचे धर्मनिष्ठ सैनिक पादरी लढण्यास उभे राहिले असता शिवाजी महाराजांच्या सैन्यांनी चार पादऱ्यांस कोलवाळ येथे यमसदनी पाठविले पोर्तुगीजांच्या आशियातील इतिहासात असे भारतीय राजाने पहिल्यांदाच कडक जाब विचारल्याची नोंद मिळते

बार्देश स्वारी नंतर लगेच शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना गोव्यातून कायमचे हाकलून लावण्यासाठी गुप्तचर सैन्याची मोहीम सुरू केली जुन्या पोर्तुगीज राजधानी शिवाजी महाराजांचे अनेक सैनिक गुप्तवेशात वावरू लागले पुढील वर्षी सन १६६८ नोव्हेंबर मध्ये शिवाजी महाराज गोव्याकडे येण्यास निघाले वाटेत वेंगुर्ले येथे असताना शिवाजी महाराजांना बातमी मिळाली की आपले गुप्तचर सैनिक पकडले गेले आहेत गुप्तचर मोहीम अपयशी झाल्यावर निराश न होता शिवाजी महाराज सरळ डिचोली येथे आले आणि त्यांनी 13 नोव्हेंबर १६६८ रोजी गोव्याचे राजदैवत कदंब राजांचे कुलदैवत श्री सप्तकोटेश्वर दैवताचे पुनर्स्थापना करून मंदिर बांधण्याचा शुभारंभ केला.

chhatrapati sambhaji maharaj

पोर्तुगीजाना महाराजांची एवढी भीती होती की त्यानी महाराजांच्या ताब्यात असलेल्या मुलखावर कधीही सरळ हल्ला चढवला नाही. कोकण आणि गोव्यातल्या नद्या, जंगलं, दर्‍या, डोंगरांनी भरलेल्या दुर्गम प्रदेशात महाराजांचे गनिमी काव्याचे तंत्र अतिशय यशस्वी ठरले. त्याना थोडा अवधी मिळाला असता तर त्यांनी पोर्तुगीजांना गोव्यातून उखडून काढलं असतं हे निश्चित. पोर्तुगीज दप्तरात, महाराजांनी पोर्तुगीजांना जरब बसवण्यासाठी लिहिलेली तसेच पोर्तुगीज महाराजांना किती घाबरत असत हे दाखवणारी पत्रे उपलब्ध आहेत.

छत्रपति संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना संपविण्याचा निर्धार केला.गोव्याच्या भूमीची संभाजी राजांना पूर्ण माहिती झाली होती. यामुळेच गोव्यात राजांचा सर्वत्र सहज संचार होत असे. इ.स. १६८३ मधे राजांनी चौल पोर्तुगीजांकडून घेतले. गोव्यातलं महाराजांचे महत्त्वाचं कार्य म्हणजे त्यानी पोर्तुगीजांना पायबंद घातला आणि धर्मांतरित झालेल्यांना परत शुद्धिकृत करून हिंदू करून घेण्याचं शिवाजी महाराजांचं कार्य त्यांनी पुढे जोमाने चालू ठेवलं.

क्रमशः-

Back to top button