ChristianityNews

गोवा मुक्ती दिन.. भाग 5

goa liberation day

( गोवा मुक्तीचा इतिहास सांगणारी १० भागांची विशेष मालिका.. )

मोगल बादशहा औरंगजेब शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य संपविण्याचा उद्देशाने स्वतः सैन्य घेऊन दक्षिणेमध्ये उतरला पोर्तुगीजांनी ही संधी साधून मोगल बादशहाकडे सहकारून संपूर्ण कोकण जिंकून मोगल व पोर्तुगीजांमध्ये वाटून घेण्याची योजना आखली त्याच दरम्यान औरंगजेबाचा लहान मुलगा अकबर याने बापाविरुद्ध बंडखोरी करत संभाजी महाराजांचा आश्रय घेतला संभाजी महाराजांनी त्यास आपल्या राज्यात डिचोली येथे आश्रयास ठेवले मोगल सैन्य अकबरास पकडण्यासाठी डिचोली येथे येणार आणि तेथे मोगल व संभाजी महाराज महाराज यांचे जोरदार लढाई होणार या संधीचा फायदा घेत पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांच्या फोंडा किल्ल्यावर आक्रमण केले.

गोव्यावर मोगल व संभाजी महाराज असे दुहेरी आक्रमणाचे संकट उभे राहिले असता संभाजी महाराजांनी मोठ्या धाडसाने विलक्षण पराक्रमाने फॉड्यातून पोर्तुगीजांना मार देत उसकावून लावले दुर्भाट येथे पोर्तुगीज गव्हर्नर स्वतः जखमी होऊन पळून ओल्ड गोव्यात लपून राहिला पुढे 24 नोव्हेंबर रोजी संभाजी महाराजांनी गोव्या शेजारच्या जुवे बेटावर आक्रमण केले असता पोर्तुगीज राजधानीत भयंकर आहाहाकार उडाला जुवे येथील लढाईतही पोर्तुगीज गव्हर्नर काँद दि आल्वहर मार खाऊन पळाला पोर्तुगीज आरमाराचा वेढा पडून गोवा बेटात अडकून राहण्याच्या काळजीने संभाजी महाराजांनी जुवेबेट सोडून दिले आणि साष्ट व बार्देश या पोर्तुगीजांच्या प्रदेशावर हल्ले करत पोर्तुगीजांची भंयकर वसुली करत पोर्तुगीज सत्तेचा माज उत्तरविला.

Portuguese of Goa joined hands with Aurangzeb against Sambhaji Maharaj...

पोर्तुगीज गव्हर्नर याने सेंट झेवियरचे शव बाहेर काढत राजदंड शवपेटीवर ठेवत पोर्तुगीज राज्य वाचविण्याचे प्रार्थना करत तसेच संभाजी महाराजांच्या आक्रमण यशस्वी झाले तर पोर्तुगाल ला गाशा गुंडाळत जाण्याची ही तयारी करत पोर्तुगीजांनी आपली बायका मुले व संपत्ती मुरगावच्या बंदरात नेऊन ठेवले होते. या काळात मोगल सैन्य एक लाख सैन्य व तेवढेच हत्ती घोडे उंट अशा तयारीनिशी मोगल शहजादा शहा आलम हा डिचोली येथे आला असता त्याची रसद पूर्णपणे लुटून त्याच्या सैन्याला उपासमारीने व रोगराईने मरण्यास संभाजी महाराजांनी भाग पाडले अशा रीतीने गोव्यावरील पोर्तुगीजांचे व मोगलांचे संकटापासून संभाजी महाराजांनी वाचविले..

सतत ४ वर्षे मुघलाना हुलकावण्या देत जेरीला आणणारा हा शूर छत्रपती १ फेब्रुवारी १६८९ ला कपटाने कैद झाला. त्यांच्या सख्या मेव्हण्याने, गणोजी शिर्क्याने विश्वासघात केला आणि नंतर तब्बल ४० दिवस हालहाल करून शेवटी औरंगजेबाने ११ मार्च १६८९ ला राजांची नृशंस हत्या केली.

सन१६९५ मध्ये छत्रपती राजाराम महाराज यांनी उत्तर गोव्यातील पेडणे-डीचोली सत्तरी सह कुडाळ हा भाग सावंत वाडकर राजांना जहागीर म्हणून दिला तसेच फॉडा सांगे केपे काणकोण सह कारवार अंकोला सौर्दै असा प्रदेश सौंदेकर राजास जहागीर म्हणून छत्रपती राजाराम महाराजांनी दिला या प्रदेशावर छत्रपतींचे जहागीरदार म्हणून सावंतवाडी कर व सौंदेकरांचा राज्य सुरु झाले.

Mahratta attack of the Portuguese-controlled portions of Goa..

बाजीराव आणि चिमाजी, पोर्तुगीजांविरुद्ध वसई आणि गोव्याच्या दोन्ही आघाड्यांवर लढत होते.मराठ्यांनी फोंडा, सुपे आणि सांगे तालुके ताब्यात घेतले. संभाजी राजांनंतर परत एकदा पोर्तुगीजांच्या ताब्यात फक्त तिसवाडी राहिली. आता पोर्तुगीजांनी बाजीरावाकडे तहाची याचना केली. बाजीरावाने इन्क्विझिशन बंद करा, हिंदूंचा छळ बंद करा या आणि आणखी मागण्या पोर्तुगीजांपुढे ठेवल्या. इ.स. १७४० मध्ये चौल आणि कोर्लाईचा किल्ला देऊन पोर्तुगीजानी गोव्यात आपलं अस्तित्त्व कसंबसं राखलं.

२८ जून इ.स. १७५५ साली पोर्तुगीज व्हॉईसरॉय कॉण्डे डी अल्वाने मराठ्यांच्या ताब्यातील फॉडा येथील मर्दनगडावर हल्ला केला त्यात पोर्तुगीज गव्हर्नर कॉद दि आल्व्ह मारला गेला. पानिपत येथील मराठा सत्तेच्या पराभवानंतर झालेल्या परिस्थितीचा फायदा घेत पोर्तुगीजांनी सन १७६४ मध्ये मर्दनगड जिंकत संदिकरांचे राज्य फोंडा सह सांगे केपे काणकोण जिंकून घेतले पुढे सन १७८५ मध्ये पेडणे-डीचोली सतरी हे सावंतवाडकरां कडून जिंकून घेतले.

इ.स. १७५६ साली पोर्तुगीज व्हॉईसरॉय कॉण्डे डी अल्वाने मराठ्यांच्या ताब्यातील मर्दनगडावर हल्ला केला. या लढाईत स्वतः व्हॉईसरॉय मरण पावला! गोंधळाचा फायदा घेत सावंतांनी पेडणे, सांगे आणि मणेरी तालुके घेतले. २४ डिसेंबर १७६१ ला तह झाला आणि पोर्तुगीजांनी सावंतांच्या ताब्यात असलेल्या सर्व प्रदेशावर सावंतांचा हक्क मान्य केला.

Maratha empire map..

१८१८ साली मराठेशाहीचा लखलखता सूर्य अस्त झाला. जोपर्यंत मराठे सकल हिंदुस्तानात भगवा नाचवत होते, तोपर्यंत गोव्यातील पोर्तुंगीज पावसात भिजलेल्या कुत्र्याप्रमाणे निपचित पडून होते, त्यांना मराठ्यांची जबरदस्त भीती वाटेत होती. परंतु इंग्रजांनी शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकवला तसा गोव्यातील हिंदूंचा अतोनात छळ सुरु झाला. पोर्तुगीजांना रोखणारे कोणी उरले नव्हते….

मराठी सत्तेच्या लयानंतर पोर्तुगीज सत्तेला पहिला प्रथम गोव्यातून जबरदस्त विरोध जर कुणी केला असेल तर तो सत्तरीच्या राणेंनी. सत्तरी गोव्याच्या ईशान्येला आहे. लहान मोठ्या पर्वतांचा हा प्रदेश. डोंगर दर्‍यांत राहणारे लोक वाघासारखे शूर व सशासारखे चपळ आहेत. इमान हा त्यांचा स्थायीभाव. इमानापुढे इनाम कस्पटासमान मानणे ही यांची वृत्ती. विश्वासाला पात्र असे हे लोक दिलेल्या वचनाला जागतात, पण कोणी विश्वासघात केला तर हे लोक प्रक्षुब्ध होतात. मोडेन पण वाकणार नाहीत वृत्तीचे.

पोर्तुगीजांच्या अन्यायाविरुद्ध यांनी कितीतरी वेळा बंडाचे निशाण उभारले. पोर्तुगीज सरकारने त्यांना बलप्रयोगाने झोडपले, कापून काढले. पण अन्यायाचा प्रतिकार करण्याचे सतीचे वाण घेतलेल्या सत्तरकर गोमंतकीयांनी ते व्रत निष्ठेने प्रत्येक पिढीत पाळले.

क्रमशः

Back to top button