IslamNational SecurityNews

‘जय भिम’, ‘जय मिम’चा खोटा नारा थांबवा !

Stop the false slogan of 'Jai Bhim', 'Jai Mim'!

भीमा कोरेगावचा (bhima koregaon) शूर लढा आठवणारा माझा समाज न्यायाच्या लढ्यात साथ देईल का ? : भिमकन्या शुभांगी जाधव

मालाड मालवणीतील अवैध भोंग्याविरुद्ध लढा दिला, म्हणून मला समाजकंटकांकडून विविध मार्गांनी त्रास दिला जात आहे, अशी उद्विग्नता मालाड मालवणीच्या भिमकन्या शुभांगी जाधव यांनी व्यक्त केली आहे. तसेच भीमा-कोरेगावच्या शूर आठवणीमध्ये एकवटणारा समाज माझ्या न्यायाच्या लढ्यासाठी मला साथ देईल का? असा सवालही त्यांनी समाजबांधवांना केला आहे. तसेच ‘जय भिम’, ‘जय मिम’चा (‘Jai Bhim’, ‘Jai Mim’) खोटा नारा थांबवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

शुभांगी जाधव म्हणाल्या की, “२०१८ ते २०२१ सालादरम्यान मालाड मालवणी येथील गायकवाड नगरातील मशिदीवरील अवैध भोंग्याविरोधात आपण आणि काही महिलांनी आवाज उठवला होता. त्यावेळी आमदार तथा मुंबई उपनगरचे विद्यमान – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मालवणीमधील – हिंदूंच्या समस्यांबद्दल अभ्यास समिती स्थापन करत,गायकवाड नगरातील या महिलांच्या लढ्याला सार्थ सहकार्य केले होते. मंत्री मंगलप्रभात लोढा आणि सकल सज्जनशक्ती आमच्या पाठीशी उभी राहिली. त्यानंतर कुणीही समोर येऊन आम्हाला त्रास दिला नाही. मात्र, त्यानंतर ज्या घटना घडत आहेत, त्याचे परिणाम आमच्या आयुष्यावर आणि कुटुंबावर इतकेच काय परिचितांवरही होत आहेत.”

शुभांगी जाधव यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना आपबिती सांगितली. त्यांच्या घराला बेल लावली होती. मात्र, दिवसरात्र कुणीतरी सारखी बेल – वाजवायचे. हा त्रास नको म्हणून जाधव कुटुंबीयांनी दरवाजाची बेल बंद केली. त्या सांगतात की, “त्यांना रिक्षावाले रिक्षात बसवत नाहीत. कारण, मालवणी – मध्ये बहुसंख्य रिक्षावालेही मुस्लीमच आहेत. कौमच्या विरोधात आहे, असे त्यांना वाटते. कौमला विरोध करते, ती हीच शुभांगी म्हणत, घराजवळ घोळका करत उभे राहणे आणि संशयास्पद हालचाली करणे – अशी कृत्येही काही टोळके करत असतात,” असे जाधव यांनी सांगितले.

धर्माधांच्या बहिष्कारामुळे व्यवसाय बंद

-शुभांगी जाधव यांना होणारा त्रास पुढे बहिष्कार टाकण्याच्या टप्यावर पोहोचला. शुभांगी यांचे परिसरात छोटेसे स्नॅक्स सेंटर होते. त्यावरच त्यांचे अर्थार्जन होते. मात्र, त्यांचा स्नॅक्सचा स्टॉलही बंद पाडला गेला. त्याला कारण ठरले, मुस्लीमबहुल परिसरातील काही लोकांनी स्नॅक्स सेंटरवर टाकलेला बहिष्कार. त्यानंतर काही दिवसांनी तो स्टॉल सामानासकट महापालिकेने उचलूनही नेला.

-शुभांगी जाधव यांनी पुन्हा स्नॅक्सचे दुकान टाकण्यासाठी, मालवणी परिसरात दुकान भाड्याने घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना कोणी दुकानही भाड्याने दिले नाही. दोन वेळा असे घडले की, दुकानमालकांशी दुकानासंदर्भात बोलणी होऊन, दुकानाचे डिपॉझिट भरण्याची प्रक्रिया सुरू झाली.

-मात्र, दुसऱ्या दिवशी दुकानदारांनी शुभांगीनी भरलेले पैसे दुसऱ्याच्या हातून त्यांना घरपोच केले. तसेच तुला दुकान देऊ शकत नाही, असा निरोप पाठवला. असे का, असे विचारल्यावर त्यांनी शुभांगीला भेटण्यास तसेच बोलण्यासही नकार दिला. शुभांगीने अवैध भोंग्यांविरोधात लढा दिला, म्हणून राग येऊन आणि इतर लोकांनी टाकलेल्या दबावामुळे दुकानदार दुकान देण्यास नकार देत असावा, असे स्थानिकांचे मत आहे.

धर्माधांकडून मैत्रिणीलाही त्रास

शुभांगीची मैत्रिण विरांगणा साळवे हीदेखील बौद्ध समाजाचीच कार्यकर्ता आहे. ती शुभांगीची मैत्रिण आहे, असे कळताच, तिलाही तिच्या परिसरातील धर्मांधांनी त्रास द्यायला सुरुवात केली आहे. या सगळ्या प्रकरणाने शुभांगी व्यथित झाल्या आहेत, मी माझ्या हक्कासाठी आवाज उठवला, तर काही धर्मांध लोक एकवटून सगळीकडून माझी कोंडी करत आहेत. समाजाची मुलगी म्हणून समाज मला साथ देईल का? असा सवाल त्यांनी केला आहे.

“आम्ही बौद्ध आहोत आणि मुस्लीमबहुल मालवणीमध्ये अल्पसंख्याक या पावन देशात आम्हाला मालवणीमध्ये काही धर्मांध मुस्लिमांकडून दुय्यम वागणूक दिली जाते. भीमा कोरेगावचा शूर लढा आठवत, समाज दि. १ जानेवारीला एकवटेल. शूरतेला वंदन करणारा समाज आमच्या न्याय हक्काच्या लढ्यात आमच्या सोबत आहे का? आणि कृपया ‘जय भिम’, ‘जय मिम’चा खोटा नारा थांबवा !”-शुभांगी जाधव, पीडित

साभार :- ‘मुंबई तरुण भारत’

Back to top button