IslamNews

पावनगडावरील लॅण्डजिहाद नेस्तनाबूत…

unauthorised madrasa at pavangad finally demolished by administration

हर शिवभक्त की सरकार से मांग ।
Land jihad से मुक्त हो हमारे किले महान ।।

पन्हाळा गडाला लागूनच असलेल्या पावनगडावरील अनधिकृत मदरसा जमीनदोस्त, वर्ष १९७९ मध्ये बांधला होता अनधिकृत मदरसा !

कोल्हापुरातील (Kolahpr) पन्हाळा गडाला (Panhala) लागूनच असलेल्या पावनगडावरील (PavanGad) अनधिकृत अतिक्रमण प्रशासनानं हटवलं आहे. किल्ले पावनगडावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बजरंगदलाच्या आक्रमकतेनंतर प्रशासनाने ही कारवाई केली आहे.

छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला “पावनगड”..

पन्हाळ गडाच्याशेजारी ४ किलोमीटर पावनगड आहे. हा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता. तो पन्हाळा गडाचा संरक्षक गड मानला जातो. शत्रूला चकवा देण्यासाठी हा गड बांधण्यात आला आहे. अनेक इतिहासाचे दाखले देखील या गडावर मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडाला विशेष महत्त्व आहे.

पावनगडावर सध्या संपूर्ण मुस्लिम वस्ती आहे याचा गैरफायदा घेत १९७९ मध्ये सय्यद गुलाब मुजावर या धर्मांध मुसलमान जिहादीने २ गुंठे क्षेत्रामध्ये मदरसा बांधला होता. हा मदरसा सरकारी मुलकोपड महसूल खात्याच्या मालकी जमिनीवर होता.

पावनगडावर गट नंबर १२८ चे क्षेत्र २.८३ हे.आर. सरकारी मुलकीपड जमिनीवर अनधिकृत मदरशाचे बांधकाम असल्याची तक्रार बजरंगदलाने जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन हा अनधिकृत मदरसा पाडण्याबाबत मोर्चा देखील काढला होता. त्यानंतर तहसीलदारांनी अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटीस दिली होती. या आधी देखील या अनधिकृत मदरश्यावर कारवाई करण्यात आली होती.

सद्यस्थितीत पश्चिम बंगाल,बिहार व उत्तरप्रदेश मधील ४५ मुले वास्तव्यास होती. गुरुवारी सायंकाळी येथील सर्व मुलांना शिरोली येथील मदरसा यामध्ये नेण्यात आले. त्यानंतर पावनगडावरील अतिक्रमण कारवाई मध्यरात्री २ वाजता सुरू करण्यात आली. मध्यरात्री सुरू झालेली कारवाई तब्बल ७ तासानंतर सकाळी ९ वाजता संपली.

कमालीची गुप्तता..

अनधिकृत मदरसा पाडण्याबाबत प्रशासनाकडून कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. गुरुवारी सायंकाळी बुधवार पेठे पासून ते पावनगडापर्यंत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पन्हाळा उपविभागीय अधिकारी व तहसीलदार पोलीस अधीक्षक पोलीस उपाधीक्षक थांबून होते. सध्या गडावर १४४ कलम लागू करण्यात आले असून अतिक्रमणानंतरचे पडलेले साहित्य उचलण्याचे काम चालू आहे. तसेच गडावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

बजरंग दलाचे कोल्हापूर जिल्हा संयोजक श्री. सुरेश रोकडे म्हणाले, ‘‘या संदर्भात बजरंग दलाने २ वेळा प्रशासनाकडे तक्रारी करून पाठपुरावा केला होता. त्यानंतर प्रशासनाने ही कारवाई केली. ‘या गडावर अनधिकृत मदरसा असून त्या ठिकाणी महाराष्ट्राबाहेरील मुले बेकायदेशीर राहत आहेत. येथे ऐतिहासिक वास्तूंची तोडफोड करत काही घरे बांधण्यात आली आहेत. त्यामुळे तेथील अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे’, अशी मागणी बजरंगदलाने निवेदनाद्वारे केली होती.’’

पावनगडावरील अतिक्रमण हटवण्यात आले आहे. यासंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता ते म्हणाले, “राज्यातील ज्या ऐतिहासिक किंवा धार्मिक ठिकाणी अतिक्रमण झाले असेल त्या सर्व ठिकाणांवरील अतिक्रमण टप्याटप्याने हटवण्यात येईल.” या कारवाईसाठी गृहमंत्री व राज्य सरकारचे सकल हिंदू समाजाकडून मनःपूर्वक अभिनंदन !

गजवा-ए-हिंद या आपल्या उद्दिष्टासाठी मुस्लिम सतत कार्यरत असतात . गजवा-ए-हिंद (gajwa-a-hind) म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानला मुस्लिम बनवणे. लव्ह जिहाद सारखाच लॅण्ड जिहाद हा त्या उद्दिष्टाकडे घेऊन जाण्याचा मार्ग आहे. सर्वात मोठा लॅण्डजिहाद हा अखंड भारतचा तुकडा पाडून इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान निर्मिती हा आहे. लॅण्डजिहाद हा गझवा-ए-हिंदचाच भाग आहे हे आपण सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे.

गजवा-ए-हिंद

सरकार आपले काम करेलच पण डोळसपणे बघितल्यावर आपल्या आजूबाजूला देखील अशाप्रकारचा लॅण्डजिहाद आढळून येईल, त्याविषयी व्यक्त होणे , सकल हिंदू समाजाने एकजूटीने आवाज उठवणे काळाची गरज आहे.

हा पटलावर आलेला लॅण्डजिहादचा एक नमुना मात्र आहे. आतापर्यंत समोर आलेली आणि येत असलेली वस्तुस्थिती म्हणजे या परिसरातील हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे. हिंदू समाजाचे खच्चीकरण करणे, त्यांच्या श्रद्धास्थानांना धोका निर्माण करणे,मुद्दाम अतिक्रमण करून हिंदूंना डिवचण्याचा तसेच दहशतीचे वातावरण निर्माण करून हिंदूंना जगणे नकोसे करणे हा कुटील डाव सकल हिंदू समाजाने वेळीच ओळखायला हवा.

समस्त देशांत अश्या अतिक्रमणाच्या घटना सोशल मीडिया व विशेषत: सोशल मीडियामुळे उजेडात येत आहे. संघटित धर्मांध मुस्लिम संघटना मुद्दाम प्राचीन मंदिरांभोवती, ऐतिहासिक स्थळांभोवती, गडकिल्ले आता तर अगदी रेल्वे स्टेशन,बसस्टॅण्ड,समुद्रकिनारपट्टीच्या आजू-बाजूला अनधिकृत मजारी, दर्गे,मशिदी बांधत आहे. आज आपण या विरोधात आवाज नाही उठवला तर भविष्य काळ फार कठीण आहे हे मात्र निश्चित..

मुस्लिम कट्टरपंथीयांनां देशात अराजक माजवायचे आहे. त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची मानसिकता आहे.आपल्या संस्कृतीचे रक्षण आपण नाही करणार तर मग कोण करेल ?

आमचा हिंदू बांधव का कमालीचा (अति) सहिष्णू आहे म्हणूनच या मुस्लिम धर्मांधांची हिम्मत बळावते. आमच्या ऐतिहासिक स्थळांभोवती , गडकिल्ले आणि मंदिरांच्या आजू-बाजूला अश्या अनेक अनधिकृत मजारी दर्गे आपल्याला दिसून येतील.गरज आहे ती फक्त डोळे उघडण्याची…

सुरुवात तर झालीच आहे… बाकी महाराजांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहेच…

अटलजींच्याच शब्दात सांगायचे झाले तर:-

यह बुझने वाली आग नहीं, रग-रग में उसे समाए हूं।
यदि कभी अचानक फूट पड़े विप्लव लेकर तो क्या विस्मय?
हिन्दू तन-मन, हिन्दू जीवन, रग-रग हिन्दू मेरा परिचय!

छत्रपती शिवाजी महाराज की जय…

जय भवानी जय शिवाजी…

Back to top button