HinduismNews

सौगंध राम की खायी थी , हमने मंदिर वही बनाया है.. भाग १२

ayodhya ram mandir inauguration ramlala pran pratishtha part 12

(रामजन्मभूमीची संघर्षगाथा उलगडणारी १८ भागांची रोमांचकारी मालिका)

“कारसेवेत” बाबरी जमीनदोस्त..

कारसेवा म्हणजे काय?

मुळात कारसेवा हा शब्द मराठी किंवा हिंदी नाही. हा शब्द मूळ संस्कृत भाषेतून आला आहे. कार हा शब्द कर म्हणजेच हात या अर्थाने आहे आणि सेवा किंवा सेवक हे शब्द त्याला जोडून आले आहेत. निस्वार्थपणे सेवा करणारा म्हणजे कारसेवक, असा त्याचा अर्थ आहे. इंग्रजीत हा शब्द Volunteer असा आहे.

कधी वापरला शब्द?

कारसेवा या शब्दाचा उल्लेख शीख धर्मगुरुंनी अनेक ग्रंथांमध्ये केला आहे. ही शीख धर्माची शिकवण असल्याचंही सांगितलं जातं. अमृतसरमधील सुवर्ण मंदिराची उभारणी कारसेवेतूनच झाली होती. राम मंदिर आंदोलनाच्या वेळी देशभरातून कारसेवकांची लाटच उसळली होती. लाखो तरुण त्यावेळी अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी त्या दिशेने निघाले होते.

रेल्वे, बस, गाड्या मिळेल त्या वाहनाने कारसेवक राम मंदिराच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी पोलिस आणि सुरक्षा दलांनी उत्तर भारताच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे अडवल्या होत्या. त्यामुळे कारसेवक रेल्वेतून उतरून अयोध्येच्या दिशेने चालत निघाले होते. बाबरी मशीद पाडण्याच्या दिवशी आणि त्यानंतरही लाखो कारसेवक अयोध्या आणि परिसरात होते.

ह्या पस्तीस वर्षात या आंदोलनाने अनेक चढउतार अनुभवले. १९४९ साली रामलल्लाच्या मंदिराला घातलेले कुलूप या आंदोलनाच्या रेट्यामुळे सरकारला १९८६ साली काढावे लागले. पण त्यानंतर मंदिराची पुनर्निर्मिती करण्याच्या मागणीला सरकार प्रतिसाद देत नसल्यामुळे पुन्हा आंदोलन सुरु करावे लागले. हे आंदोलन व्यापक करण्यासाठी अनेक नवनवीन संकल्पना वापरल्या गेल्या.

जनजागृतीसाठी ‘राम जानकी रथ यात्रा’, ‘शिलापूजन’ यासारखे अनेक नवे उपक्रम राबवले गेले. ‘कारसेवा’ हे आंदोलनाचे नवे रूप वापरले गेले. हिंदू समाज जागा होऊन एका ध्येयासाठी एकत्र येण्याची ही सगळी प्रक्रिया फार वेगळ्या स्तरावर पोहचली होती. त्या सगळ्या प्रयांचा संपूर्ण देशात खोलवर परिणाम झाला व तो कारसेवांच्या निमित्ताने पहायला मिळाला.

सर्वप्रथम १९८९ मध्ये बहुदा हेडगेवार जन्मशताब्दीनंतर लगेच श्रीराम जन्मभूमी आंदोलनासाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे जनजागरण सुरू करण्यात आलं होतं. तसंच रामजन्मभूमीसाठी प्रत्येकाकडून एक प्रतिज्ञापत्र आणि एक रुपयाही जमा करण्यात आला होता. त्यानंतर श्रीराम असं कोरलेल्या वीटा अयोध्येत पाठवण्यात आल्या होते. त्यानंतर १९९० मध्ये गुजरातमधील सोमनाथमधून अयोध्येपर्यंत लालकृष्ण आडवाणी यांनी रथयात्रा काढली.

यासाठीचा घटनाक्रम असा की १९८६ मध्ये नवव्या लोकसभेच्या निवडणुका पार पडणार होत्या. त्यातच निवडणुकांपूर्वी फैजाबाद न्यायालयानं बाबरी मशिदीसंदर्भात असलेल्या वादग्रस्त जागेला असलेलं टाळं उघडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तत्कालिन काँग्रेस सरकारनं न्यायालयाच्या निर्णयानुसार ते टाळं उघडलं. परंतु त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय रद्दहबातल ठरवला. १९८९ मध्ये लालकृष्ण आडवाणी यांनी सोमनाथमधून तब्बल १० हजार किलोमीटरची रथयात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

भाजपाचे तेव्हाचे अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी केलेल्या रामरथयात्रेने सारा देश ढवळून काढला. २५ सप्टेंबर ते २३ ऑक्टोबर १९९० या तीस दिवसांमध्ये या रथयात्रेने प्रवास करून आठ राज्ये ओलांडली होती. त्या यात्रेच्या माध्यमातून अडवाणीजींनी देशातल्या राजकीय चर्चेची सगळी परिमाणे बदलून टाकली. ‘बेगडी धर्मनिरपेक्षता’ हा मुद्दा त्यांनी चर्चेच्या केंद्रस्थानी आणून ठेवला.

काँग्रेस आणि त्यांचे डावे सहप्रवासी त्या चर्चेत पूर्ण निष्प्रभ झाले. स्वातंत्र्य मिळाल्यापासून तयार करून ठेवलेला एक अआंधळा वैचारिक पडदा त्या निमित्ताने नाहीसा झाला व हिंदू समाज आपले विचार मोकळेपणाने मांडू लागला. त्यातूनच नवे राजकीय मानस तयार झाले.

दरम्यान, ही रथयात्रा काढण्याचा निर्णय विचारपूर्वकच घेण्यात आला असल्याचं इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात लालकृष्ण आडवाणींच्या हवाल्यानं सांगण्यात आलं होतं. गुजरात, महाराष्ट्र, आध्र प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार अशा राज्यांमधून ही रथयात्रा अयोध्येला पोहोचली. परंतु बिहारमध्ये आडवाणींना अटक करण्याच आली.

अयोध्येत कारसेवेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक जण सहभागी झाले होते. प्रेमशंकर दास यांनीदेखील कारसेवा करतानाचा आपला अनुभव मांडला होता. प्रेमशंकर दास त्यावेळी २१-२२ वर्षांचे होते आणि वादग्रस्त ढाचा पाडण्यासाठीच अयोध्येत आले होते, असं त्यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटलं होतं. “कोणही कोणत्याही प्रकारचे निर्देश दिले नव्हते किंवा कोणी काय करायचं हेदेखील आम्हाला माहित नव्हतं.माहित होती ती फक्त रामजन्मभूमी.. तो वादग्रस्त ढांचा पाडण्याचं श्रेय केवळ कारसेवकांनाच आहे,”

दरम्यान, त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या राजेश प्रभू-साळगांवकर यांनीदेखील आपला अनुभव नमूद करून ठेवला आहे. “६ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता आम्ही श्रीराम जन्मभूमी जवळ पोहोचलो. बाबरी शेजारी एका इमारतीच्या गच्चीवर मंच बांधला होता. त्यावेळी जवळपास ५-६ लाख जण श्रीराम जन्मभूमी परिसरात होते. बाबरीचा ढांचा दिसेल अशा उंचवट्यावर आम्ही बसलो होतो. मंचावरून नेत्यांची आणि संतांची भाषणे सुरु झाली. तसंच या ठिकाणी आपली जागा न सोडण्याचे सक्त आदेश आम्हाला देण्यात आले होते. अडवणींचे, उमा भारतींचे, दलमियाजींचे आणि सिंघल यांचे याठिकाणी भाषण झाल्यानंतर रामनामाचा मंचावरून जप सुरू झाला,”

“त्यानंतरच अचानक समोरून एक गलका ऐकू येऊ लागला. काही जण बाबरीच्या ढाचाच्या घुमटावर चढून भगवा फडकवताना आम्हाला दिसले. परंतु त्यानंतर त्या ठिकाणी असलेले काही जण घोषणा देत पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागले. प्रत्येक गटनेत्यांने आपापल्या गटाला कसेबसे आवरून धरले होते. कारण दिलेल्या सूचनांचे पालन करणे हीच संघाची शिस्त आहे, असे ते प्रत्येकला समजावत होते. मात्र तरी काही जण निसटून पुढे गेले. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या एका व्यक्तीनं घुमटावर घाव घातला. त्यानंतर काही पुजारी आणि साधू संत रामलल्लाच्या मूर्ती घेऊन बाहेर येताना दिसले. राम धून बदलून लोक “एक धक्का और दो” च्या घोषणा देऊ लागले होते. मूर्ती हलवून झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांच्या कालावधीतच पहिला घुमट कोसळला.

१९९० व ९२ साली झालेल्या कारसेवांमध्ये देशाच्या प्रत्येक जिल्ह्यातून आंदोलक सहभागी झाले होते. त्या दोन्ही वेळेला अयोध्येत एकत्र झालेल्या कारसेवकांची संख्या कैक लाखांच्या पुढे गेली होती. पण उत्तर प्रदेश व केंद्रातील तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांनी आंदोलन करणाऱ्या जनतेला शत्रूसारखे वागवले.

पहिल्या कारसेवेच्या वेळी उ.प्र.चा मुख्यमंत्री असलेल्या मुलायमसिंग यादव यांनी शेकडो कारसेवकांची कत्तल केली, विश्वासघातकी व आडमुठे धोरण सत्ताधाऱ्यांनी स्वीकारल्यामुळे दुसऱ्या कारसेवेत ती जीर्ण वास्तू जमीनदोस्त झाली.

क्रमशः

Back to top button