HinduismNews

सौगंध राम की खायी थी , हमने मंदिर वही बनाया है.. भाग १४

ayodhya ram temple inauguration

(रामजन्मभूमीची संघर्षगाथा उलगडणारी १८ भागांची रोमांचकारी मालिका)

९२ च्या पिढीने केलेली वैचारिक क्रांती…

१९९२च्या पिढीने डोक्याला कफन बांधून अयोध्येत एक पराक्रम करून दाखविला. इतिहासाची पुनरावृत्ती करता येत नाही, करण्याची गरजही नाही. काळ बदलतो, नवीन परिस्थिती निर्माण होते, नवीन आव्हाने येतात. ती समजून नव्या पिढीने आपल्या सत्व रक्षणासाठी आणि आपल्या अस्मिता जागवण्यासाठी कार्य हाती घ्यावे लागते.

१९९२च्या पिढीने हिंदू समाजाला अत्यंत गर्व वाटेल, अभिमान वाटेल आणि त्याची छाती फुलून येईल, अशी एक कृती केली. ही कृती म्हणजे, प्रभू रामचंद्रांच्या जन्मस्थानावर क्रूर, आक्रमक, इस्लामी पिसाट, बाबराने रामाचे भव्य मंदिर पाडून मशिदीचे तीन घुमट उभे केले. हे तीन घुमट म्हणजे, हिंदू समाजाच्या डोक्यावर ठेवलेल्या तीन जळत्या भट्ट्या होत्या. घोर राष्ट्रीय अपमानाच्या त्या निशाण्या होत्या…

काळ प्रतिकूल असताना या निशाण्या डोक्यावर घेत हिंदू समाजाला जगावे लागते. त्या जमीनदोस्त करण्याचा चारशे वर्ष त्यांनी प्रयत्न केला, अनेक लढे दिले, पण त्यात यश मिळाले नाही. सर्व सत्ता परमेश्वराची, त्याच्या इच्छेनेच जग चालतं, राम हा त्याचा अवतार अशी आपली श्रद्धा असते. रामाचीच इच्छा असेल की, आपल्या जन्मस्थानावर बाबराचे तीन घुमट राहावेत, त्याचीच इच्छा असेल की, हे घुमट हिंदू समाजाला त्याच्या अपमानाची आठवण करून देत राहावेत आणि त्याचीच इच्छा असेल की, हिंदू समाजाने विचार करावा की, मूठभर सैन्य घेऊन आलेला बाबर दिल्लीचा शहेनशहा का झाला? आमचे काय चुकले? आमची समाजरचना का बिघडली? आम्ही धर्मालाच अधर्म का मानायला लागलो? जाती-पाती-अस्पृश्यता आम्ही का निर्माण केली? लहान-सहान स्वार्थासाठी आपापसात का लढत बसलो ? यातून जोपर्यंत उत्तरे सापडत नाहीत, तोपर्यंत रामानेच ठरविले असावे की, घुमट राहू द्यावे.

काळ सरकत गेला आणि नंतर हिंदू समाजात कठोर असे आत्मचिंतन सुरू झाले. आम्ही वारंवार परक्यांकडून का मार खात राहातो? आमचे राजकीय स्वातंत्र्य का जाते? आमच्या धर्मावर आणि संस्कृतीवर परधर्मीय आघात का करतात? या दोषांचे चिंतन सुरू झाले, आणि हिंदू समाज हळूहळू जागा होत गेला. आधुनिक काळात त्याला जागे करण्याचे काम महर्षी दयानंद, स्वामी रामतीर्थ, स्वामी विवेकानंद, राजा राममोहन रॉय, महात्मा गांधी, नारायण गुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. हेडगेवार या सर्वांनी केले. हिंदू समाज हळूहळू आपल्या कुंभकर्णी निद्रेतून जागा होत गेला. इंग्रज आपले नाहीत, तसेच परदेशातून आलेले बाबर, मुघल, तुर्क, अरब आणि त्यांचा इस्लाम आपला नाही, याची त्याला जाणीव होत गेली. तो आपले सत्व शोधू लागला.

आपली मुळे कुठे आहेत, आपण कोण आहोत, आपले तत्त्वज्ञान कोणते, आपला वारसा कोणता याचा शोध तो घेत राहिला आणि हळूहळू एक हजार वर्षाच्या झोपेतून तो जागा होऊ लागला. हा जागृतीचा प्रवाह निरंतर वाहत राहिलेला आहे. कालौघात हे काम विश्व हिंदू परिषदेकडे आले. विश्व हिंदू परिषदेने, हिंदू समाजाचा विचार करता अनेक चमत्कार केलेले आहेत. त्यातील पहिला मोठा चमत्कार म्हणजे, हिंदू धर्मातील वेगवेगळ्या संत-महंत-आचार्य यांना एका व्यासपीठावर आणण्याचा. आपली आध्यात्मिक मते वेगवेगळी असली तरी, आपण सर्व हिंदूधर्मीय आहोत आणि हिंदू धर्मीयांसाठी जगात एकच देश आहे, त्याचे नाव भारत. तो जर राहिला, तर आपली धर्ममते राहातील, आध्यात्मिक मते राहातील. म्हणून आपल्याला एकजूट केली पाहिजे. राष्ट्रीय प्रश्नांवर सहमती केली पाहिजे आणि सर्वांनी मिळून हिंदू समाजाच्या हिताची कामे केली पाहिजेत.

सर्व धर्माचार्यांच्या मुखातून ‘न हिंदू पतितो भवेत, हिंदवा सोदरा सर्वे। मम दीक्षा हिंदू रक्षा, मम मंत्र समानता’ हे चार मंत्र वदवून घेतले. ‘हिंदू‘ असण्याची ही या काळाची परिभाषा झाली. श्रीगुरुजी आणि अशोकजी सिंघल यांचे या संदर्भातील काम युगप्रवर्तक आहे. त्यांच्या कामाचा परिणाम म्हणून १९८६ सालापासून विश्व हिंदू परिषदेने सर्व धर्माचार्यांना बरोबर घेऊन रामजन्मभूमी मुक्ती आंदोलन उभे केले. ते चढत्या श्रेणीने तापत गेले. हिंदू जागृतीची लाट देशात उभी राहिली. १९९२ची पिढी ‘मी हिंदू आहे आणि कोणताही राष्ट्रीय अपमान मी सहन करणार नाही,’ या भावनेने पेटून उभी राहिली.

प्रथम १९९० साली कारसेवा झाली. या कारसेवेलादेशभरातून १९९०ची पिढी गेली. अयोध्येत आपले काय होईल, त्यांना माहीत नव्हते. सरकारला हिंदूंपेक्षा मुसलमानांच्या हिताची चिंता त्यांना अधिक होती. प्रश्न होता मुस्लीम मतांचा. मुसलमानांची मते मिळविण्यासाठी हिंदूंना ठोकणे आवश्यक आहे, असे तेव्हाच्या सरकारला वाटले आणि १९९०च्या कारसेवेत कोलकात्याचे तरुण वयाचे कोठारी बंधू तत्कालीन सरकारच्या गोळीबारात ठार झाले!

अयोध्येत रामभक्तांचे रक्त सांडले. मुस्लिमधार्जिण्या सरकारने अशोक सिंघल यांच्या डोक्यावर काठ्या मारल्या. ते रक्तबंबाळ झाले. सत्पुरुषांचे रक्त सांडू नये, असा आपला प्राचीन संकेत आहे. त्याचे परिणाम चांगले होत नाहीत. या सांडलेल्या रक्तातून जी चेतना निर्माण झाली, जी वावटळ निर्माण झाली आणि नंतर जी त्सुनामी आली, त्यात मुल्ला मुलायम आडवे झाले. त्यांचे सरकार गेले. राम मंदिराचा विरोध करणाऱ्या काँग्रेसचा उत्तर प्रदेशात सुपडा साफ झाला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे एकेक दिग्गज धाराशायी झाले. त्यावेळी केंद्रीय मंत्री होते, बुटासिंग. ते हरियाणातून उभे होते, तेही आपटले. तेव्हा ते म्हणाले, “ही लढाई रामाविरुद्ध होती, त्यात मी कसा जिंकणार? मी तर अगदी लहान माणूस आहे.”

१९९० साली लालकृष्ण अडवाणी यांनी देशव्यापी रथयात्रा काढली. या यात्रेचे काय वर्णन करावे! अडवाणींच्या स्वागतासाठी आणि त्यांचे भाषण ऐकण्यासाठी हिंदू समाजाने इतिहासकाळात कधी केली नसेल, एवढी गर्दी केली. अडवाणींची अयोध्या रथयात्रा सर्व देशाचा सामाजिक,राजकीय नकाशा बदलून टाकणारी ठरली.

क्रमशः

Back to top button