
महाराष्ट्रातील पद्म पुरस्काराने सन्मानित १३ महानुभावांचा अल्प परिचय सांगणारी १३ भागांची विशेष मालिका..
पद्मभूषण
ज्येष्ठ नेते राम नाईक (सार्वजनिक सेवा),

राम नाईक – हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. वयाच्या 35 व्या वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय आहे. त्यासाठी त्यांनी नोकरी देखील सोडली. वर्ष 1989, 1991, 1996, 1998 आणि 1999 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यातील उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात पेट्रोलियम मंत्री होते.
पद्म पुरस्काराबाबत विचारले असता राम नाईक म्हणतात.. गेल्या ६० वर्षांपासून निरपेक्ष भावनेने मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करतो आहे. आज मिळालेला पद्मभूषण सन्मान हा या कामाचा सन्मान आहे. मी माझे चरैवेती चरैवेती चे व्रत सुरू ठेवेन.
क्रमशः