HinduismNewsRSS

संदेशखाली – हिंदू नरसंहार, महिला/अल्पवयीन मुलींवर अमानवीय,अत्याचाराचे बीभत्स स्वरूप..

sandeshkhali violence

संदेशखाली (sandeshkhali) हे पश्चिम बंगालमधील 24 परगणा जिल्ह्यातील एक लहान शहर आहे. बांगलादेशच्या सीमेला लागून असलेला हा सीमावर्ती भाग आहे, जिथे हिंदू अनुसूचित जातींची लोकसंख्या मोठ्याप्रमाणावर आहे.

भारत-बांगलादेशला लागून असलेल्या पश्चिम बंगालच्या ज्या 14 विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये संदेशखालीचा समावेश आहे. दुर्दैवाने, संदेशखालीसह या सर्व 14 विधानसभा TMC समर्थित सुनियोजित कुटील षडयंत्राचा भाग बनल्या आहेत.

या 14 सीमा विधानसभा मतदारसंघात बांगलादेशींची अवैध घुसखोरी दिवसेंदिवस लक्षणीयरीत्या वाढत आहे. तेथील लोकसंख्या बदलण्याचे हे कारस्थान राज्य सरकारच्या आशीर्वादाने यथोचित सुरू आहे. खरे तर हा परिसर इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI च्या दहशतवादी कारवायांव्यतिरिक्त अनेक गंभीर गुन्हेगारी, राष्ट्रविरोधी कारवायांचे प्रमुख केंद्र बनत आहे. काही काळापूर्वी संदेशखालीमध्ये मुस्लिम लोकसंख्या नगण्य होती, मात्र अवैध घुसखोरीमुळे येथे सातत्याने समाजकंटकांची संख्या वाढत आहे. हे क्षेत्र लोकसंख्येच्या बदलाच्या गर्तेत आहे. विशेष म्हणजे यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या रोहिंग्यां मुस्लिम समाजाची आहे.

गेल्या निवडणुकीच्या काळात घडलेल्या सर्व गुन्हेगारी घटनांमध्ये बहुतांश गुन्हेगार हे समाजकंटक मुस्लिम होते हे लक्षात घेण्यासारखे आहे. ही प्रकरणे गाय तस्करी, अंमली पदार्थांची तस्करी आणि अवैध शस्त्र तस्करीशी संबंधित आहेत. अशा सर्व बेकायदेशीर प्रकरणांमध्ये जिहादी मुस्लिमच आरोपी मोठ्याप्रमाणावर आहेत. गेल्या काही दिवसांत संदेशखालीत जे काही समोर आले आहे किंवा समोर येत आहे ते पहिल्यांदाच घडलेले नाही. यापूर्वी 2000 साली दक्षिण 24 परगणा येथील “बसंती” विधानसभेत एका हिंदू अनुसूचित जातीच्या महिलेवर समाजकंटक मुस्लिमांनी सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे आवाज उठवला. परिणामी धर्मांध मुस्लिम बलात्काऱ्यांनी संघाच्या चार कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या केली होती.

हिंदू महिलांवरील सामूहिक बलात्काराच्या एक नव्हे तर शेकडो घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. जेव्हा-जेव्हा संघाच्या कार्यकर्त्यांनी या विरोधात आवाज उठवला, परिणामी जिगादी त्यांना लक्ष्य करू लागले. संघ कार्यकर्त्यांची केवळ निर्घृण हत्याच झाली नाही तर त्यांची घरेही जाळण्यात आली.बेकायदेशीर घुसखोरांनी या भागात इतकी दहशत निर्माण केली आहे की 2007 ची दंगल रोखण्यासाठी बीएसएफची मदत घ्यावी लागली होती.

या प्रदेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांची आणि दडपशाहीची मोठी यादी आहे. 2017 मध्ये सोशल मीडिया पोस्टमुळे हिंदूंना टार्गेट करण्यात आले होते.येथे, हिंदू अनुसूचित जातीच्या महिला आणि अल्पवयीन मुलींना तेथील धर्मांध,जिहादी,बाहुबली घुसखोर त्यांच्या वासनेसाठी जबरदस्तीने पळवून आणतात. या भागात शेख शहेनशाहसारख्या मुस्लिम गुंडांचे वर्चस्व आहे जो ड्रग्ज, शस्त्रे, राष्ट्रविरोधी कारवाया, गोमांस आदी गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेला आहे.

रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांचा बंदोबस्त करण्यात आणि डझनभर गुन्हेगारी/अमानवी कारवायांमध्ये गुंतलेल्या शेख शहेनशहासारख्या लोकांनी त्यांच्या अवैध कमाईतून अब्जावधी रुपयांची अवैध संपत्ती जमा केली आहे. पूर्वी हे लोक “माकप” मध्ये होते. आता तो TMC चा मोठे नेता आहे.

शेख शहेनशाहच्या लपण्याच्या ठिकाणांवर छापा टाकण्यासाठी गेलेल्या ED (Enforcement Directorate) पथकावर त्याच्या कार्यकर्त्यांनी हिंसक हल्ला केला. अनेक अधिकारी या भीषण हल्यात गंभीर जखमी झाले.

शेख शहेनशहा आणि त्याचे जिहादी,उन्मादी टोळके दलित महिला/अल्पवयीन मुलींचे अपहरण करायचे आणि त्यांना TMC च्या कार्यालयात घेऊन जायचे. जिथे त्या सर्व महिला/अल्पवयीन मुलींवर अनेक महिने सामूहिक बलात्कार करून त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला. नोकरी/रोजगार, विविध सरकारी योजनांचा लाभ आणि पक्षातील पदांच्या नावाखाली अनेक महिलांवर बलात्कार झाले.

आधुनिक लोकशाही काळात मध्ययुगीन सल्तनत चालवणाऱ्या या गुन्हेगारांना प्रशासन आणि सत्ताधारी पक्ष TMC चे पूर्ण प्रोत्साहन, समर्थन आणि संरक्षण प्राप्त आहे. बशीरहाटचे सध्याचे SP ( Superintendent of police ) हुसेन मेहंदी रहमान यांसारख्या अधिकाऱ्यांचाही यात सक्रिय समावेश आहे. या धर्मांध, जिहादी,राक्षसांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या लोकांवर क्रूर हिंसाचार केला जातो. इतकेच नव्हेतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही होऊ दिले जात नाहीत. साधा FIR देखील नोंदवला जात नाही.

पीडितांवर आणि या अत्याचारांविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांवर खोट्या FIR मुद्दाम दाखल केल्या जात आहेत आणि या भीषण घटनेला RSS /भाजपचा प्रचार म्हणून प्रसिद्धी दिली जात आहे. TMCच्या आदेशानुसार राज्य पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे. ना कोणाला बाहेर जाऊ दिले जात आहे ना बाहेरून कोणी आत जाऊ शकत आहे..

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय महिला आयोग आणि भाजपच्या महिला कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळालाही घटनास्थळी जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आहे. या अमानुष अत्याचाराविरोधात निःपक्षपाती तपासाची मागणी करणारी जनहित याचिका सुप्रीम कोर्टात आणि कोलकाता हायकोर्टातही दाखल केली आहे.

पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा, दक्षिण 24 परगणा, उत्तर दिनाजपूर, दक्षिण दिनाजपूर, मुशिरदाबाद, मालदा, नादिया आणि हुगळी यांसारख्या सीमावर्ती किंवा मुस्लिमबहुल जिल्ह्यांमध्ये अशा घटना सातत्याने मोठ्याप्रमाणावर घडत आहेत.हिंदूंचा नरसंहार, टार्गेट करून हिंदूंची घरे जाळणे, हिंदू महिला/अल्पवयीन मुलींवर झालेल्या सामूहिक बलात्कारासारख्या सुनियोजित घटनांमुळे स्थानिक हिंदूंचे पलायन देखील मोठ्याप्रमाणावर सुरू झाले आहे.

मुस्लिम लांगूलचालनामुळे पूर्वीचे कम्युनिस्ट सरकार आणि आताचे ममता बॅनर्जी सरकार या दोघांनीही हिंदूंच्या मानवी हक्कांकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले आहे..

शेवटी इतकंच म्हणू इच्छितो की,

खप्पर वाली काली जागे, जागे दुर्गा बर्बंडा!
रक्त बीज का रक्त चाटने वाली जागे चामुंडा
नर मुण्डो की माला वाला जगे कपाली कैलाशी
रण की चंडी घर घर नाचे मौत कहे प्यासी प्यासी.

Back to top button