IslamPolitics

अवैध मशिदीविरोधात तक्रारीमुळे मालवणीत एकावर हल्ला

मुंबई, दि. २४ फेब्रुवारी –  मालवणी येथील मुस्लिम कट्टरपंथियांचा उन्माद आता मॉब लिंचिंगच्या दिशेने निघाला आहे. मंगळवारी रात्री परिसरातील छेडा कॉम्प्लेक्समध्ये राहणारे रमेश जैन यांच्या घरात घुसून वीस-पंचवीस कट्टरपंथियांनी हल्ला करून  जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रमेश यांचे मित्र प्रवीण जैन यांनी अवैध मशिदीविरोधात तक्रार दाखल केली होती. प्रवीण सध्या जीवाच्या भीतीने मुंबईबाहेर आहेत.

काही दिवसांपूर्वी हिंदू दलितांवर घर सोडून जाण्यासाठी दबाव आणण्यात आल्याची घटना घडली होती. त्याचप्रमाणे संवेदनशील परिसर असल्याचे सांगत राम मंदिर निधी समर्पणाचे फलक उतरवले गेले होते. त्याच परिसरात आता हिंदूविरोधाचा हा नवा प्रकार समोर आला आहे. मंगळवारी संध्याकाळी रमेश यांच्या कुटुंबियांना दमदाटी करण्याचा प्रकार घडला तर रात्री अकराच्या सुमारास काही कट्टरपंथियांच्या जमावाने रमेश यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. रमेश यांच्या कुटुंबियांनी त्यांना घरात शिरू दिले नाही. सोसायटीतील काही रहिवासी व रमेश यांच्या कुटुंबियांना १०० नंबर वर फोन करून पोलिसांना संपर्कही करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस घटनास्थळी दाखल झाले नाहीत. त्यानंतर रमेश व त्यांचा भाऊ स्वतःच पोलीस स्थानकात गेले असल्याचे समजते.

रमेश यांचे मित्र प्रवीण जैन यांनी छेडा कॉम्प्लेक्समधील अवैध मशिदीविरोधात तक्रार केली होती. अलिकडेच या मशिदीला नोटीसही देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे संतापलेल्या कट्टरपंथी जमावाला रमेश व प्रवीण यांच्या कुटुंबाला सामोरे जावे लागत आहे. लीगल राईट्स ऑब्जर्व्हेटरीने ट्वीट करत याबाबत माहिती दिली. राजकीय क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी या घटनेचा निषेध नोंदवला असून केंद्र सरकारने या प्रकरणात लक्ष घालावे असेही आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button