HinduismNews

ट्विटरला सर्वोच्च न्यायालयात खेचणार – विनय जोशी

राष्ट्रीय विचारांच्या मुस्कटदाबीचा प्रयत्न निष्फळ;

@LegalLRO & @DalitPositive ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरू

नवी दिल्ली, दि. १२ मार्च : ‘लिगल राईट्स ऑब्जरर्व्हटरी’ (@LegalLRO) आणि ‘दलित पॉझिटिव्ह मुव्हमेंट’ (@DalitPositive) हे दोन राष्ट्रीय विचारसरणीचे ट्विटर अकाऊंट बंद करणाऱ्या ट्विटरला येत्या काही दिवसांतच सर्वोच्च न्यायालयात खेचणार असल्याचे वक्तव्य ‘लिगल राईट्स ऑब्जरर्व्हटरी’ चे संस्थापक संयोजक विनय जोशी यांनी केले.

‘लिगल राईट्स ऑब्जरर्व्हटरी’ वर कोणताही ठोस पुरावा नसताना स्पॅनिंग चा आरोप ट्विटरवर ठेवला असून या मानहाणीविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे जोशी यांनी यावेळी सांगितले.

विनय जोशी म्हणाले, ‘‘रश्मी सामंत या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या भारतीय विद्यार्थिनीवरील ‘स्पुटनिक न्यूज’ वरील रिपोर्टचा अभ्यास करुन आपल्या ट्विटर हॅण्डलवर शेअर करण्यात आला होता. त्यासंबंधीचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. आम्ही कोणत्याही नियमाचा उल्लंघन केलेले नसतानाही ट्विटरने आमच्यावर आरोप केलेले आहेत. ट्विटरवर १५ हून अधिक ट्विटर हँडल असे आहेत, जे मोकाटपणे व्यवस्थित सुरु आहेत. मात्र ट्विटर त्यावर कोणतीही कारवाई करीत नसून एकातऱ्हेने ते त्यांना समर्थनच करीत आहेत.  मात्र आम्ही अभ्यासपूर्ण आणि नियमांच्या चौकटीत राहूनही आमच्यावर जो आरोप करण्यात आला आहे. तो आम्ही कदापी सहन करणार नाही.’’

 पुराव्यासहित अभ्यासपूर्ण ट्विट करून देखील सदरहू ट्विटर हँडलच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालत सदर अकाऊंट बंद करण्यात आली होती. मात्र काही तासांनंतर ती पुन्हा सुरु करण्यात आली आहेत. लिगल राईट्स ऑब्जरर्व्हटरी,  दलित पॉझिटिव्ह मुव्हमेंट, फोरम फॉर इंडिजिनस राईट्स इन नॉर्थ इस्ट इंडिया, केरळा पिपल्स फ्रंट, गुजरात लिगल राईट्स फोरम ही पाच ट्विटर अकाऊंटस ट्विटरने एकाचवेळी बंद केली होती.

**  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button