OpinionRSS

संघटित राष्ट्रजीवनाचा लघु कुंभ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिनिधी सभा – भाग २

‘परम वैभवशाली राष्ट्र’ ह्या उद्दीष्टांसह भारतातील प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राजकारणापासून अलिप्त राहून जनमानसात आपलं स्थान निर्माण केलंय आणि आपलं राष्ट्र निर्माणाचं कार्य सुरु ठेवलंय. थेट शाखा कार्य आणि जवळपास ४० संलग्न संघटनांसह संघ सातत्याने आपल्या ध्येय्याकडे वाटचाल करत आहे. अखिल भारतीय प्रतिनिधींची वार्षिक बैठक संघाच्या या विशालकाय स्वरुपाचे प्रतिनिधित्व करते.(१९-२० मार्च बंगळुरू)

या वार्षिक बैठकीत आपल्याला संघाचा वैचारिक आधार, अतुलनीय कार्यपद्धती व संघाचा उद्देश एकत्र आणि एकाच ठिकाणी समजू शकतो. एक कुटूंब म्हणून भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रतिनिधींना बघून असे वाटते की जणू काही शिस्तबद्ध, संघटित आणि प्रगत राष्ट्र आपल्या छोट्या आकारात साकार झालेले आहे. प्रयागराज कुंभ मेळ्याप्रमाणे कोट्यवधी देशवासीयांच्या भावनिक एकजुटीचा अनुभव या वार्षिक सभेमध्ये येतो.

संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी मंडळाची ही बैठक प्रत्यक्षात एक लघु कुंभ आहे जो १२ वर्षांनी नाहीतर दरवर्षी भरतो. या बैठकीत सहभागी होणारे सुमारे दीड हजार प्रतिनिधी राष्ट्र जीवनातील प्रत्येक क्षेत्रात सुरु असलेल्या संघ कार्याचा लेखाजोखा सादर करतात. हा लघु कुंज म्हणजे धर्म, संस्कृती, राजकारण, शेतकरी, कामगार, शिक्षण, विद्यार्थी, आर्थिक जग, वनवासी, सेवा क्षेत्र,गौ माता संरक्षण आणि संवर्धन, सीमा सुरक्षा, साहित्य प्रकाशन आणि पत्रकारिता इत्यादी संघटनेच्या कार्यात समर्पित स्वयंसेवकांच्या परिश्रमांचा परिचय आहे.

संघाच्या सरकार्यवाहांच्या द्वारे देशभरात झालेल्या संघ कार्याच्या अहवालाच्या विस्तृत वृत्तांकनाने ह्या बैठकीची सुरवात होते. या अहवालात संघाच्या कामाची प्रगती सर्व प्रतिनिधींना देण्यात येते. देशातील वेगवेगळ्या क्षेत्र प्रदेश आणि शाखांमधे सुरु असलेल्या कामाचा ताजे वृत्त इथे मिळते त्याने एकमेकांना शिकण्याची संधी निर्माण होते. जे काम मोठमोठ्या भाषणाने, लेखाने, पुस्तकांनी अथवा प्रवचनांनी होत नाही ते ह्या तीन दिवसीय वैचारिक कुंभात आल्हाददायक होते.

संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा म्हणजे गहन चिंतनाचा सर्वात पवित्र संगम आहे. संगम (सरस्वती), स्नेहिल चर्चा (यमुना) आणि सरसहमती (गंगा). हे सांगणाऱ्या लेखकाने स्वतः या संगमामध्ये नऊ वेळा स्नान केले आहे. त्याच अनुभवाच्या आधारे असे म्हणता येईल की, हा संगम सध्याच्या चर्चेत असलेल्या महागठबंधनापासून लाखो कोस असून देव दुर्लभ समर्पित कार्यकर्त्यांचे ‘महामंगल मिलन’ आहे.या वार्षिक बैठकीतील कामाच्या प्रगतीव्यतिरिक्त, नवीन अनुभव, नवीन प्रयोग, नवीन प्रकल्प आणि नवीन योजनांवर सविस्तर चर्चा केली जाते आणि सहमतीने निर्णय घेतले जातात. राष्ट्रजीवनाच्या प्रत्येक विभागात / क्षेत्रात निरंतर पुढे सरसावत संघाच्या कार्यकर्त्यांनी आता पर्यावरण, जलसंधारण, कुटुंब व्यवस्था आणि देवांच्या शाश्वत परंपराचे संरक्षण यासारख्या क्षेत्रात कार्य करण्याचे ठरविले आहे.

स्व स्तुती करणे, अंदाधुंद प्रचार, काम कमी आणि बोलणे जास्त, मनसोक्त कारभार / कागदी राजकीय प्रथा ह्या सर्वांना तिलांजली देऊन संघ आपल्या सेवेच्या, केंद्रित आणि निरंकुश दृष्टिकोनावर दृढ राहून एक एक पाऊल पुढे जात आहे. थोडक्यात, हाच आहे ह्या ‘चिंतन शाळेचा’ ( प्रतिनिधी सभा) परिचय.

अनुवाद – अनुप देशपांडे, संभाजीनगर.

सौजन्य – विश्व संवाद केंद्र, देवगिरी.

Back to top button