HinduismRSS

जैन संप्रदायाचे आचार्य महाश्रमण यांची संघ मुख्यालयास भेट

नागपूर, दि. २७ मार्च – अखिल भारतासहित नेपाळ, भूतान या देशांत अहिंसा पदयात्रा करणारे श्वेतांबर तेरापंथ जैन संप्रदायाचे मुनिवर्य  महातपस्वी आचार्य महाश्रमण यांचे गुरुवार, २५ मार्च रोजी शिष्यपरिवारासह स्मृतिमंदिर रेशीमबाग परिसरात आगमन झाले होते. या वास्तव्यादरम्यान मुनिवर्यांनी स्मृति मंदिर, आद्य सरसंघचालक परमपूजनीय डॉ. हेडगेवारांचे जन्मस्थान, महालातील मोहिते वाड्यातील संघ मुख्यालय, सरसंघचालक निवास या परिसरांना आवर्जून भेट दिली. 

अखिल भारत, नेपाळ, भूतान या देशांत पदयात्रेद्वारे अहिंसा संदेश देणाऱ्या महामुनींचे संघ परिवाराच्या वतीने आत्मीयतेने स्वागत केले. शुक्रवार, २६ मार्च रोजी प्रातःकाळी रेशीमबागेत मा. दत्तोपंत ठेंगडी सभागृहात मुनीजींचे प्रवचन ऐकण्याचा लाभ पूजनीय सरसंघचालकांसह ज्येष्ठ स्वयंसेवकांना प्राप्त झाला. 

दुपारी डॉ. हेडगेवार भवन, महाल येथे पूजनीय सरसंघचालकांच्या उपस्थितीत निवासी वरिष्ठ प्रचारकांशी मुनीजींचा परिचय व वार्तालाप झाला. यावेळी तेरापंथ मुनीसंप्रदाय आणि संघरचना या विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर मुनीजींनी आपल्या शिष्य परिवारासह तेथून प्रस्थान केले.

**

Back to top button