News

‘विज्ञानवादी सावरकर’ या विषयावर डॉ. गिरीश पिंपळे यांचे ऑनलाइन व्याख्यान

मुंबई, दि २ जुलै : क्रांतिकारकांचे शिरोमणी असलेल्या, देशभक्त, साहित्यिक, हिंदुत्वनिष्ठ अशा विविध गुणविशेषाने भारलेल्या स्वा. सावरकर यांनी मार्सेलीस बंदरात जाण्यासाठी बोटीतून सागरात उडी मारली आणि ब्रिटिशांच्या कैदेतून सुटका करण्याचा पराक्रम केला, या प्रसंगाला १११ वर्षे होत आहेत. या प्रसंगाचे औचित्य साधत मराठी विज्ञान परिषद आणि स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. ७ जुलै २०२१ रोजी सायं. ६ वाजता सावरकर चरित्राचे अभ्यासक आणि भौतिकशास्त्राचे प्राध्यापक, डॉ. गिरीश पिंपळे (नाशिक) यांचे ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या विज्ञानविषयक विचारांकडे समाजाचे लक्ष जावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे व्याख्यान विनामूल्य आणि सर्वांसाठी खुले आहे. https://mavipa.org/events/swrkr या लिंकद्वारे ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

मराठी विज्ञान परिषद गेली ५६ वर्ष समाजात विविध मार्गाने विज्ञान प्रसाराचे कार्य करीत आहे. महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर मराठी भाषिक लोक असलेल्या बृहन्महाराष्ट्रात विज्ञान परिषदेचे ७२ विभाग आहेत. सध्याच्या बदललेल्या परिस्थितीत संपर्क स्थापक प्रणालीद्वारे विविध उपक्रम परिषद करीत आहे. त्यातीलच हा एक व्याख्यानाचा उपक्रम असल्याची माहिती मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह जयंत जोशी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी दिली.

Back to top button