News

योग आणि आयुर्वेदाचे अभ्यासक, गुरू बालाजी तांबे कालवश

पुणे, दि. १० ऑगस्ट : योग आणि आयुर्वेद या क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणारे तसेच कार्ला येथील आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचे पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८१ वर्ष होते. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली.

बालाजी तांबे यांनी आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसारासाठी भरीव कार्य केले. योग आणि आयुर्वेद यांची सांगड घालत सामाजिक परिवर्तनासाठी ते अनेक वर्षे कार्यरत होते. विविध वृत्तपत्रे, मासिके आणि इतर माध्यमांतून या विषयातले प्रबोधन करत असत. आयुर्वेदाबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे. आयुर्वेदाची महती भारतासह जगातील अनेक देशांमध्ये पोहोचविण्यात यश मिळविले.

लोणावळ्याजवळील कार्ला येथील ‘आत्मसंतूलन व्हिलेज’ या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून लोकांची सेवा केली. अनेक आजारांवर आयुर्वेदाच्या माध्यमातून त्यांनी उपचार केले. त्यांच्याकडे देशभरातूनच नव्हे तर परदेशातूनही रुग्ण उपचारासाठी येत असत.

Back to top button